प्रेमाचा दिवस..

Submitted by रमा. on 14 February, 2014 - 22:09

"प्रेमाचे रे कसले दिवस घालता??", पंतोजी डाफरत होते..

कुण्णी कुण्णी म्हणून त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते..बिल्डिंगमध्ये वॅलेंटाईन्स डे मोठ्या उत्साहाने साजरा होत होता.

दिवसभर पंतोजीनी जीव तोडून निषेध व्यक्त केला, पण बधतो कोण??

संध्याकाळी नेहमीप्रमाणे फिरून येताना त्यांनी कोपर्‍यावरच्या फुलवाल्याकडून सोनचाफा घेतला.

घरी येऊन तो उशाशी ठेवून एकटेच हुंगण्यापेक्षा त्यांनी का कोण जाणे, का़कुंच्या केसात माळला.

काय दिसलं त्यांच्या डोळ्यात काय माहित, पण सोनचाफा जरा जास्तच सुंदर दिसला हे नक्की..

"हे काय भलतच आज?" काकुंनी आश्चर्‍याने विचारले..

"हॅपी वॅलेंटाईन्स डे", पंतोजी लाजून म्हणाले..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा.... रमा, सुरेखच ! कोणताही अधिकचा फाफटपसारा न लावता अत्यल्प ओळीत फार मोठा आशय दडला असल्याची घटना तू इथे लिहिली आहेस....सुंदर....व्हॅलेन्टाईन डे ला विरोध करणारी व्यक्तीच त्याकडे आकर्षली जाते आणि त्यासाठी उपयोगात येतो तो नित्याचा सोनचाफा.

कथेचा शेवट "...पंतोजी लाजून म्हणाले...." फार आवडला, त्यानी लाजणे अगदी नैसर्गिक...अगदी चित्र नजरेसमोर आले.

लोकहो,

ज्याविरुद्ध डाफरतो तिथेच नेमके का बरं आपण आकृष्ट होतो? पूर्वी मुंबईत चाळी होत्या तेव्हा सकाळी रांगा लावल्या जायच्या. रांगेतला प्रत्येक माणूस ज्या गोष्टीवर डाफरायचा, नेमकी तीच गोष्ट करतांना सापडायचा थोड्या वेळातच!

काय गौडबंगाल आहे कळंत नाही! Wink Light 1

आ.न.,
-गा.पै.