श्वास माझे

Submitted by जयदीप. on 4 January, 2014 - 01:48

मिळवणारे श्वास माझे
खर्चणारे श्वास माझे

मी अता शोधीत नाही
हरवणारे श्वास माझे

बोलका एकांत माझा
ऎकणारे श्वास माझे

मी अता मोजून घेतो
संपणारे श्वास माझे

त्या तुझ्या स्पर्शास सामिल
थांबणारे श्वास माझे

का मला घेऊन गेले
परतणारे श्वास माझे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली सगळेच शेर तसे छानच झाले अहेत
थांबणारे श्वास हा शेर कमी आवडला
शेवटच्या शेरात रदीफेत टायपो (टायपिंग मिस्टेक ) आहे