का कुणाला त्रास द्यावा?

Submitted by शरद on 30 May, 2014 - 10:39

आज एक बातमी ऐकली - वाचली - पाहिली.

एक स्त्री चालत्या ट्रेनमध्ये चढत होती. ती ट्रेन आणि रूळ यांच्यामध्ये पडली आणि तिचा चिरडून मृत्यू झाला. दु:खद घटना आहे. नातेवाईकांना राग येणे साहजिक आहे. पण तरी टी.सी. वर ढकलून दिल्याचा आरोप केला गेला. सी.सी.टी.व्ही. च्या फुटेज मध्ये ती हात घसरून पडली हे स्पष्ट दिसते. का असे लोक वागतात?

ही घटना गंभीर आहे. पण क्षुल्लक गोष्टींमध्ये सुद्धा आपली चूक स्पष्ट दिसत असताना सुद्धा दुसर्‍यावर आरोप घालण्यात येतो. विशेषतः वाहतुकीच्या रस्त्यावर असे प्रसंग रोज येतात. आणि फक्त मोठी माणसे नव्हे; मी लहान मुलांना सुद्धा आपली चूक असताना वाद घालताना पाहिले आहे. असे का घडते? का? Angry

मी खूप अस्वस्थ झालो आहे. Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

तुम्हाला तो मुन्नाभाई एमबीबीएस मधला सुनील दत्तच्या पाकीटचोरीचा प्रसंग आठवतो का ?
त्या चोराला पकडल्यावर सुनील दत्त म्हणतो. हे लोक बघ कोणी घरुन बायकोशी भांडुन आलाय, कोणाची नोकरी ठीक नाह,, कोणाचा मुलगा त्याचे ऐकत नाही आणी ते सगळे हा राग तुझ्यावर काढतील. करु तुला त्यांच्या स्वाधीन ?

सेम पिंच इथेही आहे. मिळतोय चान्स तर घ्या हात धुवुन.(असाही प्रत्येकाने कधीना कधी रेल्वे प्रवासात टीसीला पैसे देवुन सीट मिळवलेली असते त्या दिलेल्या पैश्यांचा राग असा निघतो कधी कधी.....चुक नसताना सुद्धा)

या विषयावर काहीतरी चर्चा अपेक्षित होती. Sad

आपल्यासारख्या सूज्ञ नागरिकांना अशा त्रासाबद्दल काय वाटते?

कोणालाच स्वत:ची चुक कबुल करायला आवडत नाही..आणि कारणे दयायला आवडतात>>>

पण समोरच्याचे काय? त्या टी.सी. ची मुलगी किती पोट तिडिकेने बोलत होती टी.व्ही.वर खूप वाईट वाटले!

आता सगळी सहानुभुती मेलेल्या बाईच्या बाजुने आहे पण शेवटी तीच्या नातेवाईकांनी सत्य स्वीकारले पाहीजे.कोणाचाही असा दुर्देवी अंत वाईटच.