तिथेच लागते जिथे जखम असते (तरही)

Submitted by इस्रो on 29 March, 2014 - 04:07

जनन मरण कुठे, सरळ सुगम असते ?
तिथेच लागते, जिथे जखम असते

दिसे तसे नसे, म्हणून जग फसते
दिसावया परम, खरे अधम असते

म्हणायचे असे, करायचे तैसे
सदाच वागणे, तुझे विषम असते

नकोत औषधे, नको दवाखाना
तुझे सुहास्य मम, खरा मलम असते

कुणास टोचतो, मऊ बिछाना अन
निजावया कुणा, भुई तलम असते

नाहिद नालबंद [९९२१ १०४ ६३०]

Group content visibility: 
Public - accessible to all site users