नजर काढणे

Submitted by आच्रट on 1 July, 2014 - 08:51

this page is deleted. admin, please delete this page or send instructions to delete from my account.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"दृष्ट दृष्ट पापीचंडाची, झाडामाडाची, किडामुंगीची, आल्यागेल्याची, घरातल्यांची, बाहेरच्यांची, काळ्या लोकांची, गोर्‍या लोकांची, गोपाळांतल्या गोपाळकृष्णाची, तशी माझ्या <..>ची चुलीत पडो. बाळ कडुलिंबासारखं वाढो. हुशार, संपन्न, चारित्र्यवान होवो."

आईला असं म्हणताना ऐकलं आहे. Happy

पाच वर्षाच्या वरील मूल असेल तर मिठ-मोहरीने दृष्ट काढतात आणि स्वाती यांनी लिहलेला "मंत्र" म्हणतात. पाच वर्षाखालील बाळाला फक्त मिठाने दृष्ट काढतात आणि "पाण्यात पडो" म्हणतात. आई सहसा बाळाची दृष्ट काढत नाही कारण आईची दृष्ट बाळाला लागते (कारण तीच जास्त वेळ बाळाला बघते; निदान पूर्वीच्या काळी बघायची). पाच वर्षावरील अपत्याची दृष्ट आई काढते.
बाकी माझ्या आजीचा मंत्र स्वाती आंबोळे यांच्या मंत्रापेक्षा पावरबाज होता कारण ती त्यात "भूता-खेताची" पण म्हणायची Wink Happy
आता "मंत्राच" काम झालय तुमच. तेव्हा ह्या धाग्याला दृष्ट लागायच्या आत उडवलात तर बर. Happy

सोनालीएसएल.. हायला हा मंत्र तर एकदम पावरबाज!! केर घ्यायला घंटागाडी येते तेव्हा तर पोर अगदी धावत बाल्कनीत जातात बघायला. कधी त्या केराची दृष्ट लागेल हे लक्षात नाही आल Wink घरातला केराला मात्र आता अंघोळ घालून ठेवत जाईन. Happy

माझी आज्जी वरील मंत्रानंतर म्हणायची ज्याची द्रुष्ट त्याच्या कंबरेत लाथ आणी जोरात पाय जमिनीवर आपटायची. Happy