एक होता सेल्स Engineer - सत्यकथा

Submitted by अमित M. on 21 April, 2014 - 07:10

मुंबई. एप्रिल २००३. ऐन मध्यानीचा धगधगता सूर्य ! टळटळीत उन्हात मी आपला customer ची वाट पहात होतो. हातात चहा होता..सकाळपासूनचा ७ वा किंवा ८ वा आणि रात्रीच्या आधीचा ७ वा - ८ वा चहा पीत होतो. दिवसाला कमीतकमी १२-१३ कॅप चहा व्ह्यायाचाच म्हणजे घ्यावाच लागयचा आग्रहापाई. सेल्स मार्केटिंग मध्ये सिगरेट,चहा, दारू आणि customer हीच प्रमुख व्यसने. एव्हढ्यात शेजारी सिगरेटचा वास आला. शेजारी पाहिलं तर एक नीटनेटका - फार नटलेला नसला तरी टाप टीप असा एक माणूस. त्याने, मला पाहून स्मित हास्य केल मी ते त्याला परत केल. आठवणीची tube पेटली. म्हणल अरे हा तर तोच. आपल्यासारखाच पोटासाठी भटकणारा....हा मला बरेच वेळा या client कडे दिसायचा. माझ नि त्याच direct dealing काहीच नव्हत किंवा ना आम्ही एकमेकांचे competitor होतो. जेव्हा केव्हा ह्या customer कडे मी जायचो तेव्हा भेट व्हायची पण कधी आवर्जून बोलण असं झालं नव्हत. त्यालाही उस्तुकता असावी, त्याने बोलण सुरु केल. मी कुठला तू कुठला हि औपचारिकता झाली आणि इतक्यात customerसाहेब (मनातल्या मनात गिर्हाईक :)) आले आणि गप्पा आटोपत्या घ्याव्या लागल्या. माझी नि त्याची हि पहिली भेट. त्याच नाव रवी, तोहि Sales Enginee आणि पुण्याचाच आशी माहिती पुढे आली. त्यानंतर आमच्या बर्याच भेटी झाल्या. आम्ही आमच्या काम धंद्याच्या गप्पा सुरुवातीला टाळत असू पण नंतर संवादातली औपचारिकता कमी झाली आणि मोकळेपणे आम्ही विचारांची देवाण घेवाण सुरु केली.

३-४ भेटीपर्यंत मला त्याची Background फार कधीच समजली नाही पण एक प्रकर्षाने जाणवलं कि त्याचा शालेय आणि कॉलेज जीवनात अभ्यासाकडे फार ओढा नसावा त्याचा किंवा त्या क्षेत्रात विशेष गती नसावी. मी एक दोनदा तो विषय काढायचा प्रयत्न केला पण त्याने तो टाळला म्हणून मी पण फार पुश नाही केल. त्याच्या बोलण्यातून मला एक नक्की जाणवलं कि त्याच्या पूर्वीच्या आणि आताच्या विचारात, आवडीनिवडीत बरयापैकी फरक पडलाय. काही वर्षांपूर्वीचा तो आणि आताचा तो यामध्ये खूप तफावत आली असावी. Overall हा माणूस happy go lucky निघाला. सध्या जे काही चालु आहे ते फार काही छान नाही पण वाइट नक्कीच नाही. आजच भागतय, उद्याच उद्या बघू आणि परवाच परवा असा त्याचा approach होता. Enjoy the present and dont care about future. क्रिकेट, soccer हे त्याचे जिव्हाळ्याचे विषय. आम्ही प्रामुख्याने क्रिकेटवर बोलत असू किंवा फार फार तर हल्लीच राजकारण. असाच एकदा बोलता बोलता खेळाडूंच्या girlfriend चा विषय निघाला नि मी गाडी त्याच्या लग्नाच्या track वर आणली. तसाही तो माझ्यापेक्षा ३-४ वर्षांनी मोठा असल्याने हा प्रश्न परत येणार नाही याची खात्री होती. मी म्हणालो 'काय साहेब लग्न बीग्न काही आहे कि नाही का तिथ पण आजच आज उद्याच उद्या ?' त्याने एक स्मितहास्य केल आणि म्हणाला छे रे लग्न इतक्यात नाही करणार, आधी पैसा मिळवायला हवा बाकी नंतर सगळ..
मी: अरे पण म्हणून काय पैसा हातात येईस्तोवर थाबशील?
तो: मग काय फरक पडतो..आज नाही तर उद्या फार फार तर 8 वर्ष आणि एकदा पैसा आलं कि लग्न व्हायला किती वेळ लागतो.
मी: बापरे तुझ्या patience ची दाद द्यावीशी वाटते
तो: कसला patience ! अजून ८ वर्ष फक्त
(हां ८ वर्षांचा काय हिशेब होता हे मला कधीच समजल नाही)
मी:अरे म्हजे तू इतकी वर्ष थांबायला तयार आहेस तुझ्या जोडीदारासाठी ?
तो:छे छे मी अस कुठे म्हणालो!
मी: म्हणजे ?
तो: अरे एखादी पोरगी पटवेन. She will be my partner. अजून काही वर्ष थांबली तर ठीके नाहीतर पुढच पुढे

रवि दिसायला रुबाबदार होता. अगदी अक्षय कुमार नसला तरी गोरा, उंच, तरतरीत नाक असा ऐटबाज होता आणि त्याला मुंबईसारख्या ठिकाणी मुलगी सहज भेटली असती. तरी देखील त्याच हे विधान आणि विचार ऐकून मला थोडा धक्का बसला. ह धक्का मला होता का माझ्या मनातल्या त्याच्या image ला होता देव जाणे. घरी येऊन विचार करू लागलो कि अरेच्या, हा तर पु ल न चा नाथा कामत निघाला. पण जे काही असो, याचे विचार clear होते. मत ठाम आणि परखड होती. शिक्षणपद्धती आणि आरक्षण यावर तर विलक्षण पोटतिडकीने बोलायचा. शिक्षण क्षेत्रातसुधा जातीच राजकारण आणणाऱ्या लोकांचा तर तो कधी तरी खरोखरच जीव घेईल अशी शंका येण्याइतका चिडायचा. 'असल्या भडव्याना हत्तीच्या पायाखाली द्या किंवा बाजारात नेऊन विका' हे त्याचे patent वाक्य. आज कालची शिक्षण पद्धती, रूढी, परंपरा, देव, श्रद्धा सब झूट होत त्याच्यामते. आपल्या घरातले संस्कार, पिढ्यान पिढ्या चालत आलेले शिकवण वगैरे सगळ बदलल पाहिजे हे त्याच ठाम मत. हि बेफिकीर आणि out of the box वृत्ती माझ्या पुणेरी स्वभावाला अजिबात झेपली नाही. त्यामुळे तो विषय मी तिथेच सोडला आणि मोर्चा जरा वेगळ्या विषयावर नेला. लग्न, संसार, मुली वगैरे विषय काढले कि बेदरकार रंगेल उत्तर, पुढे काही शिक्षण वगैरे म्हणल कि उदासीनता कारण त्याच्यामते अभ्यास वगैरे त्याच्याहातून यापुढे होण शक्य नव्हत. बर, चांगली नोकरी धंदा हा विषय काढला कि परत उडवाउडवीची उत्तर. थोडक्यात त्याचा आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन गंभीर असेल हा माझा अंदाज त्याने पार धुळीस मिळवला होता आणि क्रिकेट, राजकारण आणि दोघेही मुळचे पुण्याचे एवढाच काय माझा नी त्याच्यामधला common interest राहिला होता. पण खर तर त्याला पुण्याबद्दलहि फार आस्था नव्हती उलट त्याच्या तोंडून बरेचदा टुकार पुणेरी वृत्ती आणि सुमार mentality असेच शब्द ऐकले होते. एकदा मी त्याला म्हणालो कि अरे पण आई बाबाना वाटणारना कि तू पुण्याला येऊन स्थाईक व्हावस, त्यांना तुझा संसार बघायचा असेल, नातवंड पहायची असतील. त्यावर तो म्हणाला होता "बरोबर आहे पण इलाज नाही पोटा पाण्यासाठी दाही दिशा कराव्याच लागणार. पैसा हवा..आधी पैसा बाकी सब तो हैही. माझा भाउपण असतो पुण्याला. तो चांगल्या कंपनीत कामावर आहे त्याच्या लग्नच चालू आहेच सध्या." झाल, माझा शेवटच प्रयत्नहि फसला आणि नंतर मी तो नाद सोडून दिला.

त्यानंतर आम्ही 2-3 वेळा भेटलो. गप्पा तशा मोघम असायच्या. पण हाय हेल्लो पाउस-पाणी नक्की व्हायच. गम्मत म्हणजे आम्ही दोघे पुण्यामध्ये कधीच एकमेकांना भेटलो नाही . तो देखील माझ्यासारखा न चुकता शनिवार रविवार पुण्याला जायचा. त्याला प्रत्येक शनिवार-रविवार सुटी मिळायची आणि मला 2nd - 4th शनिवार. तो जायचा दुपारच्या सह्याद्री किवा सिंहगड ने आणि मी जायचो त्यानंतरच्या Dadar-chennai ने . त्यामुळे ट्रेनमध्ये पण कधी भेट नाही. मी त्याला 1-2 वेळा रविवारी क्रिकेट खेळायला बोलावलं होतं पण तो आला नाही. त्यानेही मध्ये अधे job swtich केला आणि त्याला मुंबईतच एका companyt वरची जागा मिळाली. त्यानंतर बरेच दिवस म्हणजे almost 4-5 महिने आमची भेट नाही झाली. दरम्यान मला देखील पुण्याला IT मध्ये नोकरी मिळाली. मी मुंबई सोडायला 2-3 दिवस बाकी असताना आमची भेट झाली. त्याला समजल कि मी नोकरीनिमित्त पुण्याला परत चाललो आहे आणि एकदम त्याच्या चेहऱ्यावर अगदी वाचता येण्यासारखी एक वेगळीच लकेर उमटली. तो क्षणभर काहीच बोलला नाही. पण लगेच स्वताला सावरुन त्याने माझ अभिनंदन केल. All the best म्हणून तो निघून गेला तरी त्याची ती अवस्था माझ्या नजरेतून सुटली नव्हती . ती माझी आणि रवीची आजपर्यंतची शेवटची भेट! त्यानंतर आजतागायत आम्ही कधीच भेटलो नाही. तसे एकमेकांचे फोन नंबर होते आमच्याकडे पण कधी फोन झाला नाही. त्याची अधूनमधून आठवण नक्की व्हायची.

नंतर नंतर आठवणीही पुसट व्हायला लागल्या आणि मी पण नव्या नोकरीच्या नवलाईत हरवून गेलो. एकेदिवशी copanychya बसमधून परत येताना एका मित्रासोबत गप्पा मारत होतो. तो कुठे राहतो ते समजल्यावर मला एकदम रवीची आठवण झाली आणि वाटल कि हा रविला कदाचित ओळखत असेल. मी त्याला राविविषयी विचारलं तर तो म्हणाला कि तो रविला लहानपणापसून ओळखतो पण एवढ्यात त्यांची अजिबात भेट नाही झाली. अस म्हणून त्यानेच मला विचारल कि रवी काय करतो सध्या म्हणून. त्यानंतर त्याने मला रविची compelte history ऐकवली : "रवि लहानपणापासून त्यांच्या गल्लीतला आदर्श मुलगा. जात्याच हुशार. हुशारी वागण्या बोलण्यातून जाणवायची. वर्गामध्ये कायम प्रथम क्रमांक. चौथित scholership मिळालेली तर सातवीची scholership थोडक्यात हूकलेली. प्रज्ञा प्राविण्य परिक्षा उत्तीर्ण. शैक्षणीक यशासोबत खेळातही चागलच यश मिळवलेल. cricket,chess हे फार आवडीचे. हे कमी होत म्हणून कि काय तो तबला आणि पेटीहि उत्तम वाजवायचा. आमच्या भावे प्राथमिकच्या साने सरांच्या बैंडमधला लाडका विद्यार्थी" मी फक्त स्तब्ध, अचंबित, स्तंभित वगैरे वगैरे होऊन हे सगळं ऐकत होतो. तो पुढे सांगू लागला "10 vit त्याच्याकडून बोर्डात येण्याच्या अपेक्ष होत्या . ह्याला 90% मार्क मिळाले पण बोर्ड हातच गेल. घरच वातावरण तंग होत." मला गमंत वाटली 90% पडले म्हून घरचे लोक दु:खी!!!! . "पुढे ११वित ह्याला चांगल्या college मध्ये admission मिळाली , नवीन मित्र मिळाले, तारुण्याची चाहूल लागली आणि इथून सगळी चक्र उलटी फिरायला लागली. वयात आल्यावर घरातली पारंपारिक सनातनी बंधन जाचक वाटायला लागली. नवीन मैत्रीने बाहेरचे दरवाजे उघडले. आजपर्यंत घराच्या चौकटीत राहिलेल्या रवीच्या इच्छा - अकांक्शाना आता पंख फुटू लागले होते. त्याच्या महत्वाकान्क्षेला दरवाज्यापलीकडे झेपावास वाटत होत. अर्थातच मन घराबाहेर जास्त रमू लागल. ही धुंदी ओसरतीय तोवर 12 विची परिक्षा आली. Enginerring ला admissionchi स्वप्न पाहणाऱ्या रवीच्या घरच्यांनी त्याच्यावर अपेक्षांचे ओझ याआधीच लादून झाल होत. रवीसुद्धा प्रयत्न करत होता पण पुर्वीसारखा अभ्यास होत नव्हता. मन स्थिर रहात नव्हत, विचार केंद्रित होत नव्हते. घरची परिस्थिती रविला देखील माहिती होती. वडील बँकेत साधारण कर्मचारी. कमवणारे एकटेच आणि घरात आई, मोठा भाऊ, आजी-आजोबा असे सारे. हे त्याला समजत होत उमजत होत आणि म्हणूनच रव्या उभा होता, इंच इंच लढवत होता" "परिक्षा झाली यथावकाश निकाल पण लागला. निकाल अर्थातच रवीच्या विरुद्ध. बरे म्हणता येण्याइतपतच मार्क मिळाले. राविलाच जिथे रडू आल तिथे घरच्यांचं तर काय. त्यांनी अगदीच सुतकी चेहरा केला. ह्या मार्कांवर देखील रविला engineeringला admission मिळाली असती पण पैसे भरून..जे विचारांच्या पलीकडे होत. शेवटी BSC -MSC ला admission शिवाय पर्याय राहिला नव्हता." माझा मित्र बोलत होता आणि एव्हाना बस डेक्कनला आली होती आणि गोष्ट अजून अपुरीच होती. मित्र पुढे सांगू लागला "रवीने हिम्मत सोडली नाही. उपजत गुणामुळे तो उत्तम मार्कांनी BSC - MSC झाला पण घरी कोणालाच फार कौतुक नव्हत. कारण त्यांच्या मते बाकीच हुशार जग त्यावेळी या ना त्या प्रकारे engineering करत होत. MSc होऊनही रविला चागली नोकरी मिळत नव्हती. म्हणून त्याने सरतेशेवटी शिक्षकी पेशा निवडला. पण त्यातही मन रमेना. विलक्षण नैराश्य आणि वैताग येऊ लागला. शेवटचा उपाय म्हणून त्याने एक छोटीशी नोकरी करता करता MBA चा अभ्यास केला आणि तो MBA झाला." "सुदैवाने लगेचच त्याला मुंबईत एक नोकरी मिळाली आणि तो पुणे सोडून मुंबईत स्थाईक झाला. त्यानंतर काही मला त्याची फार माहिती नाही" अर्थात मीपण फार काहीच बोललो नाही. कारण या कॅसेट चा 'बी' पार्ट मला माहिती होता. एव्हाना माझा stop मागे गेला होता मी २ stop सोडून माझ्या मित्रासोबत त्याच्या stopवर उतरलो. त्याने लांबूनच मला रवी राहतो ती बिल्डिंग दाखवली. त्याचा निरोप घेऊन मी एकवार त्या इमारतीकडे पाहिलं. माझा काही एक संबंध नसताना उगाचच मला शाळेत पहिला नंबर आल्यावर धावत घरी येणारा रवी आठवला आणि मग भिक्कार - टुकार mentality अस म्हणत कायमचा मुंबईत गेलेला रवी आठवला. अर्थात मध्ये खूप सारया घटना घडून गेल्या होत्या. मला सुद्धा माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली होती. तेवढ्यात त्या इमारतीतून एक वार्धक्याकडे झुकलेल जोडप बाहेर आल. त्यांना एकवार निरखून मी निमुटपणे त्या बिल्डीन्गकडे पाठ फिरवली आणि माझ्या घराकडे चालू लागलो ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेवढ्यात त्या इमारतीतून एक वार्धक्याकडे झुकलेल जोडप बाहेर आल. त्यांना एकवार निरखून मी निमुटपणे त्या बिल्डीन्गकडे पाठ फिरवली आणि माझ्या घराकडे चालू लागलो ...

.
कोन होति ति???????

प्रसन्न, निशा धन्यवाद !

प्रसन्न हि खरि खुरि घटना/कथा आहे अणि जशि घडलि तशि सन्गायचा प्रयत्न केला Happy

निशा, मी असा समज करुन घेतला कि कदचित तेच रविचे आइवडिल असावेत. नक्कि कोण होते ते मला माहित नाही.

छान लिहिले आहे....

माझे रवि बद्दल चे मत इथे मांडते : तो हुशार होता पण त्याला त्याचि हुशारि दुसर्या गोष्टिंतून दाखवायचि होति हे त्याच त्याला हि कळल नाहि.पण घरचा दबावाला तो बळि पडला शिवाय सगळ खापर हि त्याचा डोक्यावर.आत्ता त्याला हव तस तो जगतोय हे सगळ्यात उत्तम करतोय Happy

अवांतर : आपल्या सुशिक्शित म्हणुन घेणार्या या समाजामध्ये,बरीच मुल ह्यातुन जातात.मि हि मला कुठेतरि ह्यात दिसले.पण एक ठरवलय्,हे आपल्या मुलीचा बाबतीत नाहि घडु देणे.अवांतराबद्दल माफ करा

गोपिका तुमच म्हणण अवंतर नक्कीच नाही उलट अगदी मनातल बोललात. आपण सगळेच किंवा आपली पिढी ह्या असल्या परिस्थितीतून गेली आहे. पण आपल्या मुलांच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे.
बाकी रवी ला जेव्हाजेव्हा भेटलो बोललो ते ऐकून मला वाटत की परिस्थितीशी झगडून शेवटी तो मुर्दाड झाला. जास्त भावनाशील न होता त्याने आपले विचार बदलले आणि तो प्रॅक्टिकल झाला. पण मनाच्या एका कोपर्या्त आेलाव्यावर आठवणींच शेवाळ असाव कुठेतरी !!