शिळ्या भाताचे वडे

Submitted by प्रमोद् ताम्बे on 6 April, 2014 - 00:49

शिळ्या भाताचे वडे
 वडे x.jpg

साहित्य :
तीन वाट्या आदल्या दिवशीचा (शिळा) भात, चवीनुसार हिरव्या मिरच्या, ५-६ लसूण पाकळ्या,धुवून चिरलेली कोथिंबीर (आवडीप्रमाणे) , आल्याचा छोटा तुकडा, एक छोटा चमचा जिरे पुड, ५-६ कढीपत्त्याची पाने, २ चमचे लिंबाचा रस, चवीनुसार मीठ व चिमूटभर साखर
वड्याच्या पीठाचं साहित्य (आवरण) : बेसन पीठ (चणा डाळीचे) , तांदळाची पिठी ,मिठ व जिरे
कृती : वड्याच्या आवरणासाठी बेसनाचे पीठ भिजवून घ्या. भिजवतेवेळी त्यात दोन चमचे तांदळाची पिठी,चविसाठी थोडे मीठ व कडकडीत तेलाचे मोहन व जिरे घालावे. भात हाताने मोकळा करून घेऊन,कुस्करून / मळून एकजीव करा. त्यात आलं-मिरची-लसणीचा ठेचा, कोथिंबीर बारीक चिरून, मीठ व लिंबाचा रस ,जिरे पूड घालून एकत्र करा. त्याचे वडे थापून बेसनाच्या पीठात भिजवून गरम तेलात मध्यम आचेवर तळा.तळलेले वडे टिश्यू पेपरवर काढावेत.
वडे गरम असतांनाच डिशमधून ओल्या नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावेत. फारच खमंग व चविष्ट लागतात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users