अ‍ॅगाथा ख्रिस्ती - फॅन क्लब

Submitted by गजानन on 12 March, 2014 - 12:54

अ‍ॅगाथा ख्रिस्तीचे चाहते आहेत का? Happy

तुम्ही कोणती पुस्तके वाचली? सगळ्यात आवडते कोणते? याबद्दल वाचायला नक्कीच आवडेल.

आवश्यक तिथे कृपया स्पॉयलर वॉर्निंग द्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

murder at orient express, murder is announced, dial M for murder आणि body in library वाचल्या आणी murder is announced चा चित्रपट देखील पाहिला... & माझी सगळ्यांत आवडती कादंबरी -murder is announced...

मी एन् ऑर एम्, क्रूकेड हाऊस, दि एबीसी मर्डर्स, दे डिड इट विथ मिरर, विटनेस फॉर दि प्रॉसेक्युशन (नाटक) , डबल सिन (कथासंग्रह), मिस मार्पल्स फायनल केसेस (कथासंग्रह), हिकरी डिकरी डॉक, इ. वाचली आहेत. Happy

मी तिची खुप पुस्तके वाचलीत. मी व्हुडनिटची तितकीशी चाहती नाहीय कारण एकदा रहस्य उलगडले की मग परत वाचण्यत काहीच रस उरत नाही.

पण अ‍ॅगथाचे एक पुस्तक मी परत परत वाचलेय, पहिल्यांदा वाचल्यावर लगेच परत दोनदा वाचुन काढले. त्याची मोहिनी इतकी जबरदस्त की दुकानात ते पुस्तक दिसताच मी अधाशासारखे लगेच विकत घेतले. त्यानंतर ते कि त्येकदा वाचलेय त्यची गणतीच नाही. The mysterious Mr. Quin हे ते पुस्तक.

ह्या पुस्तकात १२ छोट्या छोट्या गोष्टी आहेत. दोन घटक प्रत्येक गोष्टीत समान आहेत. पहिला, ,लोकांच्या खासगी आयुष्यात वाजवीपेक्षा जास्त रस असलेले मि. सदर्थ्वेट आणि त्यांच्या समोर एखादे खिळबुन ठेवणारे ख-या आयुष्यातले नाट्य सुरू झाले की अचानक हजर होणारे आणि ते नाट्य संपताच लगेच अंतर्धान पावणारे मि. क्विन आणि दुसरा, भुतकाळात घडलेल्या अनाकलनीय घटनांच्या दुष्टचक्रातुन बाहेर न पडू शकणारी त्या नाटकातली पात्रे.

क्विनच्या मते एखादी गोष्ट घडत अस्ताना त्यातले बरेचसे बारकावे आपल्या लक्षात येत नाहीत. पण काही काळाने त्या गोष्टीकडे आपण परत पाहिले असता ते सुटून गेलेल बारकावे लक्शात येतात. जसे आपण एकाद्या चित्राचा भाग असु तर आपल्याला ते चित्र काय आहे याचा अजिबात पत्ता लागणार नाही पण जर त्या चित्रापासुन दुर होऊन, लांब जाऊन, चित्रापासुन स्वतःला वेगळे करुन आपण ते चित्र बघायला लागलो तर आधी न दिसलेल्या अनेक गोष्टी आपल्याला अगदी लख्ख दिसायला लागतात. पाश्चात्य जगात असलेला हार्ले॑क्विनच्या कथेचा संदर्भ यातल्या क्विनच्या व्यक्तिरेखेला आहे

या सगळ्या गोष्टी परत परत वाचणे हा माझ्यासाठी आनंदाचा एक मोठा ठेवा आहे.

सुरुवातीची ३०-४० पानं तरी इतकी जहाल बोअर होतात तिची!
पण एकदा फ्यान झालो की ती पानं वाचायलाच हवीत हे लक्षात येतं. भरपूर क्लूज तिथेच असतात Wink
अन मग नंतर ती स्टोरी जी ग्रिप घेऊन सुटते सुसाट!! की शेवटी पोहोचल्यावर आपण म्हणतो,
"हुश्श्! व्हॉट अ राईड!"

इब्लिस, हो मी कितीदातरी पुढे चांगली पोटभर मेजवानी मिळणार या आशेवर सुरुवातीचा जड स्टार्टर संपवला आहे. Proud

देवी, साधना, आता क्विन आणि, मर्डर इज अनाऊंस्ड मिळवून वाचतो.
हो, (प्वारो तर आहेच पण) मार्पल आजीही भयंकर आवडते.

बहुतेक पुस्तके वाचली आहेत. ३-४ शॉर्ट स्टोरीज चे अनुवाद केले आहेत. २ फार पूर्वी नवल मध्ये प्रसिद्ध झालेले.
माय बोली वर एक अनुवाद टाकण्याची इच्छा आहे. पण कॉपीराईट्स च्या भानगडीची कल्पना नाही. नवल ने
कॉपी राईट्स करीता काय केलेले आता आठवत नाही.

असो, माझे आवडते पुस्तक - The Murder of Roger Ackroyd - अचाट स्टोरी!

murder is announced - वाचलय का नाही ते आठवत नाही...बघितलं पाहिजे. dial M for murder - अ‍ॅगाथा ख्रिस्तीची नाहीये ना?

रायगड,
dial M for murder हा चित्रपट ALFRED HITCHCOCK चा आहे, पण ती कादंबरी अ‍ॅगाथा ख्रिस्तीने लिहिलेली आहे...

'दि एबीसी मर्डर' पण भारी आहे. नक्की वाचा.
एन् ऑर एम् आणि हिकरी डिकरी डॉक मध्ये गेस्टहाऊस मस्त रंगवलेय. प्रत्येक व्यक्तिरेखा अगदी युनिक.

मी पण या क्लबात.

आवडती पुस्तके बरीच आहेत. पण लक्षात राहिलेली-
१. व्हाय डिडन्ट दे आस्क इव्हान्स?
२. ४:५० फ्रॉम पॅडिंग्टन
३. प्वारोच्या सगळ्याच कथा
४. मार्पलची नेमेसिस

सीमा Happy
श्रद्धा, माझ्याकडे बहुतेक व्हाय डिन्ट दे आस्क इव्हान्स आहे. बाकीची मिळवतो.

काल असेच एका कथेतील ख्रिसमसच्या दिवसातले वर्णन एकदम आठवले. पण ताण देऊनही बाकी आजूबाजूचे काही आठवत नव्हते. पुडींग्ज तेवढे आठवत होते. Proud

मध्ये पुपुवर वरदाने 'डेथ कम्स अ‍ॅज द एन्ड'बद्दल लिहिलं होतं. ती कथा प्राचीन इजिप्तमध्ये घडते. रोचक आहे. विकिवर माहिती आहे पण प्लॉट वाचू नका. Happy

प्वारो कथांमध्ये 'अपॉइंटमेंट विथ डेथ' आणि 'मर्डर इन मेसोपोटेमिया' या इजिप्त, वगैरेतल्या उत्खनन सायटींवर घडतात. अ‍ॅगथाबाईंचा नवरा आर्किओलॉजिस्ट होता, त्याच्याबरोबर त्या उत्खनन सायटींवर जात असत.

डेव्हिड सुशेने साकारलेला प्वारो पाहिल्यापासून आमचे मत प्वारो कथांनाच. Proud

अ‍ॅगथा ख्रिस्तीचे आत्मचरित्रही जबरी आहे.

माझ्याकडे अ‍ॅगाथा ख्रिस्तीचं सगळं साहीत्य आहे. तिच्या डिटेक्टीव्ह कादंब-या सुरेखच पण तिचा मास्टरपीस अर्थातच माऊस ट्रॅप !

एक सूचना, जर शक्यं झालं, तर ब्रिटीश रंगभूमीवरचा माऊस ट्रॅपचा प्रयोग चुकवू नका !

आवडलेली
१. अ मर्डर इज अनाउन्सड
२. क्रुकेड हाऊस
३. मिरर क्रॅक्ड फ्रॉम साडड टु साईड
४. कॅटस अमंग द पिजन्स
५. सॅड सायप्रेस
६. अँड देन देअर वेअर नन
७. मिस्टरीयस अफेअर अ‍ॅट स्टाइल्स

ओके टाइप्स
१. बेट्रॅम्स हॉटेल
२. स्पार्कलिंग सायनाईड
३. सिक्रेट अ‍ॅडव्हर्सरी

न आवडलेले
१. थर्ड गर्ल

मी पण, ऑस्ट्रेलियाला असताना अगाथाची जवळ जवळ २०-३० पुस्तकं वाचून काढली, आवडती - मिस मार्पल. पॉयरो ची गूढ उकलण्याची स्टाईल आवडते, छोट्या छोट्या गोष्टी मधून त्याला जे क्लूज मिळतात ते भारी वाटतं Happy

मी फक्त थर्ड गर्ल वाचल.नाही आवडल एवढ.पण प्रस्ताविकेत शेरलॉक नंतर पायरो चा नंबर लागतो अस लिहल होत.बाकीची पुस्तक वाचायला हवी मग. मध्यंतरी झी स्टुडिओ वर रा.११.०० वाजता पायरो चे पिक्चर लागायचे.

माऊस ट्रॅप आणि अजून दोन नाटकं लिहिलेलं एक पुस्तक आहे- नाव विसरले. कमाल आहेत ती. त्यात डिटेलिंग इतकं भारी आहे की नाटक समोर घडतंय असं वाटतं.

'अ स्ट्रेन्जर इन द नाईट' (हेच नाव आहे बहुधा- ज्यावरून 'धुंद' सिनेमा घेतला होता) हे माझं सर्वात आवडतं पुस्तक.

पुस्तकं बरीच वाचली आहेत. पण नेमकी नावं आठवत नाहीत Sad हातात घेतलं की आठवतं Happy

पॉयरो जास्त आवडतो मिस मेपलपेक्षा.

सुरुवातीची ३०-४० पानं तरी इतकी जहाल बोअर होतात तिची!
पण एकदा फ्यान झालो की ती पानं वाचायलाच हवीत हे लक्षात येतं. भरपूर क्लूज तिथेच असतात >> +१ इब्लिस

माझी फेव्हरिट - murder at orient express, अ मर्डर इज अनाऊन्सड, डेथ कम्स अॅज द एन्ड, मर्डर इन मेसोपोटेमिया
अजून काही वाचलेली Elephants Can Remember , The Murder at the Vicarage ,Peril at End House

मी पण या क्लबात.

काही वर्षांपूर्वीच अगाथा ख्रिस्ती वाचायला सुरुवात केली. आजच्या 'CID' च्या जमान्यात संथ स्टोरी भलतीच बोअर झाली सुरुवातीला.पण नंतर लक्षात आलं that is what Agatha Christie is ! मानवी भाव भावनांचे इतके छान वर्णन....कि केवळ मार्पलच नाही तर कथेतल्या प्रत्येक पात्राला त्याच्या स्वभाववैशिष्ट्यांसकट आपण छानच ओळखायला लागतो.त्या पात्रांमध्ये आजुबाजूची माणसे बघतो.
एकदा वाचून रह्स्य माहित झाले, तरी या वर्णनांसाठी तीच पुस्तके परत परत वाचली जातात.

मी या क्लबची तहहयात सदस्य !!!!

मार्पल आज्जी, प्वारो कथा जाम फेवरेट. माऊस ट्रॅप अणि विटनेस फॉर द प्रॉसीक्युशन आवडती नाटके.. डायल एम फॉर मर्डर हे फार आवडलं होतं.

तिच्या आत्मचरीत्राचा थोडा भाग एका मित्राने असाच अनुवाद केला होता.

डिटेलिंग इतकं भारी आहे की नाटक समोर घडतंय असं वाटतं. <<< हो, काही वेळा डिटेलींग अर्धं पान आणि त्यापुढे संवाद एखाद दुसरा असंही असतं. Happy

भ्रमरा Biggrin

मी पण क्लबात.
आप्पा ब्ळवंत चौकातल्या एका फूटपाथ पुस्तक वाल्याबरोबर डिल होत माझ शाळेत असताना :). नववीतून दहावीच्या उन्हाळी सुट्तीत फक्स्त अगाथा क्रिस्तीच वाचल होत. मला अजूनही अगाथा क्रीस्ती म्हटल की बाहेरच उन, घरात आंब्याचा वास, माठातल्या पाण्याच सरबत आणि पिवळट पडलेल्या , दुमडल तरी फाटणार्‍या पुस्तकांची आठवण येते. बहुतेक सगळी पुस्तकं वाचलीत. बहुतेक सगळे पॉयरो आणि मिस मार्पल वाले सिनेमे पाहिलेत.
डिटेलात लिहिन.

Pages