Minestrone soup- ऑलिव्ह गार्डन स्पेशल

Submitted by सुपरमॉम on 15 April, 2014 - 20:01

मला ऑलिव्ह गार्डनचे हे सूप प्रचंड आवडते. रेसिपी नेटवर जशीच्या तशी मिळाली नाही. एकदोनदा प्रयोग पुरता फसला. टोमॅटो वापरले तर हवीतशी चव आली नाही. मग बरेचदा फेरफार करून, बहिणीशी चर्चा करून, प्रयोग केले तेव्हा त्यातल्या त्यात जवळ जाणारी चव आली. मुख्य म्हणजे झटपट होते. भाज्या खायला कुरकुर करणार्‍या लेकालाही खूप आवडतं हे सूप.
साहित्य

झुकिनी- जाडसर गोल चकत्या करून
कांदा- लांब पातळ स्लाईसेस
सेलरी- बारीक चिरून
ग्रीन बीन्स- तुकडे करून
या सर्व भाज्या आवडीप्रमाणे
लसूण बारीक चिरून- तीन मोठ्या पाकळ्या
एक कॅन रेड बीन्स(उकडलेला राजमा चालेल)
शिजवलेला पास्ता- एक वाटी
ओरेगानो- एक छोटा चमचा(टी स्पून)
बेसिल- दोन टी स्पून
जवळपास अर्धी बाटली पास्ता सॉस(Bertolli organic ची खूप छान चव येते. पण इतरही ब्रँड चालतील)
चवीप्रमाणे मीठ व मिरपूड

एक चमचा ऑऑ गरम करावे. त्यात तुकडे केलेला लसूण घालून परतावे. फार लाल होऊ देऊ नये. मग त्यात कांदा घालावा. थोडावेळ परतावे. कांद्याचा कच्चा वास गेला की इतर भाज्या घालून थोडे परतावे. मग झाकण ठेवून शिजवावे. गाळ होऊ देऊ नये.
मग पास्ता सॉस, ओरेगानो व बेसिल घालावे. रेड बीन्स व पास्ता घालावा. चवीप्रमाणे मीठ व मिरपूड घालावी. अंदाजाने सूपची कन्सिस्टन्सी येईल इतके पाणी घालून मंदाग्नीवर उकळू द्यावे. खायला देताना वर चीज भुरभुरावे.
आवडीच्या ब्रेड वा ब्रेड स्टिक्स बरोबर गरमगरम भुरकावे. मी होल व्हीट फ्रेंच ब्रेड घेतली.

खूप कमी तेलाचा व हेल्दी मेनू होतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही आवडतं हे सूप. मागे एका कलीगच्या बायकोने रेसिपी दिली होती. मी कधी केलं नाही पण सगदी ऑलिव्ह गार्डनच्या सूपसारखी चव येते असं म्हणाल्याचं आठवतं आहे.

अरे वा. मीही ऑलिव्ह गार्डनच्या मिनिस्ट्रोनची फॅन. (पण त्यातला सोडिअम कन्टेन्ट बघाल तर बीपी वाढेल. :P)
असं करून बघेन. Happy

धन्स सख्यांनो.

पास्ता सॉस घालायची कल्पना माझी बहीण मायबोलीकर स्नेहा हिची. यात वाईनही घालतात थोडी असे नेटवर कुठेतरी वाचल्याचे आठवतेय. मी घातली नाही कधी.पण न घालताही हे सूप मस्तच होतं.

मध्यंतरी सोबत गार्लिक ब्रेडस्टिक्स पण घेतल्या होत्या एकदा. सुन्दर लागतात पण स्वाती म्हणते तसेच सोडियम भरपूर होते त्यातही.

खरंतर मला हे सूप ब्रेडशिवायही खूप आवडते. राजमा नि पास्ता असल्याने कार्ब्ज ची गरज भागतेच.

ह्याला स्लो कूकर मधे पण करता येतं..सगळे पदार्थ मिक्स करा, कूकर मधे ढकला. तेल घालायची गरज नाही.वेज ब्रॉथ घाला, अजून छान चव येते.. पास्ता सॉस नसेल तर टोमॅटो प्युरी आणि इटालियन हर्ब मिक्स घाला.(फक्त पास्ता शेवटच्या ३० मिनिटांमधे घाला ).ही नवर्‍याची रेसिपी..
आणि मस्त थंडी असताना करा, सूप कुकर मधे होत आलं की उबदार वास पसरतो घरामधे Happy