... तितकीच आहे!

Submitted by आनंदयात्री on 25 March, 2014 - 05:58

आजही जखमेत माझ्या वेदना तितकीच आहे
प्रार्थनेमध्ये अजूनी याचना तितकीच आहे

विषय कुठलाही असू दे, बोलण्याचा हक्क आहे!
हातवारे ठाम जितके, वल्गना तितकीच आहे

'लांबुनी पाहेन' म्हणतो, सर्वथा रममाण होतो
घेउनी संन्यास अजुनी, वासना तितकीच आहे

टाकतो कुंपण सभोती, आत मग बेफाम जगतो
जेवढे आहे खरे हे, कल्पना तितकीच आहे

या ढगांच्या आतले कोणी रिते झाले असावे!
बरसणे झाले कमी पण गर्जना तितकीच आहे

फार भारावून जाण्याएवढे काहीच नाही
(या नव्या दु:खातसुद्धा यातना तितकीच आहे)

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2014/03/blog-post_25.html )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टाकतो कुंपण सभोती, आत मग बेफाम जगतो
जेवढे आहे खरे हे, कल्पना तितकीच आहे

फार भारावून जाण्याएवढे काहीच नाही
(या नव्या दु:खातसुद्धा यातना तितकीच आहे)>> वाह! मस्त.

वाह!!

शेवटचे ३ जास्त आवडले
शेर ३ रा ओळ १ ली शब्द २रा ........पाहीन ....असेही चाललेच असते असे वै म

मतल्यावरून हा शेर आठवला

आजही माझी अवस्था काल होती तीच आहे
आजचाही शेर माझा विठ्ठलासाठीच आहे

धन्यवाद Happy

टाकतो कुंपण सभोती, आत मग बेफाम जगतो
जेवढे आहे खरे हे, कल्पना तितकीच आहे<<< मस्त

या ढगांच्या आतले कोणी रिते झाले असावे!
बरसणे झाले कमी पण गर्जना तितकीच आहे<<< छानच

फार भारावून जाण्याएवढे काहीच नाही
(या नव्या दु:खातसुद्धा यातना तितकीच आहे)<<< व्वा, सहजताही खूपच.

या ढगांच्या आतले कोणी रिते झाले असावे!
बरसणे झाले कमी पण गर्जना तितकीच आहे

फार भारावून जाण्याएवढे काहीच नाही
(या नव्या दु:खातसुद्धा यातना तितकीच आहे)

वा ! गझल आवडली .

नचिकेत…. भारीये …

या ढगांच्या आतले कोणी रिते झाले असावे!
बरसणे झाले कमी पण गर्जना तितकीच आहे

what's an attitude??... व्वा ….