अमेरिकेतील शाळांमधील गुन्ह्यांचे वाढते प्रमाण

Submitted by केदार on 10 April, 2014 - 10:36

२०१४ वर्ष सुरू झाले तेंव्हा कोणालाही वाटले वाटले नसेल की पहिल्या १४ दिवसात, अमेरिकेतील शाळांमध्ये ७ वेळेसे शुटिंग होईल ! आयमिन ७ आणि ते पण जानेवारी २०१४ पर्यंत. ( मागिल वर्षाला कम्पेअर करायचे असेल तर पूर्ण २०१३ मध्ये एकुण २६ शुटिंग झाल्या.)

काल आणखी एक घटना घडली ज्यात एका टिनएजरने २१ जनांना स्टॅब केले !

बरं हे एका स्टेट पुरतंच मर्यादित आहे असंही नाही. खालील मॅप बघा. जिथे जिथे रेड आहे, तिथे दोन किंवा अधिक लोकं मेली आणि जिथे यलो,तिथे निदान एक किंवा कोणीही नाही.

school shooting map.JPG

शाळेतील निरपराध मुलं, जे शाळेत शिकायला जाताते, ते मृत्यूमुखी पडतात. नेमकं कसं पचवणार हे?

बरं हा मॅप फक्त शाळांपुरताच आहे, मॉल शुटिंग्स, होम / रोड शुटिंग्स हे सर्व ह्यात नाही. तो डेटा एकत्र केला तर हे चित्र भयानक दिसेल.

अमेरिकित सध्या शाळा / कॉलेज मधून मास शुटिंग / मास किलिंग च्या घटना खूप वाढत आहेत. इतक्या की त्या वाचल्यावर, पुढे नक्की काय होणार? हे सर्व कधी थांबणार देखील आहे की नाही? आणि मुख्य म्हणजे शाळा / कॉलेज मधील मुलं इतकी हिंसक का होत आहेत ह्यावर कोणालाही उत्तर सापडत नाही.

तुम्हाला काय वाटतं?

गन लॉ किती दिवस रेंगाळत ठेवणार. लोकं म्हणतात की वेपन डजन्ट किल पिपल, पिपल किल पिपल. पण माझ्यामते हे आर्ग्युमेंट योग्य नाही.

की प्रगत देशाचे वेगळे मानसिक प्रश्न ह्या सदराखाली हे सर्व येणार?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकं म्हणतात की वेपन डजन्ट किल पिपल, पिपल किल पिपल. पण माझ्यामते हे आर्ग्युमेंट योग्य नाही.>>>+१
जस्ट असा विचार करुन बघा कि भारतात असे वेपन ठवायला परमिशन असती तर अगदी रस्त्यावर जागोजागी / ट्रॅफिक मध्ये लोक शुट झाली असती. साध्या साध्या भांडणाचे पर्यावसन खुन करण्यात झाले अस्ते. इन्फॅक्ट घरात बंदुक होती म्हणुन झालेल्या आत्महत्या देखिल बर्‍याच असणार आहेत. 'पिपल किल पिपल' हे लॉजिक बरोबर्च आहे आणि त्यात 'अ‍ॅव्हेलेबीलिटी ऑफ वेपन' हे म्हणजे कॅटेलायटीक इफेक्ट... Sad

अगदी कोल्हापुरात शिवाजी पेठेत बाचाबाची झाली तर दुसर्‍या दिवशी तलवार हल्याची बातमी येते. कारण हत्यार अ‍ॅव्हेलेबल असते.

याच उत्तर मानसशास्त्रातील संशोधक देउ शकतील. मनुष्य हा मुलत: प्राणी आहे त्यामुळे क्रौर्य हे त्यात आहे. हिंसा ही त्याच्यात असतेच. मानवी संस्कारामुळे ती दबलेल्या अवस्थेत राहते इतकेच.

केदार,

तुम्ही विचारलेला प्रश्न पु.लं च्या "जावे त्यांच्या देशा" मधे "एक पत्ता हरवलेला देश" या लेखातसुद्धा पाहिला आहे. अजुनही या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. (बहुतेक ४०-५० वर्षे झाली असतील)

जोवर गन्स वॉलमार्ट सारख्या ठिकाणी किचन पेपर, टॉयलेट क्लिनर बरोबर वगैरे घेणं शक्य आहे तोवर ह्यावर काही उपाय नाही.
मैत्रेयीने सकाळी लिहिलेला औषधांचा मुद्दाही कारणीभूत आहेच.

मुलं इतकी हिंसक का होत आहेत ह्यावर कोणालाही उत्तर सापडत नाही. <<< ह्याचे उत्तर फार कठिण नाहीय, आणि सगळ्याना माहित आहे.. पण ते पचवायची ताकद नाहीय आणि म्हणून हे असंच चालणार आहे...

कुटूंबसंस्था मोडकळीला आलीय.. मुलं बहुतेकवेळा एकटी / एकाकी वाढतात.. उपाय

१. आई किंवा वडिल नोकरीधंदा सोडून मुलांबरोबर घरी बसतील?
२. लहान-सहान कारणांवरून होणारे घटस्फोट टाळता येतील?
३. आजी-आजोबांना आपल्या घराचा एक भाग करून घेता येई??
४. समाजाने नाक खुपसलं तर काही मर्यादेपर्यंत खपवून घेता येईल??

हे होणं शक्य नाहीय म्हणून उपाय होत नाहीय...

आपल्याकडे कसं रिझर्वेशन तसाच तिकडे शस्त्रास्त्रे बाळगण्याचा अधिकार हो! दोन्ही गोष्टी घटनासंमत. सामान्य नागारिकाला दोनच विधिलिखित आरक्शणाला / गोलीला बली पड़ने किंवा कधी सामोर जाण्याची वेळच न येणे. उगाच चर्चा करून फार काही उपयोग होइल का? नाही. त्यांचा फ़ायदा आहे म्हणून त्या गोष्टी अस्तित्वात आहेत.

फार डिस्टर्बिंग आहेत हे प्रकार. अक्षरशः झोपा उडतात असे काही ऐकले की.
मला वाटते या प्रकारांचे एक कारण नसून अनेक कारणे एकत्रित आहेत.
१)वादाचा मुख्य मुद्दा - गन्स सहज वॉलमार्टात अव्हेलेबल असणे. आणि स्वसंरक्षणार्थ लहान हँडगन नव्हे तर अ‍ॅसॉल्ट वेपन , जिथे एका बटण प्रेस वर पन्नसेक गोळ्या सुटतात!!
२) व्हिडिओ गेम्स अ‍ॅडिक्शन्स - अनेक व्हॉयलंट गेम्स टीन्स आणि अ‍ॅडल्ट्स सुद्धा रात्रंदिवस खेळतात ज्यात धडाधड माणसे मारून हिंसेचे काही वाटनासे होणे, जाणीवा बोथट होणे
३) मी हे खूप वेळा लिहिले आहे, पण तरी पुन्हा स्ट्रेस केल्याशिवाय रहावत नाही. एकाने दुसर्‍याला रागाच्या भरात, भांडणात शूट केले/ भोसकले हे तरी बरेच नॉर्मल समजू आपण . पण अंदाधुंद गोळीबार करून अनेक निरपराध लोकांना मारणे हे डोके फिरल्याचे लक्षण आहे. किंवा नशेत / तारेत असल्याचे. अचानक क्रेझी लोक वाढलेत का ? तसे वाटत नाही प्रॅक्टिकली. पण एक गोष्ट वारंवार बातम्यांमधे येते, आणि मी ह्यूमन रीसोर्सेसमधे काम करत असल्याने मला प्रत्यक्षात खूप वेळा डायरेक्ट इन्डायरेक्टली डील करायला लागते ते म्हणजे ड्रग अ‍ॅब्यूज.
हल्ली अ‍ॅन्टी अ‍ॅन्क्झायटी, डिप्रेशन असल्या मानसिक समस्यांवर सर्रास औषधे प्रिस्क्राइब केली जातात. जरा काही स्ट्रेस असेल तर लोक जाऊन औषधे प्रिस्क्राइब करून मागतात! बरं याला काही क्लिनिकल टेस्ट्स नसतात त्यामुळे लक्षणे सांगा आणि कॅन्डी सारखे औषध प्रिस्क्राइब करून आणा डॉक्टर कडून . ही औषधे चुकून जास्त प्रमाणात घेतली गेली किंवा अल्कोहोल किंवा इतर मेडिकेशन्स बरोबर घेतली गेली तर सिरियस साइड इफेक्ट्स होऊ शकतात. मुळात या औषधांना काही साइड इफेक्ट्स असतातच. त्यात एक डेन्जर म्हणजे हॅल्युसिनेशन्स/ भास होणे, अननॅचरल अ‍ॅग्रेशन असले प्रकार! ही माणसे डोके फिरल्यासारखे वागणे सहज शक्य आहे. यात हातात गन असल्यावर मग काय होणार!!
विश्वास बसणार नाही इतके जास्त प्रमाण आहे असली कुठली ना कुठली औषधे घेणार्‍यांचे!! (माझा संबंध आला तो हायरिंग प्रोसेस मधे ड्रग टेस्ट फेल होणारे किंवा टेस्ट ला जाण्या आधी मी अमुक घेतो तमुक घेतो ड्रग टेस्ट मधे ते येइल का वगैरे विचारणारे लोक) आणि हे प्र्स्क्रिप्शन ड्रग्ज घेणारे नॉर्मल चांगल्या घरातले लोक. स्ट्रीट ड्रग्ज वगैरे मी बोलतच नाहिये.

माझ्या एका कलिग ची आई अशीच डिप्रेशन, स्लीप एड्स अन काय काय औषधे घेत होती. खरं तर हेल्दी बाई. ५० + , पोस्ट मेनॉपॉझल टाइप्स लक्षणे, झोप कमी नैरश्य वगैरे. पण काही काळ ती बाई डोके फिरल्यासारखेच वागायची. कलिग ला फोन यायचे , "मी मॉल मधे आहे , आजू बाजूचे ४-५ जण माझी पर्स चोरायचा प्रयत्न करतील की काय अशी भिती वाटते लवकर ये आब्णि मला पिकप कर", कधी घरात स्वतःच्याच मुलीला न ओळखल्यासारखे वागणे, एकदा काय तर घरासमोरच्या पार्किंग मधून फोन केला मुलीला, म्हणे माझी गाडी कुणीतरी बाहेरून लॉक केलीय मुद्दाम मला आत अडकवायला! मला उतरता येत नाही , लवकर ये आणि हेल्प मी!! सगळेच भास !! सुदैवाने नंतर लक्षात आले आणि ती औषधे बंद करायला लेकीने मनवले तिला. आता सगळे आश्चर्यकारक रित्य ठीक आहे. पण कल्पना करा, असले भास होणार्या माणसाच्या हातात गन असेल तर ??
माझा मुद्द एवढाच , की अचानक वेड्यांची संख्या वाढली नाहिये, लोक जास्त प्रमाणात क्रेझी वागतात त्याला ही अशी कारणे असू शकतात

केदार, मी मांडतेय तो मुद्दा अनुचित असेल किंवा त्याचा ह्या गोष्टीशी परस्परसंबंध नसेलही ..

पण आपण गन लॉ बद्दल एव्हढी नाराजी व्यक्त करतो .. ज्या भारतीय समाजातून आपण आलो तिथे अशी हत्त्यारं सामान्य लोकं बाळगत नाहीत .. पण दोन तीन वर्षांपुर्वीच्या मायबोलीच्या दिवाळी अंकात असलेला लेख पाहून (फायरींग, आर्म्स् इत्यादीवरचा, लिंक शोधून देते नंतर) आणि त्यावर तुझेच प्रतिसाद पाहून मला खूप आश्चर्य वाटलं होतं की आपल्यापैकी काही लोकंही कुठल्या का कारणाने असेना, गन्स् बाळगतात, फायरींग रेन्ज् वर जातात .. ही गोष्ट झाली आपल्या लोकांची .. इथे तर पिढ्यान् पिढ्या गन्स् असतात लोकांकडे .. ह्यांच्या घटनेप्रमाणे तो त्यांचा हक्क आहे अजून तरी .. मग ह्यावर उत्तर काय? तुला का वाटलं वेगवेगळ्या बंदुका हाताळाव्या फायरींग रेन्ज् वर जाऊन असं?

आता कदाचित तू म्हणशील मी जबाबदार नागरीक आहे, योग्य ती खबरदारी मी घेतो वगैरे किंवा मी म्हणतेय त्या लेखाच्या लेखकानेही तसंच लिहीलं होतं .. पण मूळात गन (कुठल्याही प्रकारची) हाताळाविशी वाटते ह्याचेच परिणाम आहेत ना हे सर्व आपण बघतो ते?

गन्स मिळतात कुठेही हे एक निमित्त !
ज्याला नाही मिळत तो चाकूने भोसकतोय :(.
मैत्रेयीने लिहिलेले प्रिस्क्रिप्शन ड्रग अ‍ॅब्युस हे मलाही जास्त डेंजर वाटतं !

मनुष्य हा मुलत: प्राणी आहे त्यामुळे क्रौर्य हे त्यात आहे. हिंसा ही त्याच्यात असतेच. मानवी संस्कारामुळे ती दबलेल्या अवस्थेत राहते इतकेच. >>

मला वाटतं सगळेच मानव आता हिंसक नसतात. तो हिंसकपणा अनेक गोष्टींनी परत येऊ शकतो.

मला वाटतं की पालक पाल्य संवादच मुळात हरवत चालला आहे, त्यामुळे शाळेतील मुलांमध्ये कदाचित नैराष्य वाढत चालले आहे. सोबतच अनेक गेम्स जे ह्या मुलांच्या मनावर परिणाम करत असतात आणि मग गन्स मिळत असतील तर, ह्या लोकांना धडा शिकवू, असे विचार मनात येऊन अश्या घटना घडत असाव्यात.
.

अत्यंत काळजीकारक परीस्थिती आहे. मुलांच्या हातात आय-पॅड देऊन त्याना वाट्टेल तसे स्वातंत्र्य देणारे जबाबदारीशून्य पालक, मार्-धाड असलेले विडिओ-मोबाईल गेम्स, घरा-घरात असलेली असंतोषाची परीस्थिती ( आई-वडिल भांडण, प्रत्येकाला हवी असलेली 'स्पेस' (!) ), bullying आणि त्याचे मुलांकडून होणारे समर्थन, बेभरवशी नोकरी आणि पैशाच्या जोरावर सरकार चालविणारी 'गन्-लॉबी' !
कोणाची कोणावरही श्रद्धा राहिलेली नाही. विश्वास शून्य आहे आणि गूगल आणि विक्या वाचून जगाची अक्कल आल्यासारखी लोकं वागताहेत!

यासर्वाचा परीणाम जाणवतो आहे.

एम्टी+१

एकीकडे मानसिक आजारांबाबत जागरूकता जास्त आहे म्हणून कौतुकही वाटतं आणि दुसर्‍या बाजूने हे औषधांचे साइडइफेक्ट्स पाहिले की 'भीक नको पण कुत्रं आवर' असंही वाटतं.

'पिपल किल पिपल' हे लॉजिक बरोबर्च आहे आणि त्यात 'अ‍ॅव्हेलेबीलिटी ऑफ वेपन' हे म्हणजे कॅटेलायटीक इफेक्ट..
+१.
फक्त बंदूक, पिस्तुल वर बंदी आणली तरी सुर्‍या, कात्र्या, आगी लावणे, विष देणे हे प्रकार आहेतच.
मुळातच प्रत्येक प्रश्न हिंसा करून किंवा पैसे देऊन सोडवायचा ही वृत्ति.
माझ्या मते गेली पन्नास वर्षे या देशात (अमेरिकेत) व्यक्तिस्वातंत्र्य नि जुने कायदे यांच्या नादाने अत्यंत बेताल, बेजबाबदार वागणार्‍या लोकांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातच ड्रग्स! मेंदूचे वाट्टोळे.

त्याला जोड - गेल्या पन्नास वर्षात bleeding heart liberal लोकांची संख्या वाढली. कुणालाहि स्वतःबद्दल जबाबदारी घेण्याची, शिस्त लावून घेण्याची गरज नाही! तुम्ही कितीहि वाईट गोष्ट केली तरी तुम्ही जबाबदार नाही - समाज जबाबदार. दुसर्‍या कुणाची तरी चूक! मग त्यांना पैसे द्या! तुम्ही असलेच बेताल, बेजबाबदार पणे वागा, शिकू नका, कामे करू नका मग दळिद्री झालात, दहा पोरे जन्माला घातलीत की जनतेच्या पैशातून त्यांना मदत करायची!!
या वृत्तीचा परिणाम अर्थव्यवस्थेवरहि होत आहे, पण त्या साठी दुसरा बाफ काढावा लागेल.

बेशिस्त वागणे. दहा वर्षे शाळेत जाऊन पाहिले - boys will be boys! अरे पण त्यांना कधी काही चुकत असेल तर सांगा की. नाहीतर त्यांना कळणार कसे बरोबर काय चूक काय?

लोक भारतातल्या लोकांना म्हणतात, जुने धर्म, जुन्या चालीरितींना धरून बसले आहेत, सुधारत नाहीत - हे अमेरिकन त्याहूनहि मूर्ख.

मैत्रेयीच्या पोस्टमधलं ड्रग्ज अब्युज वगैरे प्रकार मला विशियस सर्कल टाईप वाटतात. एकदा सुरुवात केली की बाहेर पडणं कठीण त्यातून.

न तीन वर्षांपुर्वीच्या मायबोलीच्या दिवाळी अंकात असलेला लेख पाहून (फायरींग, आर्म्स् इत्यादीवरचा, लिंक शोधून देते नंतर) आणि त्यावर तुझेच प्रतिसाद पाहून मला खूप आश्चर्य वाटलं होतं की आपल्यापैकी काही लोकंही कुठल्या का कारणाने असेना, गन्स् बाळगतात, फायरींग रेन्ज् वर जातात >>

अगं दोन्ही मुद्देच वेगळे आहेत.

मला गन चालवायला येते, मी रितसर प्रशिक्षण घेतले आहे त्याचे. अमेरिकेत असताना ज्या गन चालवत होतो त्याने माणसंही मरू शकतील. पण त्या एकावेळी एकच गोळी सोडणार्‍या, वर मै जसे म्हणतेय तश्या अ‍ॅसॉल्ट वेपन्सला मी पण हात लावलेला नाही. आणि लावणार नाही, कारण गरज नाही.

भारतात रेंज वर जातो, त्या प्युअर ऑलंपिक ग्रेड प्रो गन्स असतात, त्याने काही होत नाही. फायरिंग रेंज वर जाणे ही हौस असते / छंद असतो पण गन हातात घेऊन टपकवणे, ह्याची तुलना छंदाशी कशी करता येईल. आणि किती असे मुलं हे गन ट्रेन्ड होते? कोणीच नाही, त्यांनी गन घेतली आणि उडवले. पिक्चर / गेम मध्ये उडवता तसे.

काही वर्षात सगळ्यांकडेच गन्स आहेत तेव्हा आपल्यावरही स्वसंरक्षणार्थ गन्स विकत घ्यायला लागायची वेळ न आली म्हणजे झालं.

दोन्ही मुद्दे पूर्णपणे वेगळे नाहीत .. त्या सँडी हूक मधल्या शिक्षिकेने काय मुलाच्या छंदासाठी गन्स् नव्हत्या ठेवल्या घरात .. पण शेवटी त्या लागल्याच ना त्याच्या हातात .. म्हणजे मेन्टल हेल्थ प्रॉब्लेम्स् आणि त्यावर न मिळालेली ट्रीटमेन्ट, बदललेली कुटूंब / समाज व्यवस्था, वार्‍याच्या वेगाने डेव्हलप होणारी टेक्नॉलॉजी, गन लॉ, कॅपिटलिझम , इझी अ‍ॅक्सेस् टू गन्स् , मणासम्ध्ये नैसर्गिक असलेला हिंसक ट्रेट इत्यादी गोष्टी दिसतात मला ह्याच्या मूळाशी ..

शेवटी राजसी म्हणते तेच मला वाटतं ..

>> उगाच चर्चा करून फार काही उपयोग होइल का? नाही. त्यांचा फ़ायदा आहे म्हणून त्या गोष्टी अस्तित्वात आहेत.

>> वर मै जसे म्हणतेय तश्या अ‍ॅसॉल्ट वेपन्सला मी पण हात लावलेला नाही. आणि लावणार नाही, कारण गरज नाही.

एकाच साध्या पिस्तूलाने ५ माणसांनां शूट करणे आणि एके४७ टाईप ऑटोमॅटिक व्हेपन्स् वापरून ५०-६० जणांनां क्षणात गोळ्या मारणे ह्यात खरंतर काही फरक आहे का?

य मुलाच्या छंदासाठी गन्स् नव्हत्या ठेवल्या घरात >> परत चूक. मी वापरतो ती गन अ‍ॅसॉल्ट नाही. हे बघ. http://www.pardiniguns.com/

त्यात छर्रा सदृष्ट्य मटेरियल असते. कोणी मरत नसतं. ही छंद वाली प्रो बंदूक जी ऑलंपिक मध्ये वापरली जाते.

त्यांचा फ़ायदा आहे म्हणून त्या गोष्टी अस्तित्वात आहेत. >>. फायदा आहेच, पण शाळेतली मुलं काय मिल्ट्रीवाली आहेत की पोलिस? हे आर्ग्युमेंट चुकीचे आहे सशल.

केदार, धागा काढलास ते बरे केलेस. अशा बातम्या ऐकल्या की मन विषण्ण होतं. इथल्या चर्चेतून यासंबंधी वेगवेगळे मुद्दे वाचायला मिळतील.

सॅन्डी हूकच्या प्रकरणात आई मुलाच्या हातात 'विरंगुळ्यासाठी' गन देत होती. त्याला मानसिक विकार असून. केदार म्हणतो त्याप्रमाणे असॉल्ट वेपन्सबद्दलही उहापोह झाला होता त्या प्रकरणाच्या निमित्ताने.

अमेरिकन गन law हा गेली कित्येक वर्षे आहे पण हे शाळेतील शूट चे प्रकार गेल्या २-3 वर्षात कित्येक पटींनी वाढलेत. २००४-२००५ पर्यंत हा आकडा ४-५ होता २००९-२०१० पर्यंत १०-१२ आणि आता अचानक २०१४ मध्ये ३५ घटना पहिल्या ३ महिन्यात घडल्यात. वर म्हटलंय तसं गनची सहज उपलब्धता तर कायमच होती. ड्रग अब्युझ लहान मुलांमध्ये होतो का इतका?

http://en.wikipedia.org/wiki/List_of_school_shootings_in_the_United_States २०११

अमेरिकन गन law हा गेली कित्येक वर्षे आहे >>. ही अमेरिकन घटनेतील एक तरतुद आहे असे गन लॉ प्रो आर्ग्युमेंट आहे पण अनेक तज्ञ म्हणत आहेत की त्याचे चुकीचे इंटरप्रिटेशन केले.

पूर्वी असे नव्हते, हे म्हणजे चुकीचे आहे. मी फक्त शाळेचा मुद्दा घेतला होता. पण ह्या काही फॅक्ट्स बघा.

1. In America, there are approximately 270 million firearms possessed by civilians, and only 897,000 carried by police.

2. Approximately 20% of gun owners own 65% of the guns.

3. The Federal Bureau of Alcohol, Tobacco, and Firearms reports that about 5.5 million new firearms were manufactured in America in 2010. 95% of it was for the U.S. market.

4. Close to 33,000 Americans were victims of gun-related deaths in 2011.
हे अतिरेकी कारवायांपेक्षा जास्त भयानक आहे.

5. In 2011, 10.3 in every 100,000 people in the U.S. were victims of gun-related deaths.

आणि हे बघा.

9. Trigger locks make a firearm more difficult to discharge and act as a safety precaution in carrying and owning guns. However, only 9 states (NY, NJ, CA, OH, MI, RI, MD, PA, MA) have trigger lock laws that enforce this precautionary measure.

एकाच साध्या पिस्तूलाने ५ माणसांनां शूट करणे आणि एके४७ टाईप ऑटोमॅटिक व्हेपन्स् वापरून ५०-६० जणांनां क्षणात गोळ्या मारणे ह्यात खरंतर काही फरक आहे का? >>>> फरक आहेच की!! नाही असे का वाटते तुला सशल ?

एका पिस्तुलाने , एका माथेफिरू ने ५-६ काय त्या गोळ्या चालवल्या समजा. तो काही निष्णात शूटर नाही असे धरू. म्हणजे माणसे एकूण ३-४ मरण्याची शक्यता, काही नेम चुकले धरून. त्यानंतर त्याल गन रीलोड करायला लागणार. तेवढ्या वेळात समोरच्यांना स्वसंरक्षणाचची संधी नाही का मिळत!! फार महत्त्वाचा फरक आहे हा.
एकाच वेळी ५० गोळ्या सुटल्या तर वाचण्याची संधी न मिळता जास्त माणसे मरणार!

आम्ही सॅन्डी हूक प्रकारानंतर एका पिटिशन वर सह्या केल्या होत्या आमच्या टाउनशिप मधून. शिवाय आम्हाला स्वतंत्र रित्या पण व्हाइट हाऊस ला ईमेल करायला उत्तेजन दिले होते. त्यात असा मुद्दा होता की गन्स विकताना एक तर मेन्टल हिस्टरी चेक, बॅकग्राउंड चेक आणि सामान्य माण्साला अ‍ॅसॉल्ट वेपन तर विकायला परवानगीच नसावी. स्वसंरक्षणार्थ गन हवी ते ठीक कॉन्स्टिट्यूशन नुसार, पण मग त्यात लिमिटेड काय त्या ४-६ गोळ्याच विकत घेता येतील एका वेळी. हे एवढे केले तरी निदान कॅज्युअल्टीज कमी होतील. प्रमाण कमी होइल. पूर्ण थांबण्याचे काय सांगावं!

यात असा मुद्दा होता की गन्स विकताना एक तर मेन्टल हिस्टरी चेक, बॅकग्राउंड चेक आणि सामान्य माण्साला अ‍ॅसॉल्ट वेपन तर विकायला परवानगीच नसावी >>

त्यात खूप मोठी पळवाट आहे मै

फॅक्ट Buyers that purchase firearms through private sales in the U.S. don't have to pass a background check before obtaining possession of the weapon. This includes sales to criminals, felons, and people with a history of severe mental illness.

व्हाट आर दे वेटिंग फॉर?

अमेरिकन घटने मधील तरतुद म्हणते मिलिशिया सरकार उलथन्यासाठी असावा. ग्रेट. पण आता शेकडो वर्षांच्या लोकशाही नंतरही ह्या भितीला काही आधार नाही.

माझं मत आहे की सामान्य माणसाला गन देऊच नये, ती पोलीस किंवा मिल्ट्रीच्या माणसांकडे असावी..कारण सांभाळता येत नाही.. अशा किती बातम्या असतात जिथे सामान्य माणसाने गन वापरून स्वतःला वाचविले असे दिसते? मी ज्या बातम्या वाचते त्यात जास्त तर घरी असलेली गन चुकुन उडून / लहान मुलांच्या हाती लागून अपघात झाल्याच्याच असतात.
मैत्रेयीचा व्हिडियो गेम्स चा मुद्दा मला पटला.. टीव्ही वरचे प्रोग्राम्म पण किती हिंसक असतात आजकाल...

हेच म्हणत होतो मी... सगळे मलमपट्टी (Bandaid solution ) शोधायला लागले.... नेत्यांप्रमाणे... चालू द्या...

गोगा, कुटुंबसंस्था हे फार सिम्प्लिस्टिक उत्तर आहे असं मला वाटतं. तुम्ही म्हणता तशी 'मोडकळीला आलेली' कुटुंबव्यवस्था अमेरिकेत कित्येक वर्षं आहे. अचानक गेल्या २-३ वर्षांत असे प्रकार वाढायचं काय कारण असेल?

मोडकळीला आलेली कुंटुंबसंस्था अनेक घटकांमधला एक घटक म्हणून विचारात घेता येईल पण तेच मेन कारण नक्कीच म्हणता येत नाही.

'बंदूकी सहज ऊपलब्ध आहेत म्हणूनच' हा ज्यांचा मुद्दा आहे त्यांच्यासाठी
१) बंदुकी बाळगणे हे घटनासंमंत तर आहेच आणि एखाद्याला ती वापरू नका अशी गळ घालणे म्हणजे 'भारतात एखाद्याला ओबीसी/ईबीसी/एससी/एनटी सवलत तुमच्या फायद्यासाठी वापरू नका' असे म्हणणे आहे.
आणि त्याहूनही मोठा मुद्दा
स्विस गन कल्चर.

स्वित्झरलँड मध्ये सरासरी माणशी दोन बंदूका प्रत्येक घरात आहेत, नव्हेत त्या सरकारनेच ईश्यू केलेल्या आहेत. बंदूका म्हणजे केवळ हँडगनच नाहीत तर अ‍सॉल्ट रायफ्ल्स सुद्धा. काही गन्स विकत घेण्यासाठी परवान्याचीही आवश्यकता नाही. कार ईन्स्पेक्शन सारख्या ह्या बंदूका दर काही वर्षांनी तपासणी करून घ्याव्या लागतात आणि त्याचबरोबर बंदूकीच्या मालकालाही फायरिंगची परीक्षा द्यावी लागते. काही नियम पाळून ह्या गन्स पब्लिक मध्येही कॅरी करता येतात. बंदूकी विकत घ्यायला आणि वापरायला वय मर्यादा आहे फक्त १८. रिक्रिएशनल शुटींगसाठी सुविधाकेंद्रे वॉलमार्टच नाही तर डंकिन आणि स्टारबक्स सारखी ऊपलब्ध आहेत.
आणि तरीही स्विस देशनिहाय गुन्ह्यांच्या सरासरी क्रमवारीत अगदी तळाशी आहे. २:३००००००, त्यातही बंदुका वापरण्याचे प्रमाण १:२००००० आहे.

मला कल्चर मुद्दा रास्त वाटतो. स्विसने फार पूर्वीपासून गन कल्चर तयार केलं आहे रुजवलं आहे.
जसं लैंगिक गुन्हे आणि अपघात टाळण्यासाठी ह्या बदलत्या समाजात आता कळत्या वयात लैंगिक शिक्षण अपरिहार्य आहे तसेच सहज ऊपलब्ध आहेत म्हणून बंदूकीसारख्या शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण आणि ते हाताळ्ण्यासाठी मानसिक आधार अनिवार्य आहे.

Pages