पालक घडी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 February, 2014 - 05:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पालकची मोठी २०-२२ गरजेनुसार पाने
१ वाटी बेसन
थोडस हिंग
हळद अर्धा चमचा
१ चमचा मसाला किंवा अर्धा चमचा तिखट
प्रत्येकी अर्धा चमचा धणे,जीरे पावडर किंवा १ चमचा गोडा मसाला
पाव लिंबाचा रस
चविनुसार मिठ
शॅलोफ्राय पुरते तेल

क्रमवार पाककृती: 

पालकाची पानाबाहेरची देठे काढून पाने स्वच्छ धुवून घ्या.

बेसन मध्ये वरील जिन्नसातील तेल सोडून सगळे थोडे पाणी घालून मिस्क करून घ्या.

आता एका पानाला अळूवडीला लावतो तसे पिठाचे मिश्रण लावून घ्या.

त्यावर दुसरे पान ठेउन त्यालाही मिश्रण लावा आणि त्याची घडी घाला. घडीला वरूनही थोडे पिठ लावा.

आता ह्या पालकच्या घड्या १५ मिनीटे वाफवून घ्या.

आता शॅलो फ्राय केल्या की झाल्या तय्यार पालकाच्या घड्या किंवा वड्या. Happy

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी २
अधिक टिपा: 

पिठाचे मिश्रण अळूवड्यासारखेही करू शकता तसेच आपल्या आवडीनुसार अजुन काही काही जिन्नसे घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
टिव्ही वरील मेजवानीचा कार्यक्रम
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु मला पालक आवडत नाही, पण हा प्रकार छान दिसतोय. Happy तु स्टेपवाईज फोटो टाकतेस त्यामूळे पदार्थ कसा करायचा याचा नेमका अंदाज येतो Happy

मस्त

मस्तच रेसिपी.
मी पण एकदा असेच ट्राय केले होते. पण मी त्यात आपण आळु वडी करतो तसे ४-५ पानांचे लेयर्स दिले आणि मग त्याची वळकटी करुन, वाफवुन, वड्या करुन तळल्या. त्यात मी थोडे चिंच, गुळ आणि तीळ टाकले. म्हणजे आळु वडीच सारण फक्त आळुच्या पानांएवजी पालकाची पाने.

ओ वॉव.. उद्याच करून बघीन..
वाफवलेल्या आणी शॅलो फ्राय हे प्लस पॉइंट्स आहेत म्हणून.. Happy

मी आजच केल्या होत्या रताळ्याच्या पुरण पोळी सोबत. छान लागतात. बेत सर्वांनाच आवडला.

मस्त प्रकार. पण माझ्याच्याने हे वडया लावणे होत नाही. मी एकत्र गोळा करते, सैल कणिक भिजवावा तसा. आणि मस्त वाफवुन घेते. जाड / पातळ / कच्च्या हव्या तश्या वड्या खायच्या Happy

भन्नाट पाकृ आहे ही. हा मी केलेल्या घड्यांचा फोटो. एकच व्हेरिएशन केलं ते म्हणजे शॅलो फ्राय करताना मोहरी आणि लसूण घातला आधी तेलावर. सुंदर चव आली.

थँक्स जागू.

IMAG0485-crop_1.jpg

लगो, डायरेक्ट शॅलो फ्राय केलं तर बेसन नीट चिकटत नाही पानांना.
डायरेक्ट डीप फ्राय मात्रं भारी लागतं.
कॉलेस्टरॉल वैगेरेच विचार बाजूला ठेवल्यास. Wink
आमच्या इथे अळुच्या छोट्या पानांची (चिमकुरा म्हणतात) अशी चिमकुरा घडी करतात. पण डायरेक्ट डिप फ्राय करून.