गोधडी

Submitted by अवल on 28 January, 2014 - 05:56

फिरले मी दिशा दाही
रुजवली नाती नवी
जोड जोडले आप्त काही
पण भेटले न मलाच मी

आत शोधते आज काही
रुजवते आज नवीन बी
खुणावते दिशा नवी
आशेस येई पालवी

मनातील धूळ जुनी
पुसुनी केली पाटी नवी
झाल्या गेल्या काळाची
शिवून टाकली गोधडी

टोचणा-या कितेक गोष्टी
गुंफल्या एकमेकीतुनी
उरे आता टोच कुठली
भोग सारे भोगुनी

गोधडी माझी सखी
उब देई, देइ उभारी
संगती माझ्याच मी
शोधेन, भेटेन मलाच मी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, खुपच सुरेख कविता आहे... गोधडीसारखीच ऊबदार Happy
तुझी ही पहिलीच कविता वाचली मी, नेहमी करतेस का? आणखी काय काय आहे तुझ्या पिटा-यात?

टोचणा-या कितेक गोष्टी
गुंफल्या एकमेकीतुनी
उरे आता टोच कुठली
भोग सारे भोगुनी>>>>>>>>>>>>> खूप छान!!