थांबा आणि वाट पहा !

Submitted by Mandar Katre on 24 May, 2014 - 17:13

थांबा आणि वाट पहा !

भारताचे नवनिर्वाचित प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी शपथग्रहण करून पदभार स्वीकारण्यापुर्वीच त्यांच्या सार्क राष्ट्रप्रमुखाना बोलावण्याच्या निर्णयावरून उलटसुलट निष्कर्ष काढून रणकंदन करणार्या मंडळीना सांगावेसे वाटते ते इतकेच् की जरा थांबा आणि वाट पहा !

पाकिस्तानशी युद्ध पुकारून लढण्या ऐवजी गनिमी काव्याचा वापर करून आर्थिक कोंडी करणे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या बाजूने दबावगट निर्माण करणे / बलुचिस्तान वझिरीस्तान फुटीरतावादाला सहाय्य करून पाकिस्तानला अंतर्गत वादात व्यस्त ठेवणे / अफघाणिस्तानला सर्वतोपरी मदत करून आपले मित्र व पाकिस्तानचे शत्रू वाढवणे व पाकिस्तान ला दुर्बल /जर्जर करून सोडणे असे अनेक कूटनीतिक उपाय उपलब्ध आहेत . परंतु आजतागायत भ्रष्ट अन लुळ्या -पांगळ्या काँग्रेसी सरकारच्या लकवा मारलेल्या परदेशी धोरणामुळे ते उपाय अमलात आणले गेले नव्हते , पण आता चित्र पालटले आहे .

भारतात मोदींच्या रूपाने समर्थ , स्वाभिमानी अन राष्ट्रभक्त नेतृत्वाचा उदय झाला आहे…,त्यामुळे आता वर उल्लेख केल्याप्रमाणे कूटनीतिक उपाय वापरून पाकिस्तान ची नाकाबंदी केली जाइल . व त्यातूनच दबावतंत्राचा वापर करून काश्मीर आणि दहशतवादा सारख्या समस्यांची सोडवणूक केली जाऊ शकते …….

यास्तव ………… थांबा आणि वाट पहा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नरेन्द्र मोदी हे अतिशय मुरब्बी अन मुत्सद्दी नेत्रुत्व आहे. असा विचारपूर्वक विचार करणारी आणि योग्य परिस्थिती जाणून घेणारी लोकं आहेत तर … , great …! छान वाटल हि पोस्ट वाचून …कारण आजकाल सगळीकडे मोदींच्या सल्लागारांची संख्या शेकड्यात झालीय । कीव येते अशा लोकांच्या पोस्ट न comnt वाचून …। धन्यवाद हि पोस्ट टाकल्याबद्दल …। !

काश्मीरात शांतता आणि विस्थापित काश्मिरी हिन्दून्चे काश्मिरातच पुनर्वसन करण्याच्या मार्गात पाकिस्तान पुरस्कॄत दहशतवाद हा फार मोठा अडथळा आहे. तसेच अनधिकॄत रीत्या पाक ने बळकावलेला काश्मीर चा भाग परत घेणे १९७१ च्या युद्धानंतरच्या तहाच्या वेळी शक्य होते ,कारण तेव्हा पाकिस्तान पराभूत देश होता अन सुमारे १ लाख पाकी सैन्य युद्धबन्दी म्हणून भारताच्या ताब्यात होते .
पण तरीही मुत्सद्देगिरीत कमी पडल्याने असेल किंवा आन्तरराष्ट्रीय दबावाला बळी पडल्याने असेल, पण इन्दिराजी पाकव्याप्त काश्मीर भारतात परत आणन्यास असमर्थ ठरल्या होत्या . तसे आता होता नये. यासाठी भारताला कूटनीतिक दबावतंत्र वापरून पाकिस्तानचा काटा काढावाच लागेल !

कात्रे.पाकिस्तानच कशाला, दुबै पर्य्न्त सगळेच अखंद भारतात आणा बुआ ! म्हनजे आखातात बसुन रोज भारतात डोकावयचे तुमचे श्रमही वाचतील.

मंका, आखातात काय प्रतिक्रिया आहेत या विजयाबद्दल ?
बाकी वर ज्या खोचक प्रतिक्रिया येत आहेत तशा येतच राहणार सगळीकडे.
त्यामधे जर खरोखर लक्ष देऊन प्रतिवाद करण्यासारखे असेल तरच लक्ष दिले जावे.

आज दिवसभरात मला कंपनीतील पाकिस्तानी , श्रीलंकन आणि बांगलादेशी कर्मचार्यांनी अतिशय आदरपूर्वक आणि आस्थेने "मोदी कोण? ते कसे नेते आहेत ? त्यांच्यामुळे भारतात कायकाय बदल होतील ? आमचे नेते भारतात गेले आहेत , आता संबंध सुधारतील ना ?" अशी चौकशी केली …

माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शपथ-ग्रहण समारंभाला सार्क परिषदेच्या नेत्यांना बोलावले , साहजिकच या परिषदेचे सदस्य असणाऱ्या पाकिस्तान आणि श्रीलंका या देशाच्या प्रमुखाना आमंत्रण दिले गेले , यावरून नाराजीचा सूर आळवून आपले अज्ञान जाहीर प्रकट करणार्या महाभागाना सांगावेसे वाटते की या निर्णयामुळे अन्य देशात भारताचा मान आणि भारताविषयीचा आदर दुणावला आहे , पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी केलेली मच्छिमारांची मुक्तता हे या आदराचे प्रतिबिंब आहे !

इकडे जपान्यांना फार काही आस्था दिसली नाही. एकदोन जण म्हणाले की "हाँ हाँ तुमच्याकडे सरकार बदलले, इ. मोठी बातमी होती"
पण एक चिनी मात्र माझ्याशी उत्सुकतेने चर्चा करत होता. मग त्याचा जरावेळ क्लास घेतला. Happy