Submitted by विदेश on 5 March, 2014 - 03:16
आई म्हणते चिडून रागाने बाळूला,
"बाळू, तुझ्या खोड्या नाकी नऊ आणतात" -
बाळू विचारतो आईकडे पहात,
"तुझ्या नाकावर एकदोन कुठे दिसतात ?"
कामाच्यावेळी आई म्हणते बाळूला,
"कळतच नाही घड्याळ कसे पळते" -
घड्याळाकडे पहात बाळू म्हणतो,
"पळत नाही ते, आहे तिथेच दिसते !"
आई म्हणते बाळूला दुपारी जेवल्यावर,
"बाळू, जरा निवांत पडू दे ना मला" -
काळजीने बाळू म्हणतो आईला,
"आई, पडताना लागेल ना मग तुला !"
.
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गोडच आहे बाळू..
गोडच आहे बाळू..
छान आहे कविता
छान आहे कविता
अनघा., सारिका१ प्रतिसादाबद्दल
अनघा., सारिका१
प्रतिसादाबद्दल आभार .
मस्तचे ....
मस्तचे ....
मस्त साधी सोपी खट्याळ कविता !
मस्त साधी सोपी खट्याळ कविता ! शेवटचे कडवे झकास निरागस ! छानच !
शशांकजी, चौथा कोनाडा -
शशांकजी, चौथा कोनाडा -
प्रतिसादाबद्दल आभार.