ओएलएक्स, क्विकर इत्यादीवर वस्तू विकायचे अनुभव/माहिती

Submitted by अश्विनीमामी on 14 May, 2014 - 07:18

मला घरातील जुने फर्निचर तसेच प्रिंटर एक टीव्ही आणि काही जुने सामान विकायचे आहे. यासाठी क्विकर्/ओले एक्स ह्या साइट्चा वापर करायचा आहे. पण माहिती आणि अनुभव नाही. फक्त जाहिराती पाहिल्या आहेत. असा व्यवहार करावा का? काय खबरदारी घ्यावी इत्यादी माहिती द्या.

आपले काही अनुभव अस्तील तरीही सांगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ओले एक्स वर आत्तापर्यंत दोन गोष्टी विकल्या आहेत : गोद्रेजचा लोखंडी बंक बेड कम स्ट्डी आणि वापरात नाही अशी विल्सनची टेनिस रॅकेट. फोन नंबर आणि इमेलआय्डी द्यावा लागतो. घराचा पत्ता ऑन्लाईन टाकायची गरज नाही तिथे मॅपवर मार्क करायची सोय आहे, तिथे मी जनरल एरियात मार्क केले होते. रॅकेट विकताना तर ग्राहकाला घरात घ्यायची पण गरज नव्हती. दार अर्धवट उघडून रॅकेट दाखवून पैसे घेऊन दार बंद. बेड्च्या वेळेस मात्र घरांत घ्यावे लागणार होते सो त्याला सांगितले होते दहा ते चारच्या आत यायला लागेल. transaction पक्क झाल्यावर advance घेतला तो दुसर्‍या दिवशी येऊन bed घेऊन जाणार होता त्याला परत त्याच वेळेच बंधन घातले. transaction done. Hope it helps. Happy व्यवहार कॅशनेच करावा. आपल्याला पैसे मिळाले की ग्राहकाचा नं. ब्लॉक केला तरी चालेलच Happy

मीओएलएक्स वर आमच्या घरातला एअर कूलर विकण्याची अ‍ॅड दिली होती. प्रचंड रिस्पॉन्स येतो. अर्थात उन्हाळ्याच्या दिवसांमधे दिली असल्यानेही असेल.

सतत फोन घेत बसण्याचे काम करायला लागते. लोकं अ‍ॅड पूर्ण न वाचता फोन करतात मग त्यांना बाकी माहिती पुन्हा पुरवावी लागते. दहा लोक नुसतीच माहिती विचारतात पण दोन लोकं घेण्यात नक्की इंतरेस्टेड असतात.

वस्तू बघायला येणार्‍यांना एक ठराविक वेळ द्यावी. विकत घेण्यात जेन्युईन इंटरेस्ट असेल तरच वस्तू बघायला घरी बोलवावे नाहीतर त्यांना वस्तूचे फोटो पाठवावे. तसे ते अ‍ॅडमधेही देता येतातच.

लोक घासाघिस करतातच. फोनवरुन ठरवतानाच फायनल किंमत ठरवून घ्यावी आणि कॅशमधेच व्यवहार करावा.

मी ओएलएक्स वर एक लाकडी कपाट आणि सोफा विकलाय. ओएलएक्स अत्यंत यूज़र फ्रेंड्ली आहे.
क्विकर थोडासा किचकट आहे. त्यात तुम्हाला अकाउंट वगैरे सुरू कराव लागत. आणि बर्‍याच स्टेप्स आहेत.
रिस्पॉन्स मला ओएलएक्स वर चांगला वाटला.

असंख्य अनोळखी माणसांना आपला फोन नंबर, पत्ता कळणार. त्यातली निदान १०% अनोळखी माणसं आपल्या घरी येऊन त्या वस्तू पाहून जाणार. फोन करणार. अशा प्रकारचे रिस्क घेण्याऐवजी ओळखीतल्या कोणाला तरी अथवा एखाद्या संस्थेला या वस्तू देऊन टाकणे / थोडक्या पैशात विकून टाकणे मला तरी योग्य वाटते.

मामीशी सहमत आहे.मी स्वतः अशा वस्तू या संस्थांना वा माहितीतील व्यक्तिला दान वा अल्प किंमतीत दिल्या आहेत.परंतु प्रत्येक वेळी हे शक्य होत नाही अशा वेळी काही सावधनता बाळगून ओलेक्स वर विकायला काहीच हरकत नाही.

मला बेडसाठी दोन फोन आले, त्यातल्या एकाने बघून विकत घेतले आणि रॅकेटसाठी एकच फोन आला आणि विकत घेतले.

मीसुद्धा ओएलएक्सवर बर्‍याच अन्वॉन्टेड (फर्निचर-टेबल, स्टोरेज कॅबिनेट्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू - कॉम्प्युटर रिलेटेड, एअर कूलर) गोष्टी विकल्या आहेत. फार चांगली सोय आहे ही.
चांगला प्रतिसाद येण्यासाठी जाहिरातीत वस्तूचे वर्णन नीट करावे, वेगवेगळ्या अँगलमधून वस्तूचे फोटो अपलोड करावे आणि आपला फोन नं द्यावा. (किंवा फोन नंबर इंटरनेटवर जाहीर करायचा नसल्यास फक्त ईमेल देऊन चालेल. इंटरेस्टेड लोक फोन न> दिसला नाही तर जाहिरातीखाली दिलेल्या मेसेजच्या सोयीने तुमच्याशी ईमेलवर संपर्क साधू शकतात. मग फक्त तेवढ्याच लोकांना फोन नं. देऊ शकतो). स्वतःचे खरे नाव जाहिरातीत देऊ नये. नंतरसुद्धा फक्त पहिले नाव सांगून चालेल.

जाहिरातीत लोकेशन नमूद केल्याने चांगला रिस्पॉन्स मिळतो हा माझा अनुभव. उदा. मी "लोकेटेड इन मुलुंड" असं अगदी जाहिरातीच्या शीर्षकातच देते त्यामुळे मुलुंडच्या जवळपासच्या संभाव्य ग्राहकांची नजर जाहिरातीकडे पटकन वळते. कारण बर्‍याचदा वस्तू आवडली तरी (ती मोठी असल्यास) तिची ने-आण करणे (ट्रान्सपोर्टेशन), वेळ इ.बाबींचा विचार ग्राहक करतातच त्यादृष्टीने स्वतःच्या घराच्या जास्तीत जास्त जवळ असलेल्या वस्तूंचा विचार ग्राहक करतात. बर्‍याच लोकांचा रिस्पॉन्स आल्यास 'हाजीर तो वजीर' हा न्यायाने वस्तू विकाव्या. (विशेषतः फर्निचरला फार बायर्स असतात.)

किंमत (फिक्स्ड्/निगोशियेबल) आधीच ठरवावे. (एकदा एका इंटरेस्टेड बाईने घरी आल्यावर तिथेच किमतीची हुज्जत घालत फुकट माझा वेळ घालवला. फोनवर किंमत स्पष्ट सांगूनदेखील. अर्थात असा अनुभव एकदाच आला. हे आधी तीनतीनवेळा फोन वर बोलून घ्यावे) तसेच वस्तू घेऊन जाण्याची जबाबदारीदेखील ग्राहकाचीच असेल असे सांगावे. बरेचदा ग्राहक ऑफिसमधून परस्पर वगैरे येऊन वस्तू 'बघून' जाऊ शकतात. त्याची तयारी हवी. ग्राहकाने वस्तू 'होल्ड' करायला सांगितल्यास अ‍ॅडव्हान्स घ्यावाच. सर्व व्यवहार कॅशमध्येच करावा.

आता पटकन इतकं आठवलं. आता एका महिन्यापूर्वीच अशी काही विक्री केली. क्विकरचा अनुभव नाही.