बंधने

Submitted by अज्ञात on 23 January, 2014 - 01:17

ओठांस बंधने हृदयाची
हृदयास प्रेरणा प्राणाची
प्राणास गती मन-शरिराची
शरिरास कुंपणे काळाची

काळास न आहे गोत कुणी
वय चिर ओघळणारे पाणी
अंतास अथांग जलाशय पण
त्यासही किनार्‍याची करणी

गुदमरे प्रयोजन जन्माचे
ईप्सित न कळते जगण्याचे
प्रणयात म्हणे क्षणशांती परि
सागरास अथक अशांती

………………. अज्ञात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप आवडली
पण शेवटची ओळ लयीत बसत नाही अर्थात हे महत्त्वाचे नसेलही पण मला खटकत राहिले सुसाट चाललेल्या.. लयीच्या राईडला उगाच ब्रेकरचा अडथळा ..असे वाटत राहिले