इशरत प्रकरणात अमित शहा यांना क्लीन चिट

Submitted by नितीनचंद्र on 7 May, 2014 - 06:07

AMIT SHAH 2.jpg

२६ मार्च २०१४ रोजीची महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेली ही बातमी व त्याची खालील लिंक पहा

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Ishrat-case-Court-grants-t...

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातचे माजी गृहमंत्री अमित शहा यांच्या समोरील अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. २००४मधील इशरत जहाँ एन्काउंटरप्रकरणी शहा आणि माजी पोलिस महासंचालक के. आर. कौशिक यांना दोषी ठरविण्यात यावे, अशा आशयाची याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची दखल घेताना कोर्टाने सीबीआयला आपले म्हणणे मांडण्यासाठी २५ दिवसांचा अवधी दिला आहे.

इशरत जहाँ एन्काउंटर प्रकरणात झालेल्या गोळीबारात ठार झालेल्या प्राणेश पिल्लई ऊर्फ जावेद शेख याचे वडील गोपीनाथ पिल्लई यांनी ही याचिका दाखल केली आहे. विशेष सीबीआय जज गीता गोपी यांच्यासमोर या प्रकरणाची बुधवारी सुनावणी झाली. यावेळी सीबीआयने म्हणणे मांडण्यासाठी तीस दिवसांची मुदत देण्याची विनंती केली. सीबीआयच्या विनंतीवर याचिकाकर्त्यांचे वकील शमशाद पठाण यांनी आक्षेप घेतला. 'संबंधित संशयितांच्या विरोधात सीबीआयकडे सर्व पुरावे असतानाही त्यांना अतिरिक्त वेळ देण्याची गरजच काय,' असा सवालही त्यांनी केला.

'सध्याची परिस्थिती पाहता, निवडणुकीच्या काळात शाह आणि कौशिक या प्रकरणातील साक्षीदारांना इजा पोहोचवू शकतात,' असेही पठाण आणि पिल्लई यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्या वेळी कोर्टाने तपासी यंत्रणेची बाजू घेत संशयितांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची घाई न करण्याविषयी बजावले. सबळ पुराव्याविना कोर्ट कोणताही निर्णय देणार नसल्याचेही न्यायाधीशांनी स्पष्ट केले. अखेरीस, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन कोर्टाने सीबीआयला भूमिका जाहीर करण्यासाठी २५ दिवसांची मुदत दिली. अमित शहा यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ एस.व्ही. राजू, तर कौशिक यांच्या वतीने अॅड. जे. आर. दवे यांनी बाजू मांडली.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

करायला गेलो एक अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे. या प्रकरणात आपल्याजवळ कोणताही पुरावा नाही असे सी. बी आय ने सांगीतल्याबरोबर अमित शहा यांना क्लीन चिट मिळाली आहे.

प्रश्न आहे १५ जुन २००४ साली झालेल्या इशरत जहॉ प्रकरण "आय बी"जे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे व गुजराथ सरकार यांच्या सयुक्त कारवाईत घडले असताना आणि २२ मे २००४ पासुन काँग्रेस केंद्रार सत्तेत असताना आणि त्यांचाच गृहमंत्री जो आय बी ला जबाबदार असताना फक्त अमित शहा यांच्यावर आरोपपत्र दाखल होते ही खास काँग्रेसी राजकारणाची बाब आहे.

इशारत शहा प्रकरणात जितके आरोप भाजप प्रणीत गुजराथ सरकारवर झाले आणि केंद्र सरकारचे नाव कुठेच आले नाही. बदल्याचे राजकारण किती टोकाचे असेल की आज पर्यंत कोणत्याही राज्य सरकारच्या गृहमंत्र्याला जेव्हाकी केंद्र सरकार या निर्णयात सामील असताना कधीच आरोपपत्राला सामोरे जावे लागले नाही.

महाराष्ट्रात गुंडगिरी संपवण्यासाठी अनेक वेळा इन्काँउटर केले गेले. दिल्लीतही असेच झाले. यात पोलीस अधिकारी यांना निदेश गृह खात्याकडुन दिले जातात. पोलीस अधिकारी आपल्या अनुभवाचा वापर करुन ती कारवाई करतात. यात गृह मंत्र्यावर गुन्हा दाखल होण्याची पहिलीच वेळ.

खरा गमतीचा भाग असा आहे की ही इशारत जहॉ ( श्री विजय याची क्षमा मागुन ) त्या अतिरेक्यांबरोबर काय करत होती यावर कोणीच प्रकाश टाकत नाही. फक्त तिच्यावर एकही गुन्हा दाखल नव्हता हाच आरडा ओरडा केला जातो.

हे आरोपपत्र नेमके निवडणुकीच्या तोंडावर कसे दाखल होते ? ही खास बदल्याच्या राजकारणाची निती असावी. यात कोर्टाने घाईघाईने आरोपींना कोर्टात हजर केले जाउ नये असा आदेश दिल्याने अमित शहा यांना प्रचारात भाग घेता आला हे सांगणे नको.

काँग्रेसचे दिवस भरले आहेत. आता फक्त निवडणुकीचे निकाल येणे बाकी आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद विजय जी. इशरत प्रकरणात अमित शहा जास्त चर्चेत आले त्यामुळे असे झाले असावे. चुक सुधारतो.

गुजरातचे माजी गृहमंत्री आदरणीय अमित शहा यांचे हार्दिक अभिनंदन. सोने तावून सुलाखूनच अधिक चमकून उठते तशी यांची राजकीय कारकिर्द चमकूदे अशा शुभेच्छा.

ही इशारत जहॉ त्या अतिरेक्यांबरोबर काय करत होती यावर कोणीच प्रकाश टाकत नाही. फक्त तिच्यावर एकही गुन्हा दाखल नव्हता हाच आरडा ओरडा केला जातो.>> +१००००००
कदाचित इशरत त्या अतिरेक्याला पोलिसांच्या तावडीत देण्यासाठी त्याच्यासोबत होती. हो की नाही रागा?

भाजपच्या कारकिर्दीत घडलेल्या अनेक गोष्टींवर काँग्रेस असाच कालवा करत आहे. स्वतः जिथे जिथे जेव्हा जेव्हा सत्तेवर होते तेव्हा तेव्हा तिथे तिथे काय झाले त्याबद्दल मात्र मी नाही केले ते.. उस वक्त मै तो छोटासा नन्हासा प्यारासा बच्चा था |

नितीनचंद्र,

सोहराबुद्दीन शेख आणि त्याची बायको कौसरबी यांच्या प्रकरणातही सदैव गुजरात पोलिसांना धारेवर धरण्यात येतं. प्रत्यक्षात ती गुजरात व आंध्र पोलिसांची संयुक्त कारवाई होती (इंग्रजी दुवा). आंध्र पोलिसांचं कोणी नावही घेत नाही.

आ.न.,
-गा.पै.

For America Suspect Terrorist is a "Terrorist"

गेल्या कित्येक वर्षा पासुन चाललेल्या या प्रकरणात दोन पाकिस्तानी अतिरेकी सुद्दा सामिल होते हेच सर्व सामान्य लोक विसरले होते.

ज्या पक्षातील नेते अतिरेक्यांना ओसामा लादेनजी, कसाबजी अस संबोधतात तिथे आणि काय होणार ?

देशा पेक्षा अतिरेकी मोठे !!

गडकरींची माफी, अमित शहांची "सबळ पुरावा नसल्याने" सुटका ई. ई. पोष्टी टाकणार्‍या दक्ष लोकांची नितीन आगे प्रकरणावर एकही पोष्ट नसावी... हर हर....!! Sad

पोष्ट नाही, धागा काढला नाही याचा अर्थ आम्हाला त्याबद्दल काहीच वाटत नाही हा तुमचा गैरसमज आहे. घटना इतकी घृणास्पद आहे की त्याबद्दल सगळ्यांनाच चीड व दु:ख आहे. पण हा विषय इतका संवेदनशील आहे म्हणून धागा इतर काढला नसावा. मात्र, दुसर्‍यांना सांगताना तुम्ही स्वतः त्यावर स्वतंत्र धागा नाही काढलात हे सोयिस्कररित्या विसरता आहात.

सडेतोड,

>> ... दक्ष लोकांची नितीन आगे प्रकरणावर एकही पोष्ट नसावी... हर हर....!!

मा. प्रशासकांनी द्विरुक्ती करू नका म्हणून ताकीद दिली आहे. या घटकेला मला ती लागू पडत नाही. मात्र खबरदारी म्हणून संदर्भ दिलेले चालतील का असं विचारलं आहे. होकारार्थी उत्तर गृहीत धरून माझ्या प्रतिक्रियेचा दुवा देतोय : http://www.maayboli.com/node/47735?page=6#comment-3105686

आ.न.,
-गा.पै.

टीप : प्रशासकांना द्विरुक्ती वाटल्यास खुशाल हा संदेश उडवावा. परत आगळीक होणार नाही.

क्लिनचीट मिळाली ? व्वा व्वा मग काय फटाके फोडतात का?
तसे क्लीनचीट तर बोफोर्स मधे राजीव गांधी ८४ मधे टायलर इ. पण मिळाली आहे .मग यांच्या नावाने शंख फुकणे बंद करा Wink
काँग्रेसला क्लिनचीट मिळाली तर गडबड बाकी शहासारख्याला मिळाली तर तो न्याय हे बुजगावणे फिरवणे बंद करा Rofl

मायबाप सरकार,

हा मुद्दा माझ्या दृष्टीने २६ मार्च २०१४ लाच संपला. आता कोणी खाजवुन काढत असेल तर आम्ही ( भाजप प्रेमींनी ) का गप्प बसाव ?

काँग्रेसजनांना आता मुद्यांची कमतरता आहे हे या निमीत्ताने जाणवले. कॉंग्रेस संसदीय पक्षाची या मुद्यावर पलटी झाली आहे कारण इशरत प्रकरणात काँग्रेसने आपले शपथपत्र बदलले हे भाजपने पुढे आणले.

अजुन नाचक्की करुन घ्यायची असेल तर मार्ग मोकळा आहे.

नाचक्की भाजपाची झाली आहे अर्थात तुमचीच झाली आहे. ते शपथपत्र बदलले नाही तर त्यातल्या उणीवा दुर केल्या आहे असे चिदंबरम यांनी स्पष्ट "हो-ना" वगैरे न करता सांगितले आहे त्यामुळे भाजप्यांना उडवायचा मुद्दाच मिळाला नाही. स्वतःचा बुमरंग नाकावर आपटल्यामुळे भाजप्यांकडून शपथपत्राचे तुणतुणे नाचवणे बंद झाले Wink
वर हेडली ने सुध्दा नंतर एनआयटीवाल्यांनी मी सांगितल्याप्रमाणे लिहून घेतले नाही असे स्पष्टीकरण सुध्दा दिले. आधी हेडलीला देशभक्त म्हणून डोक्यावर नाचणार्‍या भाजप्यांनी नंतर त्याला गुपचूप कोनाड्यात ठेवून दिला यात नाचक्की कुणाची झाली नितीन? Rofl
भाजप्यांची कितीही नाचक्की झाली तर बोंबलायचे मात्र कमी होत नाही Wink
लवकर बरे व्हा. आणि हो अजुन नाचक्की करून घ्यायची असेल तर सांगा आम्ही दिलखुलास करु Wink