अननसाचा मुरांबा

Submitted by मनीमोहोर on 6 March, 2014 - 12:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अननसाचा मुरांबा हा काही तसा नवीन पदार्थ नाही पण मी जी रेसीपी शेअर करत आहे ती खूप झटपट आहे आणि पाक वैगेरे काही करायचा नसल्याने सक्सेस रेट १००%

From mayboli

अननस बाजारातुन सोलुन आणावा. हेच खरे वेळखाऊ आणि हायजिनिक कसोट्या पणाला लावणारे काम आहे. मी फार कसोशीने फळवाल्याचा हात सोललेल्या भागाला लागणार नाही हे बघते.
सहित्यः
१) अननसाच्या मध्यम आकाराच्या फोडी चार वाट्या( फोडी करताना अननसाचा मधला भाग आणि डोळे असल्यास काढावे)
२) साखर चार वाट्या.
३) लिंबाचा रस २ टे. स्पु.

क्रमवार पाककृती: 

वरील तिन्ही जिन्नस एका पातेल्यात एकत्र करुन मॅरिनेट करत साधारण तासभर ठेवावे. नंतर ते पातेले कुकरमध्ये प्रेशर लावून ठेवावे. नेहमी सारख्या तीन शिट्ट्या झाल्या की गॅस सिमवर दहा ते बारा मिनिट ठेवावा.

गॅस बंद करुन कुकर साधारण दोन तीन तासानी उघडावा. मस्त नैसर्गिक सोनेरी रंगाचा मुरांबा तयार. ( जर कुकर मधुन काढल्यावर साखर पूर्ण विरघळली नसल्यास मंद गॅसवर ठेवून साखर पूर्ण विरघळवावी. जास्त उकळू नये. घट्ट होईल. )

वाढणी/प्रमाण: 
मुरंबा आहे तो, काय सांगू ?
अधिक टिपा: 

टीप: हा मुरंबा इतर काम करत असतानाच करावा कधी झाला ते कळत ही नाही.
फ्रीज मध्ये ठेवावा.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोप्पी आहे कृती.. हे असे खास कापावे लागणारे अननस फक्त आपल्याकडेच मिळतात. इथले अतिगोड असतात ( मुरंब्यासारखेच ) आणि कापतानाच रस गळायला लागतो. पण आपल्याकडच्या अननसांना स्वाद चांगला असतो.
( रच्याकने.. अननस हाच शब्द पोर्तुगीज आणि अरेबिक भाषेतही वापरतात. )

छान आणि सुंदर!!

एक शंका - मुरांबा म्हणजे मुरलेला आंबा. इथे आंबा तर नाही मग हा मुरांबा कसा? ह्याला मुराननस असे म्हणायला हवे! (मुरावळ्यासारखे)

Happy

मी साधारण असाच करते, पण थेट गॅसवर सगळं मिश्रण उकळून. आता असा प्रेशर कुकरमध्ये पण करून बघेन.

अननस हाच शब्द पोर्तुगीज आणि अरेबिक भाषेतही वापरतात >>> दिनेशदा, इंग्रजी सोडली तर इतर अनेक भाषांमधे त्याला अननस म्हणतात. गूगल ट्रान्स्लेटरवर ऐका. मजा येते. Lol

इंग्रजी सोडली तर इतर अनेक भाषांमधे त्याला अननस म्हणतात.>>>>>अगदी अगदी. फिनिश भाषेतही अननसच म्हणतात. Happy

क्या बात है !!

मुरांबे ,लोणची हे प्रकार बनवण्या पासुन मी दूर पळते.आज पर्यंत मला फक्त जागुचे चिंचेच्या रसातले मिरची चे लोणचेच छान जमले. पण हा प्रकार भलताच जमणेबल दिसतोय. एकदम सोपा वाटतोय.

मुरंब्याच्या खालचा रुमालही अल्टीमेट !! जमल्यास त्याचीही रेसिपी येउ द्यात.:)

एकदम मस्त आणि सोपी रेसिपी! या पद्धतीने पण आता करुन बघायला पाहिजे. बाय द वे, त्या बोल खलचा रुमाल फार म्हणजे फारच सुंदर आहे. (त्याचा एक सेपरेट फोटो द्या ना.. ) Happy

क्रोशे डॉयली चा सेपरेट फोटो माझ्याकडे नाहीये. काढून सवडीने डकवते. अरे, पण मी आहार आणि पाककृती मध्ये अननसाच्या मुरंब्याची रेसिपी टाकलीये, कलाकौशल्य मध्ये क्रोशे कामाची नाही. ) Happy Happy

वा मस्त रेसिपी.
त्या वाडग्यातला खाली विणलेला अननस लपलाय असं वाटतय Wink तेव्हा त्या रुमालाचा सेपरेट फोटो हवाच हो Happy

व्वा...........मस्त..........अशीच रेसिपी फणसाची पण करतात..त्याला आम्ही फणसआंबा असे म्हणतो.

unhaat sakhar aani aamba ashi batali thevun muravun kelelya padarthala muramba mhanatat. shijavun kele tar tyalaa sakhar aamba mhanatat. mhanun haa sakhar-ananas..:) recipe chan ahe.

मी एक प्रश्न विचारु का?? मुरांबा मधे आंबा कुठाय??? पाकातल्या आंब्याला मुरांबा...आवळ्याला मोरावळा...मग हा मुराननस नाही का????
बाकी कृती मस्त आहे...आमच्या घरी पण असाच बनवते मॉम... Happy

फ्रिज मध्ये ठेवावा. मस्त टिकतो. आत्ता सुद्धा आहे माझ्याकडे. माझ्या मुलाला विकतच्या जॅम पेक्षा हा जास्त आवडतो. अननस नेहमी उपलब्ध असल्याने आणि करायला सोपा असल्याने संपला की परत करता येतो.

Pages