प्रीत खुळी

Submitted by अज्ञात on 12 January, 2014 - 02:36

एक हुंदका कुशीतला निश्वास सांडला आकाशी
वादळ विरले उरले लाघव हिरवळले चंद्रापाशी
उलगडल्या सावल्या नाचल्या रास जणू हृदयी कोषी
अवसेकाठी पुनव रंगली ना कळले अवचीत कशी

कळा मिळाल्या ऋतुपर्णांना गंध कळ्यांना ह्या वेळी
मेघ दाटल्या नभओळी अंगणी सणाची रांगोळी
वलय शहारा अंकुरला ओठांवर खळखळ ओघळली
जातकुळी ही प्रीत खुळी रुधिरावर अलगद पागोळी

……………………… अज्ञात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरीच समजली आणि आवडलीही Happy
बहुधा तुमची ही कविता मी आधी कुठेतरी वाचलेली होती असे सारखे वाटत आहे
पागोळी चा अर्थ तेवढा समजला नाही सांगाल का ?

आर एम डी, वैभव, के अंजली,

बरीच समजली आणि आवडलीही स्मित
बहुधा तुमची ही कविता मी आधी कुठेतरी वाचलेली होती असे सारखे वाटत आहे
पागोळी चा अर्थ तेवढा समजला नाही सांगाल का ?

सर,
साधारणतः मी टाकलेली कविता ही ज्या दिवशी टाकली त्याच दिवशी लिहिलेली असते. हीही अशीच नवीन आहे.असो.

"पागोळी" म्हणजे छतावरून ओघळलेला पाण्याचा थेंब. पाऊस सरल्या नंतरचे किंवा हिवाळ्यात साचलेल्या दहिवराचे (दहिवर म्हणजे दंव) असे थेंब ओघळल्यावर खाली साचलेल्या पाण्यावर त्यांची लयदार वलये उठतात ती विलोभनीय असतात.

सर्वांचे मनापासून आभार.... Happy