नारायण नागबळी - माहीती हवी आहे.

Submitted by विजय देशमुख on 27 May, 2014 - 06:15

माझ्या मित्राला त्याची कुंडली बघुन एकाने त्याला पित्रुदोष असल्याचे सांगीतले. त्यासाठी नारायण नागबळी करावा लागेल अशीही माहीती दिली, त्या अनुषंगाने काही माहीती हवी आहे.
१. पित्रुदोष म्हणजे नेमके काय?
२. केवळ एक पुजा (नारायण नागबळी) केल्याने दोष नाहीसा होतो का? याचा कोणाला अनुभव आहे का?
३. ही पुजा नाशिक/ त्रंबकेश्वर येथे कोणी केली आहे का?
४. असल्यास पुरोहीत - नाव/ फोन नंबर आणि अंदाजे खर्च.
५. लागणारा वेळ
६. ही पुजा करण्यास सपत्नीक जाणे गरजेचे आहे का?
काही अधिक माहीती असल्यास कृपया शेअर करावी.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कशाला त्या फंदात पडता...असं काही नसतं...हे माझे वै म.....असो...पण 'कुणाच्या' हाती हा धागा अजून सापडला कसा नाही.....आलोच पॉपकॉर्न घेऊन... Happy

तुम्ही एक रिसर्च सायंटीस्ट असून,तरी यावर विश्वास?? Sad

(रच्याकने,नाना(नारा.नाग.) म्हणजे मला कुणाचतरी नाव वाटल आधी... Proud )

तुमच्या मित्राचे आइ-वडिल हयात असतिल तर त्या.नाच हा विधी करता येइल...ंमाता पिता हयात असताना मुलाला हा विधी करण्याचा अधिकार नाही.. तसच शक्य असल्यास एकाच घराण्यतला सगळ्यात जेश्ठ व्यकतिकडुन हा वीधी करावा आणि घरातल्या शक्य तितक्या व्यक्तिनी उपस्थित राहावे.
( नाशिक ला असताना एक दोनदा नातेवाइक म.न्डळी आधी आमच्याकडे आली होती त्यावरुन एकुन माहित आहे, मी पुजा वैगरे attend केलेली नसल्याने बाकी माहिती देवु शकत नाही)

हि माहिती पहा:
http://www.marathimati.com/maharashtra/culture/narayana-nagbali.asp

माझे स्वतःचे वैयक्तिक मत - असले विधी करु नये.. नामस्मरण करावे..आणि देवाची प्रार्थना करावी पण तरीही..
जर हा विधी केल्याने मनाला उभारी येणार असेल , आत्मविश्वास वाढणार असेल तर जरुर करावा.

या किंवा असल्या उपायांची खिल्ली उडवणार्‍यांसाठी:
माणुस हा आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधत असतो..त्याला आधार हवा असतो.. आशा हवी असते.. कदाचित यासारख्या उपायांची मदत होते..(खरी/खोटी जी काही असेल) आशा मिळते. आपण जोपर्यंत एखाद्या संकटात सापडत नाही .तोपर्यंत आपल्याला असे उपाय शोधणारे लोक कुठल्या मनःस्थितीत असतात ते कळणार नाही. जे खिल्ली उडवतात ते कदाचित मनाने खंबीर असतील आणि अशा स्थितीला सामोरे जाउ शकतील पण त्यामुळे जे तसे नसतात त्यांचा मजाक करणे हे बरोबर नाही. आपल्याला कोणाची मदत करता येत नसेल तर त्यांची खिल्ली तरी उडवु नये असे आपले मला वाटते.

मनस्मि> >
काही प्रमाणात सहमत,
आत्मविश्वास वाढणार असेल तर जरुर करावा. >>
बहुतेक वेळा हे उपाय करणारी व्यक्ती नेहमीचे (वैज्ञानिक) उपाय करुन, सफलता न आल्याने, बहुतेक वेळा निराश होउन शेवटचा उपाय म्हणुन करताना दिसतात आणि हे हा उपाय सुचवणार्‍यांना महित असते, ह्याचा गैरफायदा हे लोक घेउ शकतात (अव्वाच्यासव्वा पैसे उकळणे, लुटणे इ.).
ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावे असं माझं मत आहे.

गेल्या जन्मी द्रव्य अपहरण केले असल्यास या जन्मी नागबली करावा.

गेल्या जन्मी पाच कोटीचा भ्रश्टाचार करुन या जन्मी पाच हजाराचा नागबळी केला की पाप खल्ल्लास.

आणि हे हा उपाय सुचवणार्‍यांना महित असते, ह्याचा गैरफायदा हे लोक घेउ शकतात (अव्वाच्यासव्वा पैसे उकळणे, लुटणे इ.).>>>Exactly....

हे म्हणजे सगळे उपचार करून थकले की होमिओपॅथीच्या डॉक्टरकडे जाण्यासारखं आहे.शेवटी तोही लुबाडतोच.

खिल्ली उडवणे आमचे काम नोहे.कदाचित खिल्ली उडवल्याने ते वैज्ञानिक बाजून पाहण्याचा प्रयत्न कदाचीत करतील...Cognitive Therapy.. Wink

रच्याकने,ज्यांनी प्रश्न विचारला त्यांची आम्ही खिल्ली उडवत नसून त्या प्रश्नाची खिल्ली उडवली आहे हे लक्ष्यात घ्यावे.
(मला जाम आवडतो हा शब्द..रच्याकने.. Happy )

माझा विश्वास आहे काही काही बाबतीत कारण माणसाच्या हातात सर्व काही नसते.
जेव्हा हताशपणा येतो, मार्ग दिसत नाही, तिथे अलौकिकाचा प्रवास सुरू होतो.
पाच वर्षे झालीत, घशाचा कॅन्सर आहे वहिनीला, दोन छोट्या मुली आहेत. मोठमोठे उपाय, ऑपरेशन्स झाले, बरा झालेला कॅन्सर दोन वर्षानी उलटला, परत उपाय सुरू झाले.
अवस्था शारिरिकच, उपाय ही शारिरिक, पण तरीही हतबलता आहेच.. नारायण नागबळी केले मागच्या वर्षी, नक्कीच कॅन्सर नाही त्याने बरा होणार, पण सर्वांच्या मनाला आधार मिळाला, आपण पूर्वी काही चुकीचे केले असल्यास त्याची क्षमा मागायची संधी मिळाली असे वाटले.
बाकी तार्किकदृष्ट्या नाही पटत, नाशिकची अस्वच्छता, तिथले अपप्रकार इ.
पण वैयक्तिक हित जास्त महत्वाचे वाटते.

म ग असे आहे तर क्यान्सर झाल्यावर किन्वा नोकरी मिळत नाही म्हणुन म्हातातपणी ना ना बळी करण्याऐवजी मुल जन्मल्या जन्मल्याच करुन टाकायचे. ंहनजे आयुश्यभर कट कट नाही

मनस्मि ,
अनुमोदन.!

डीविनिता,

माणूस सर्व प्रकारचे इलाज करून थकला की शेवटी आधिभौतिक उपाय करतो.त्यात वावगं काहीच नाही.

यावर अधिकारी व्यक्तीचा लेख पंचागकर्ते कै. धुंडीराजशात्री दाते यांचा दाते पंचांगात प्रसिध्द झाला होता. अश्या अनेक लेखांच पुस्तक दाते पंचाग च्या माध्यमातुन छापल गेलय.

कै. धुंडीराजशात्री दाते यांच्या ( या लेखाच्या ) मते नारायण नागबळी ह्याला शात्राधार नाही. परंतु नारायण बळी याचा अर्थ आपल्या घराण्यात जर कोणाचा मृत्यु परगावी झाला, परागंदा असताना झाला तर त्याचे विधीवत दहन / दहावा न झाल्यास आलेला दोष टाळण्याचा हा विघी आहे. याचा नागबळी शी संबंध नाही. आपल्या हस्ते नागाची हत्या झाली असता त्याचे परिमार्जनासाठी करावयाचा विधी नागबळी.

"नारायण आणि नागबळी " एकत्र आणि नाशीकलाच का करायाचे याला शात्राधार नाही असे कै. धुंडीराजशात्री दाते म्हण तात. तथापी सर्वकाही ( वैद्यकीय द्र्ष्ट्या ) सुरळीत असताना मुल होत नसेल तर शेवटचा उपाय म्हणुन ( करुन पहाण्यास ) हरकत नाही असेही कै. धुंडीराजशात्री दाते यांचे या लेखात म्हणणे आहे.

मी अनेक वर्षांपुर्वी हा लेख वाचलेला आहे. सल्ला म्हणुन घ्यायचा असल्यास मुळ लेख वाचावा.

विज्ञानदास, माझा अजिबात विश्वास नाही. आणि मी मित्राला समजुन सांगण्याचा परोपरिने प्रयत्न केलाय. पण जो सगळ्याच उपायांना नाही म्हणतोय आणि केवळ एका जोतिष्याच्या म्हणण्यालाच धरुन बसलाय, त्याचं काय करावं? झोपलेल्याला जागं करता येईल पण ....
असो. पुन्हा प्रयत्न करतो, अन्यथा, कमीतकमी लुबाडला जावा असा प्रयत्न Sad दुसरं काय करणार !

मनस्मी शी सहमत आहे.
अशा खिल्ली उडवण्यामुळे प्रबोधनात अडथळे निर्माण होतात.अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. पण प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग दुर्दैवाने आहेच.
बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अ‍ॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्‍या अ‍ॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अ‍ॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते.
औषध उतारे आणि आशिर्वाद हे पुस्तक या संदर्भात वाचनीय आहे. गापै व लिंटि यांनी तर वाचलच पाहिजे. Happy

@विजयः मला इथे कसलिही अन्धश्रद्धा पसरवायची नाही पण नारायण नागबळीची पूजा केल्यावर एका वर्शात घराण्यातली ज्येश्ठ व्यक्ती जायचे चान्सेस असतात...... त्यामुळे तशी कोणी म्हातारी माणसे असतील वय जास्त असलेली तर ही पूजा करु नका अस तुमच्या मित्राला सान्गा..............अनुभव आहेत म्हणून हे सान्गणे

नारायण नागबली आणि कालसर्प योग यांचा अनेक जणांनी अतुट संबंध लावला आहे. पण मुळात कालसर्प योगच नसतो तर नारायण नागबली हा उपाय सुध्दा व्यर्थ. ऐका शैलेन्द्र पांडे काय म्हणतात.

http://www.youtube.com/watch?v=ie662aopEhw

आपण जोपर्यंत एखाद्या संकटात सापडत नाही .तोपर्यंत आपल्याला असे उपाय शोधणारे लोक कुठल्या मनःस्थितीत असतात ते कळणार नाही. >>>

100% अनुमोदन .
असल्या गोष्टींवर विश्वास असणार्यांना खंर त्यातलं काही कळत नसतं. आणि विश्वास नसणार्यांना सुधा त्यातलं काही कळत नसतं. नक्की काय खंर काय खोटं हे कोण सांगणार ?
Sad

हे सर्व विधी आपल्या अंतर्मनाची (subconscious mind) समजूत घालण्यासाठी असतात. आपले मन एकदा का all is well म्हणाले की सर्वच वेल होउन जाते.

२१व्या शतकात नागबळी वगैरे… वर 'असले 'उपाय' नैतिक असल्या सारखी
"तांत्रिक" (कोटि उद्देशीत pun intended) चर्चा!?
अरेरे!
You are either born lucky (by your own stupid belief), or you are not (ditto)!
You can’t manipulate, or alter your fate
The die is cast before your birth (by your own stupid belief),
So, at birth you are already too late!
=
रक्ताच्या थारोळ्यात पडलाय,
फुटपाथच्या कडेला,
पण, अंधाराच्या सनातनी दूतांनो,
मी तुरुंगातून बघतोय
तुमच्या पराभवाची नांदी
दाभोलकरांच्या प्रतिमेवर फुली मारून, तुम्हाला करायची होती
दाभोलकरांची इतकी जीवघेणी घृणा
तर खुशाल करायची होती
मूठ मारून भानामती,
आणि टाकायची होती मुरगाळून
एखादी कोंबडी,
दाभोलकरांच्या नावानं,
108 भटजींचा कळप घेऊन,
रचायचा होता एखादा महायज्ञ
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दारात
दाभोलकरांच्या वैज्ञानिक दृष्टीला
भस्मसात करण्यासाठी
करायची होती करणी अंनिसवर, मांत्रिकाकडून घ्यायचा होता अंगारा, धुपारा
आणि जादूटोण्यानं करायचा होता आळाबांधा
दाभोलकरांच्या विवेकवादी विचारांचा...
एखाद्या चमत्कारी बुवाकडून, एखाद्या अवतारी मातेकडून,
एखाद्या गुरुमहाराजाकडून,
द्यायचा होता कठोर शाप,
दाभोलकरांच्या सत्यानाशासाठी...
धारेचे लिंबू अर्धवट कापून,
टाकायचा होता बिबव्याचा उतारा,
दाभोलकरांच्या वाटेवर,
त्यांच्या नेत्रात फूल पाडण्यासाठी,
त्यांची वाचा बंद करण्यासाठी...
श्रद्धेने लटकवायची होती काळी बाहुली, तुमच्या शाखेच्या बाहेर
आणि आरपार खुपसायच्या होत्या सुया, बाहुलीच्या अंगभर, दाभोलकर समजून...
हात जोडून, डोळे झाकून
करायचा होता नवस,
एखाद्या कोट्यधीश देवस्थानाला
पावलापावलावर उभे करायचे होते मठाश्रम,
गावागावात, वस्तीवस्तीत
भरवायचे होते सत्संग,
आणि खुशाल करायचे होते दाभोलकरांना
पाखंडी सैतान म्हणून घोषित...
आमची ना नव्हतीच कधी
आज मात्र तुमचं कावरंबावरं थोबाड, ओरडून ओरडून सांगतंय
तुम्ही हे सारं करून थकला,
मणक्याचं टिचं भरल्यागत वाकला
पण यातली कोणतीच मात्रा
दाभोलकरांवर लागू होईना
काही केल्या दाभोलकरांचं बंड
तुम्हाला रोखता येईना.......
दाभोलकर ऊन, पाऊस, वारा पीत,
ओठी घेऊन समतेचं गीत,
प्रत्येकाच्या डोक्यातला अंधार झाडत, मस्तकातले धर्मांध किडे काढत,
अंधश्रद्धेची भुते गाडत..
अहोरात्र चालत राहिले,
काळोखाच्या साम्राज्यात उजेड पेरत
मसणवट्यापासून भोंदूच्या मठापर्यंत,
एक गाव एक पाणवठ्यापासून
जात पंचायतीच्या उच्चाटनापर्यंत,
दाभोलकर अखंड लढत राहिले,
......पण....अंधारातल्या सनातनी दूतांनो,
तुमच्या बुवाबाजीला, तुमच्या कावेबाजीला,
तुमच्या मांत्रिकाला, तुमच्या तांत्रिकाला, तुमच्या सुईला, तुमच्या बिब्याला,
तुमच्या ज्योतिषाला, तुमच्या पंचांगाला, तुमच्या अंगार्याला, तुमच्या धुपार्याला,
तुमच्या अधर्माला, तुमच्या कुकर्माला
क्षणभरही विचलित करता आलं नाही, दाभोलकरांच्या विजिगीषू ध्येयवादाला,
तुमच्या तथाकथित आध्यात्मिक शक्तीने कणभरही मारता आलं नाही
नरेंद्र दाभोलकर नावाच्या विचाराला, अंतिमत: पराभूत होऊन
तुम्हाला टेकावे लागले गुडघे... दाभोलकरांसमोर...
म्हणूनच तुम्ही वापरलं इतिहासाच्या ठेवणीतलं ब्रह्मास्त्र,
जे आधी माखलं होतं
चार्वाक-तुकारामाच्या रक्तानं,
जे आज तुम्ही भिजवलंय पुन्हा दाभोलकरांच्या रक्तात,
हा तुमच्या कुकर्माचा लेटेस्ट अध्याय, आणखी एक कलंकित कडी...
रक्ताच्या थारोळ्यात पडलाय,
20 ऑगस्ट 2013,
फुटपाथच्या कडेला...
पण...अंधाराच्या सनातनी दूतांनो,
मी तुरुंगातून बघतोय
तुमच्या पराभवाची नांदी....आणि
अपराजित दाभोलकर......

- सचिन माळी
(ऑर्थर रोड जेलमधून)

पूजा, प्रार्थना, आरती, ध्यान, चिंतन, जप-तप-पारायणे, प्रदक्षिणा, यात्रा हे सर्व निरर्थक व विनाशी थोताण्ड आहे.
यांनी फक्त 'उपाध्यायांचा’ = [कल्पित] देव-भडव्यांचा फायदा होतो,
'यजमानांच्या काल-धन-आयुष्याचा व्यर्थ व्यय व पर्यावरणाचा ऱ्हास होतो.
कल्पित दैवतांचे देव्हारे माजविण्यासाठी विज्ञानयुगाने उपलब्ध केलेल्या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग का करता?!
आपले पुरावारहित भंपक थोतांड विज्ञानयुगाच्या अंकित नाही का?
तर मग
हे कधी थांबणार?