माझे रुमाल पुसण्या घेऊन लोक गेले ! ( विडंबन)

Submitted by ब्रह्मांड आठवले on 5 June, 2014 - 00:44

हे विडंबन काव्य असून याच्याशी साधर्म्य असलेली कलाकृती आढळल्यास त्या चमत्कृतीस योगायोगा समजावे.

माझे रुमाल पुसण्या घेऊन लोक गेले !
नाकात जंत होते कोरून लोक गेले !!

मज एकट्यास उरल्या माबोतल्या जमीनी....
माझे शहर पुलांचे चोरून लोक गेले!

खोड्या कुणी कुणाच्या केल्या रडत कळेना....
तक्रार कालची का सांगून लोक गेले!

माझ्या कुचाळक्यांची आली रद्दीफ तेव्हा....
गझलेवरीच माझ्या नाचून लोक गेले!

मिसरे न ज्यात जमले ऐसे सडून होते.....
माझ्या अलामतीला सोडून लोक गेले!

तो एक शिमगोत्सव चालू कधीच झाला....
टोलावले तुम्हाला टाळून लोक गेले!

माझ्या अनेक नकला आहेत नेटवर ज्या....
झोके हवेत त्यावर खेळून लोक गेले!

मी कायदे करावे, की शायरी करावी
या वंचनेस सारे हासून लोक गेले!

- आनंदब्रह्म

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_

छान

शिमगोत्स्तवात होतो मी ठोकणार बोंबा
माझ्यावरीच बोंबा ठोकून लोक गेले

हा कसा वाटतो ? मूळ विडंबनात पहिल्या ओळीत वृत्त सुधारावे लागणार होते मी शेरच बदलला
न पटल्यास क्षमस्व ब्र.आ. जी

आथवले साहेब
वैवकु यान्च्यशि सहमत. मज्जा आलि वाचुन.
आधि फक्त एक्च जन कविता करत होते. आत खुप जन करु शकतात हे बर वातल.

वैवकु - आपल्याला साष्टांग दंडवत. तुम्ही एक आहात जे सर्वांना अगदी मनापासून आणि प्रामाणिक प्रतिसाद देत असता. आपले आभार आणि काव्यलेखनाला मन:पूर्वक शुभेच्छा !

दुर्योधनराव
मनापासून आभार आपले. फक्त ते आठवले आणि साहेब असं एकत्र नका म्हणू हो. फार्फार मोठ्ठा माणूस होऊन दिल्ली किंवा पार्ल्यात पोहोचल्यासारखं वाटतं. दया करा, साधा माणुस आहे हो, आणि गंमत म्हणून लिहिलय. हलकेच घ्या.