मासिक भविष्य फेब्रुवारी २०१४

Submitted by पशुपति on 31 January, 2014 - 11:12

राशिभविष्य
फेब्रुवारी २०१४
(के.पी.पद्धतीप्रमाणे)

(टीप:सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्मरास व लग्नरास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )

मेष: ह्या राशीच्या व्यक्तींना उष्णतेचे त्रास संभवतात. शिवाय बुधामुळे एकाच वेळी इतर अनेक त्रास होण्याची शक्यता आहे, उदा. त्वचेची अलर्जी, डोकेदुखी, सर्दी-खोकला, हात-पाय दुखणे इ. काहींना प्रवासात अडथळे येण्याची शक्यता आहे, तरी प्रवास जपून करावा.नोकरी अगर व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा महिना अतिशय उत्तम आहे, काहींना प्रमोशन मिळण्याची पण शक्यता आहे. मुला-बाळांच्या दृष्टीने पण हा महिना समाधानकारक राहील. त्यांची सर्वांगीण प्रगती उत्तम होईल . वैवाहिक जोडीदारासंबंधी काहींच्या बाबतीत धुसफूस राहील, तर काहींचे जोडीदार परगावी गेलेले असतील. घरगुती वातावरण उत्तम राहील. घर सजावटीबाबत घरातील इतरांकडून वा जोडीदाराकडूनमहत्त्वाच्यासूचना मिळतील. ज्यांना घर भाड्याने द्यायचे आहे, त्यांना ह्या पंधरवड्यात भाडेकरू मिळतील. काहींना वाहन योग पण आहे. अनेकांना धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग आहेत आणि इतर सर्व धार्मिक बाबी देखील समाधानकारक होतील.

वृषभ:वृषभ राशीच्या लोकांना ह्या महिन्यात गृह सौख्याच्या बाबत संमिश्र अनुभव येतील...थोडक्यात प्रेमळ धुसफूस अनुभवायला मिळेल!! काहींना कष्टाशिवाय आर्थिक प्राप्तीचेयोग आहेत, उदा. वडिलार्जित इस्टेटीमध्ये वाटा. प्रकृतीसंबंधी सावधगिरी बाळगण्याचीआवश्यकता आहे. पोट आणि ओटीपोट ह्यासंबंधी आजार उद्भवू शकतात.नोकरी आणि व्यवसाय उत्तम राहील, मात्र काहीतरी कमतरता जाणवेल. व्यवसाय करणाऱ्यांना आणखी काही नव्या वाटा सापडण्याची शक्यता आहे.सरकारी नोकरी असणाऱ्यांना ह्या महिन्यात प्रमोशन अगर आर्थिक प्राप्तीचे बरेच चांगले योग आहेत. तसेच जे शिक्षक आहेत वा ज्यांचे क्लासेस आहेत,अश्यांना आर्थिक प्राप्तीचे आणि प्रसिध्दीचेउत्तम योग आहेत.ह्या राशीच्या लोकांनी ह्या महिन्यात प्रवास न करता घरगुती बाबतींमध्येजास्त लक्ष घालणेच उत्तम!!

मिथुन:मिथुन राशीच्या लोकांना अध्यात्मिक आणि धार्मिक बाबींसाठी हा महिना उत्तम आहे. ज्या लोकांना ध्यानधारणेची आवड असेल त्यांनी सामूहिक ध्यानात भाग घेतल्यास जास्त मन:शांती मिळू शकेल.गृह सौख्याच्या दृष्टीने देखील हा महिना उत्तम आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने ह्या महिन्यात विशेष घडामोडी संभवत नाहीत, त्यामुळे आहे तसेच चालू राहील. किरकोळ गोष्टी वगळता, मुलांच्या दृष्टीने हा महिना समाधान कारक राहील.मिथुन राशीच्या अनेक लोकांना भरीव सामाजिक कार्य केल्याचे समाधान मिळणार आहे. १५-१७ फेब्रुवारीच्या सुमारास काहींना छोट्या-मोठ्या प्रवासाचे योग आहेत.वाहने विशेष चिंता न करता शांतपणे चालवू शकता. (वाहनरोबोप्रमाणे तुमच्या ताब्यात राहील.) पंचमात अनेक ग्रह असल्याने काही गोष्टी वगळता, प्रकृतीच्या बाबतीत फारशी काळजी करण्याचे कारण राहणार नाही.काहींच्या बाबतीत नोकरीत बदल अगर बदली होण्याची शक्यता आहे.

कर्क: कर्क राशीच्या लोकांना उष्णतेचे थोडेफार विकार होण्याची शक्यता आहे. घरगुती बाबतीत काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा महिना सर्वसाधारण राहील. नोकरीमध्ये मानसिक ताण तणाव राहतील अथवा कामाचा जास्त बोजा राहील. त्यामुळे नोकरदारांनी वरिष्ठांशी समजुतीने घेणेच इष्ट!! वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने थोडेफार मतभेद होण्याची तयारी ठेवावी! मुलांच्या बाबतीत मात्र हा महिना समाधान कारक राहील. फारशा घडामोडी न होता, हा महिना सर्व साधारणपणे संमिश्र स्वरुपाचा जाईल.

सिंह :गृह सौख्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या लोकांना कुटुंबासाठी बराच खर्च करावा लागेल असे दिसते. काहींना कुटुंबाला घेऊन प्रवासालाही जावे लागेल ज्यात धार्मिक स्थळांचा ही समावेश होईल. जरी खर्च झाला तरी एकूण समाधानमिळेल. ज्यांनाछोटेमोठे प्रवास करावे लागतात, उदा. एजंट, अशांना प्रवासामार्फत जास्तआर्थिक प्राप्ती होईल. त्यामुळे छोटेमोठे प्रवास न कंटाळता करावेत. मुला-बाळांच्या दृष्टीने हा महिना समाधानकारक राहील. शाळकरी मुलांची अभ्यासातील प्रगती पालकांच्या मनासारखी राहील.नोकरी-व्यवसाय करणाऱ्या लोकांना प्रवासाचे बरेच योग आहेत.काहींना नोकरीत कायम स्वरुपाचाबदलहोण्याची चिन्हे आहेत. प्रकृती सर्व साधारण चांगली राहील, पण ज्यांना डोळ्याचे त्रास आहेत त्यांच्याडोळ्यांना उष्णतेचे त्रास होण्याची संभावना आहे. ज्यांना परदेश प्रवास करायची इच्छा आहे, त्यांच्या त्या संबंधीच्या कागदपत्रांच्या तयारीची प्रगती निश्चित होईल.

कन्या: कन्या राशीच्या लोकांना कफ, उष्णताइ. किरकोळ आजार वगळता प्रकृती चांगली राहील असे दिसते. ऑफिसच्या कामामुळे गृह सौख्याच्या बाबत थोडी न्यूनता येण्याची शक्यता आहे.नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना अतिशय उत्तम आहे. पण एकच दोष दिसतो की कारक ग्रह गुरु, वक्री आहे. त्यामुळे काहींना ह्याचा प्रत्यय ह्या महिन्यात अथवा काहींना पुढच्या महिन्यात येईल.(लेखकाचा अनुभव असा आहे की, वक्री ग्रह नेहमीच विलंब करतो अगर अडथळे आणतो असे नाही.) मुला-बाळांच्या दृष्टीने देखील हा महिना अतिशय उत्तम आणि समाधानकारक राहील, पालकांनी निश्चिंत राहावे!! ह्या महिन्यात कामानिमित्तच प्रवास होण्याचे योग दिसतात.आर्थिक प्राप्तीचे योग देखील चांगले आहेत, पण थोडाफार विलंब संभवू शकतो. वाहन प्रवास सुखाचा होईल असे दिसते, त्यामुळे त्याबाबत निश्चिंत राहावे!!

तूळ:अध्यात्माची आवड असणाऱ्यांना हा महिना उत्तम आहे.सामूहिक ध्यानधारणेत सहभागी झाल्यास उत्तम फायदे मिळतील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देखील चांगलेच राहील. मात्र ज्यांना जुने शारीरिक रोग आहेत, त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आर्थिक प्राप्तीच्या बाबतीत हा महिना सामान्य राहील.नोकरी-व्यवसायात तुमच्या नावाचा विशेष उल्लेख केला जाईल. ह्या महिन्यात जोडीदाराशी जरा जमवून घ्यावे लागेल असे दिसते.प्रवास झाल्यास सुरळीत आणि आनंदाचा होईल. प्रवासात काही अडथळे संभवत नाहीत.कलाप्रेमी मंडळींना हा महिना उत्साहवर्धक राहील, प्रसिद्धी मिळण्याचे ही योग आहेत.

वृश्चिक:वृश्चिक राशीच्या लोकांना ह्या महिन्यात आर्थिक ताण सोसावा लागणार आहे. प्रकृती बाबतीत ही जागरूक राहावे लागणार आहे. कोणताही नवा उपक्रम हाती घेताना पूर्व नियोजन केल्याशिवाय सुरुवात करू नये, अथवा आर्थिक फटका बसू शकेल आणि नियोजन ही कोलमडून वेळेचा अपव्यय होईल! वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासात बरेच कष्ट घ्यावे लागतील. वैवाहिक जोडीदाराची मात्र उत्तम साथ राहील.अनेक लोकांच्या भेटीसाठीचा योग आहे. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी, त्याच बरोबर वाहनाचीही विशेष काळजी घ्यावी! घरगुती बाबतीत नवीन खर्चांना तोंड द्यावे लागेल.

धनु: धनु राशीला गुरु सोडता,एकुणात सर्व योग खूप चांगले आहेत. आर्थिक प्राप्ती उत्तम राहील. मुला-बाळांची प्रगती समाधान कारक राहील. नोकरी-व्यवसायात देखील नावाचा विशेष उल्लेख किंवा विशेष आर्थिक लाभ अथवा दोन्हीही मिळण्याची शक्यता बरीच आहे. तसेच, कदाचितविरंगुळ्यासाठीछोट्या-मोठ्या प्रवासाची शक्यता दिसते. प्रकृती एकंदरीत चांगलीच राहील, मात्र खाण्यावर नियंत्रण ठेवणेतेवढेच आवश्यक आहे!गृह सौख्य उत्तम राहील. वैवाहिक जोडीदाराशी सुद्धा खेळीमेळीचे वातावरण राहील.

मकर: मकर राशीच्या लोकांचे गृह सौख्य सर्वसाधारणराहील. नोकरी-व्यवसायात देखील प्रमोशन आणि आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने उत्तम योग आहेत. काहींना प्रत्यक्ष अनुभव यायला मार्च महिना पण उजाडेल. ह्या महिन्यात तुमचे सामाजिक स्थान उत्तम रित्या टिकून राहील.प्रकृती कोणत्याही तक्रारीविना चांगली साथ देईल. घरासंबंधी सर्व कामे व्यवस्थित पार पडतील.मुलांच्या अभ्यासाकडे थोडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मुले-बाळे आणि इतर नातेवाईक ह्यांच्या बरोबर बराचवेळ जाईल आणि हा वेळ आनंदात आणि समाधानात जाईल. एकंदरीत हा महिना सर्व दृष्टीने चांगला जाईल.

कुंभ:ह्या महिन्याच्या सुरुवातीला चंद्र तुमच्याच राशीत असल्याने मनाची चल बिचल बरीच वाढणार आहे. त्यामुळेप्रकृतीविषयी बऱ्याच प्रमाणात ताण जाणवेल. ह्याचा अर्थ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांनी प्रकृतीला विशेष जपणे आवश्यक आहे.गृह सौख्याच्या दृष्टीने हा महिना सर्वसाधारण राहील.मुला बाळांच्या बाबतीत मात्र हा महिना समाधान कारक राहील. वाहन चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. नोकरी व्यवसायात सुद्धा कामाचा बराच ताण पडेल. त्यातल्या त्यात एक गोष्ट समाधानाची म्हणजे, गुरु पंचमात आणि बरेच ग्रह नवम स्थानी असल्याने ध्यानधारणा करणाऱ्या लोकांना अतिशय उत्तम काळ आहे. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा ही योगप्रबळ आहे. नोकरी करणाऱ्यांचा मानसिकताण तणाव १५ फेब्रुवारी नंतर बराच कमी होईल. दुसऱ्या पंधरवड्यात वैवाहिक जोडीदाराशी सौहार्द पूर्ण संबंध राहतील. एकंदरीत पहिल्या पंधरवड्यापेक्षा दुसरा पंधरवडा चांगला जाईल!!

मीन:गृह सौख्याच्या बाबत हा महिना थोडा गरमागरम वाटतोय (त्यामुळे उबदार कपडे नाही वापरले तरी चालेल!!) आर्थिक प्राप्तीदृष्ट्यानशेअर मध्ये व्यवहार करणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी, नुकसान होण्याची शक्यता बरीच आहे. नोकरी-व्यवसायात विशेष काळजीचे कारण नाही. थोडे चिंतेचे वातावरण राहील, पण त्यामुळे दैनंदिन कार्यक्रमात अडथळे येणार नाहीत. प्रकृती सर्वसाधारणचांगलीच राहील, काळजीचे काही कारण नाही. दुसऱ्या पंधरवड्यात २० फेब्रुवारी पर्यंत नोकरीमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच घरगुती वातावरण पण थोडेफार निवळेल असे दिसते. वाहनाच्या बाबतीत सावधानता बाळगावी. ह्या पंधरवड्यात प्रकृतीकडे, विशेषत: डोळ्याच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. काहीलोकांना नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास घडतील. दोन्हीपंधरवडे बघता, हा महिना संमिश्र स्वरुपाचा राहील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users