श्री व्ही व्ही मुजुमदार ह्यांना फ्रान्सचा नाईट ऑफ दि नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीट पुरस्कार जाहीर

Submitted by मनस्विता on 30 January, 2014 - 10:19

श्री. वि. वा. मुजुमदार माझे मामा आहेत. त्यांच्या विषयीची ही माहिती द्यायला मला अतिशय आनंद होत आहे.

=========================================================================

श्री व्ही व्ही मुजुमदार यांचे मनः पूर्वक अभिनंदन

इस्टिटयूट ऑफ अप्लाईड रिसर्च या पुणे स्थित कंपनी चे प्रमुख श्री व्ही. व्ही. मुजुमदार (प्रभाकर मुजुमदार) यांना फ्रान्स राष्ट्राध्यक्ष्यांच्या वतीने नाईट ऑफ दि नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीट, फ्रान्स हा किताब नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

पुण्यातील अलियान्झ फ्रान्सिस दि पुणे या संस्थेसोबत सातत्याने केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना नाईट ऑफ दि नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीट, फ्रान्स हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

श्री व्ही. व्ही. मुजुमदार हे लघुउद्योजक आहेत. संशोधनामध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी बॉल-स्क्रुज आणि स्किड रोलर्स ही आयात पर्यायी उत्पादने भारतात सर्वप्रथम निर्माण केली. श्री. मुजुमदार यांना यापूर्वी तीन वेळा पारखे पुरस्कार, डहाणूकर पुरस्कार तसेच वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टि, जिनेव्हा यांचेतर्फे सुवर्णपदक आदी सन्मान मिळालेले आहेत. श्री मुजुमदार यांना मराठी, कन्नड, हिंदी, इंग्लिश याशिवाय जर्मन, फ्रेंच आणि स्पानिश या भाषा अवगत आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हार्दिक अभिनंदन!
त्यांची एक सविस्तर मुलाखत घ्या ना मायबोलीसाठी >+१
अलियान्झ फ्रान्सिस दि पुणे ही संस्था काय काम करते हे जाणून घ्यायला आवडेल.

ह्म्म… अलियान्झ फ्रान्सिस दि पुणे मध्ये केलेले काम हे माझ्या मामाच्या एकाच पैलूवर प्रकाश पाडणारे आहे. शून्यातून उभा केलेला लघु-उद्योग, वयाच्या ७१व्या वर्षी पायी केलेली नर्मदा परिक्रमा अश्या अनेक गोष्टी आहेत.

श्री, मुजुमदार यांचं अभिनंदन. Happy

मनस्विता,
एक दुरुस्ती सुचवतो.
लेजियाँ दॉ'नर हा फ्रांसचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि तो केवळ फ्रेंच नागरिकांनाच मिळतो.
ऑर्द्र नासिओनाल द्यु मेरित हा सन्मान जगभरातील नागरिकांना दिला जातो.

माधवी.,
आलियांस फ्राँन्झे द पूनाचे श्री. मुजुमदार अध्यक्ष आहेत.
आलियांस फ्राँझे या संस्थेच्या शाखा जगभरात आहेत. फ्रेंच भाषेचं शिक्षण देणं, फ्रेंच संस्कृतीचा प्रसार करणं ही या संस्थेची उद्दिष्टं आहेत.

मामांना मिळालेल्या ह्या सर्वोच्च सन्मानाबद्दल भाचीला किती आनंद झाला आहे ते भाषेवरून छान प्रतीत होत आहे. श्री.मुजुमदार यांच्या कर्तृत्वाविषयी तुम्ही मुलाखात घेण्याचे कबूल केले आहेच, त्याचवेळी सर्वार्थाने त्यांची ओळखही होईलच. नर्मदा परिक्रमा वयाच्या ७१ वर्षी पूर्ण करणे हे कौशल्यही वादातीत असेच मानावे लागेल.

नाईट ऑफ दि नशनल ऑर्डर ऑफ मेरीट पुरस्काराबद्दल श्री.मुजुमदार यांचे हार्दिक अभिनंदन.

सिम्पली ग्रेट!
श्री, मुजुमदार यांचे अभिनंदन.

>>>>>> श्री मुजुमदार यांना मराठी, कन्नड, हिंदी, इंग्लिश याशिवाय जर्मन, फ्रेंच आणि स्पानिश या भाषा अवगत आहेत.<<<<<< काही काही माणसे कसली जबरदस्त हुषार/बुद्धिमान असतात ना? Happy

श्री. मुजुमदार ह्यांचे हार्दिक अभिनंदन Happy

मनस्विता, त्यांची मुलाखत वाचायला आवडेल.