पालक पनीरचे पॅटीस

Submitted by प्रमोद् ताम्बे on 1 April, 2014 - 07:36

पालक पनीरचे पॅटीस

-पालक कटलेट xxx.jpg

साहित्य : एक जुडी पालक, एक वाटी पनीरचे बारीक तुकडे , एक वाटी भरून बारीक चिरलेला कांदा, दोन चमचे हिरवी मिरची-आले पेस्ट, दोन चमचे धने-जिरेपूड, मीठ, साखर, चवीनुसार लिंबाचा रस, बेसन पीठ.

कृती : पालक धुऊन गरम पाण्यात घाला. पाच मिनिटांनी बाहेर काढून बारीक चिरुन ठेवा. गॅसवर फ्रायपॅनमध्ये थोडेसे तेल गरम करून त्यात मिरची पेस्ट आणि कांदा घालून परता व झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या , वाफ आल्यावर पालक घालून पुन्हा एकदा परता. पनीरचे छोटे तुकडे कुस्करून पालकमध्ये मिसळा व हलवा. नंतर धने-जिरे पूड, चवीनुसार लिंबाचा रस, मीठ, साखर घाला. मिश्रण एकजीव करा व गॅस बंद करा. उकडलेले बटाटे, मीठ, बेसनाचे पीठ एकत्र करून मळून गोळा तयार करा. त्याची पारी तयार करून पालक व पनीरचे मिश्रण त्यात भरा. पारीचे तोंड बंद करून ती चपटी करा व ब्रेडक्रममध्ये घोळून घ्या व तेलात सोनेरी रंगावर तळा. सॉसबरोबर सर्व्ह करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users