दाताच्या तारांची ट्रीटमेण्ट

Submitted by वेल on 1 January, 2014 - 04:03

हा लेख मी प्रश्नाचे उत्तर म्हणून लिहिला होता तो जसाच्या तसा पोस्टते आहे. एखाड्या आठवड्यात त्यात बदल करून अधिक माहिती टाकेन.
*****************************************************

मुळात दातांना तारा लावण्याची प्रक्रिया हे चेहर्‍याची आणि हास्याची सौंदर्य किंमत वाढवणे ह्यासाठी नाही आहे. ही प्रक्रिया आहे तोंडातला बिघडलेला चावा सुधारण्यासाठी.

आपण तोंड बंद करतो तेव्हा आपले पुढचे दात एक्मेकावर बसत नाहीत तर वरचे दात पुढे आणि खालचे त्याच्या मागे असे असतात. पुढच्या दातांनी योग्य चाव्यासाठी - खरे तर वस्तू तोडता यावी म्हणून त्या दातांचा कोन काय असावा, वरचा जबडा खालच्या जबड्याच्या किती पुढे असवा, वरची खालची पहिली परमनंट दाढ कशी बंड व्हावी ह्यासाठी काही ठोकताळे असतात. हे जबड्याचे नाते जर चुकले असेल तर दाताने अन्न चावण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो, अन्न चावायला वेळ लागतो, दात लवकर झिजतात, त्या दातात अन्नकण अडकून दाताला किड लागते. हे सगळे त्रास कमी व्हावेत म्हणून दाताची ट्रीट्मेण्ट करायची असते. फटी असलेल्या दातांना तारांच्या ट्रीटमेंटची गरज आहेच असे नसते.

{जर चावा योग्य असेल पण जबडा मोठा आहे आणि दात लहान ह्यामुळे फती असतील आणि त्याने तुम्हाला वाटत आहे की दातांचे सौंदर्य बिघडते तर त्याकरता विनियर्स लावू शकतात पण हा इथल्या चर्चेचा विषय नाही.}

कधी कधी सरळ व्यवस्थित जागी असलेल्या दातात, योग्य ठिकाणी बंद होणार्‍या दातात जबडा मोठा आणि दात लहान ह्या कारणाने नैसर्गिक फटी असतात. उदा - लहान मुलांचे दात. चार वर्षानंतर मुलाम्च्या दातात फटी दिसू शकतात कारण जबड्याची वाढ होत असते पण दात तेवढ्याच आकाराचे असतात. त्या फटी बंद करायला तारांची ट्रीट्मेंट गरजेची नसते. ह्या फटी वयानुसार बंदसुद्धा होतात.

मुलांना ताराम्ची ट्रीटमेण्ट करायची की नाही ह्याचा पहिला अंदाज वयाच्या आठव्या वर्षी घेता येतो जेव्हा त्यांच्या पहिल्या चारही दाढा पूर्णपणे आलेल्या असतात. आम्ही मजेने ह्या दाढांना तोंडतले राजे म्हणतो कारण ह्या दाढांचं महत्व तोंडात अनन्य साधारण असतं. ह्या दाढा एक्मेकावर कशा बंद होतात हे पहिल्यावरच तुमचे डेंटिस्ट ठरवतात की त्या मुलाला / मुलीला तारांच्या ट्रीटमेंटची गरज आहे का.

त्यामुळे तुम्हाला असे वाटले की माझ्या मुलाला/ मुलीला तारांच्या ट्रीटमेंटची गरज असू शकते तर सर्वात प्रथम तुमच्या फॅमिली डेंटिस्टचा सल्ला घ्यावा. तुमचा फॅमिली डेंटिस्ट तुम्हाला ओर्थोडोंटिस्टकडे रेफरन्स देतो. डायरेक्ट ओर्थोडोंटिस्टकडे शक्यतो जाऊ नये कारण दाताला लावणार्‍या तारांसोबत दातांची पूर्ण काळजी घेणे हे तुमच्या डेंटिस्टचे काम आहे ऑर्थो. चे नाही. ऑर्थो कडे ट्रीटमेंट चालू करण्यापूर्वी तुमचा फॅमिली डेंटिस्ट पेशंटचे कौन्सेलिंग करणे पेशण्ट मेंटली, फिझिकली आणि हॅबिच्युअली ट्रीटमेंट साठी तयार आहे की नाही हे पाहातो. मग तोंडाचा पूर्ण एक्स रे काढला जातो. त्यानंतर ऑर्थो डॉ सोबत कन्सिल्टिंग होते, ट्रीटमेंट प्लान ठरतो. काही ऑर्थोडॉ ट्रीटमेंट प्लान देण्यापूर्वीच सगळी किंवा पार्शल फी घेतात. काही ऑर्थो.डॉ फक्त कन्सल्टींग फी घेतात. काही ऑर्थोडॉ जर ते तुमच्या फॅमिली डॉ च्या क्लिनिकमध्ये कन्सल्टंट म्हणून येत असतील तर कन्सल्टींगसाठी कोणतीही फी घेत नाहीत. (असे फार कमी जण करतात.)

ट्रीटमेण्ट प्लान ठरल्यानंतर ऑर्थो ट्रीटमेण्टसाठी दात तयार करणे हे कामही फॅमिली डेंटिस्टचे असते. ऑर्थो ट्रीटमेण्ट पूर्वीच्या तयारी मध्ये पुढील गोष्टी येतात.
१. ऑर्थो ट्रीटमेंट म्हणजे काय केले जाते, काय होते, ट्रीटमेण्ट पूर्ण कधी होते. पुन्हा दात पुढे येऊ नयेत ह्यासाठी काय करायचे ह्याची पूर्ण माहिती देणे.
२. ट्रीटमेंटचा पूर्ण खर्च सांगणे. ह्यात उपदाढ काढणे, ओर्थोसाठी दात तयार करण्याचा खर्च, ब्रेसेसचा खर्च, ऑर्थोनंतरच्या रिटेन्शनचा खर्च - फिक्स्ड रिटेन्शनची गरज पडल्यास त्याचा खर्च जास्त कमी होईल का, ओर्थोनंतरच्या क्लिनिंगचा खर्च हे सगळे त्यात आले पाहिजे.
३. दाताला कीड लागली असेल तर ती साफ करून खड्डे भरणे.
४. दात सडला असेल - कीड मुळापर्यंत गेली असेल तर रूट कॅनाल करणे.
५. ओरल प्रोफायलॅक्सिस करणे- म्हणजेच दात साफ करणे. दातात कुठेही प्लाक टार्टर जमा असेल ते स्केलिंगने काढून दात पॉलिश करणे.
६. हिरड्या सुजल्या असतील तर त्या साफ करने आणि त्या नॉर्मल होईपर्यंत पेशण्टची ऑर्थो ट्रीटमेंट सुरू करू न देणे.
७. ज्या उपदाढा काढायची गरज असेल त्या काढणे आणि ती जखम व्यवस्थित भरली गेली आहे की नाही हे पाहाणे. (दाढा काढल्या जात नाहीत, उपदाढा काढल्या जातात. सुळ्यांच्या लगेचच मागच्या छोट्या दाढा. जर कोणी दाढा किंवा सुळे काढायचा ऑप्शन दिला तर ताबडतोब डेण्टिस्ट बदला.)
८. तारांच्या ट्रीटमेंटमध्ये किती दुखते, का दुखते, ती दूख किती काळ राहाते, ट्रीटमेंट चालू असताना घ्यायची काळजी, खायचे पथ्य, तारांच्या ट्रीटमेण्ट चालू असण्याच्या काळात दात कसे साफ ठेवायचे, त्याप्रकारे दात साफ ठेवले आहेत की नाही ते पाहाणे, ट्रीटमेंट संपल्यानंतर घेण्याची दाताम्ची काळजी, रिटेन्शन प्लेट, रिटेन्शन प्लेटचे तोटे ह्यासगळ्याची माहिती देणे
९. तारांची ट्रीटमेण्ट संपल्यानंतरही दात जागेवर आहे का ती ट्रीटमेण्ट रिलॅप्स होते आहे हे पाहणे असे असल्यास पुढचा अ‍ॅक्शन प्लान ठरवणे.

हे सगळे प्रोटोकॉल तुमच्या फॅमिली डेंटिस्टने पाळले पाहिजेत. जर तुम्ही फॅमिली डेंटिस्ट च्या रेफरन्स शिवाय ऑर्थोडॉ. कडे गेला असाल तर हे प्रोटोकॉल ऑर्थोडॉ ने पाळले पाहिजेत. जर डेंटिस्टने हे पाळले नसतील तर पेशंट्ला फसवले गेल्याची भावना होणे साहजिक आहे.

जर पेशंट तयार नसेल तर फॅमिली डेंटिस्टकडून रेग्युलर व्हिजिटमध्ये पेशंटचे कौन्सेलिंग होत राहाते. कित्येकदा पालकांना उत्साह असतो मुलांची ट्रीटमेंट करून घेण्याचा पण मुले मानसिकरीत्या तयार नसतात. जर फॅमिली डेंटिस्ट ना वाटत असेल की ही ट्रीटमेण्ट करणे आत्ता करने मस्ट आहे तर ऑर्थो. कडे कन्सल्टिंग करून घ्यावे. मग त्या ट्रीटमेण्ट केल्याचे आणि न केल्याचे प्रोज कॉन्स समजून घेऊन मग निर्णय घ्यावा. शिवाय ऑर्थो ट्रीटमेण्टच्या पूर्वतयारीमध्ये थोडा वेळ निघून जातो त्यात आपले मूल खरच तयार आहे का नाही हेही आपल्याला कळते.

जर पेशंट मेटली तयार नसेल तरही ट्रीटमेण्ट सुरू करू नये. कारण बाकीच्या ट्रीटमेण्टसारखी ही ट्रीटमेण्ट महिन्याभरात संपणारी नाही. ह्यात जर मुलांना कंटाळा आला तर मुले ट्रीटमेण्ट अर्धवट सोडून द्यायचा विचारही करतात. त्यामुळे पेशण्ट मानसिकरित्या तयार असेल त्याच्यात जर अँझायटी, भीती नसेल तरच ही ट्रीटमेण्ट सुरू करावी. बरेचदा सुरुवातीचा मुलांचा उत्साह ट्रीटमेंट अर्ध्यावर येई पर्यंत संपतो, तेव्हा फॅमिली डेंटिस्ट खूप महत्वाची भूमिका बजावतात - कौन्सेलिंग, दातांचा क्लीनअप वगैरे.

वत्सलाचा प्रश्न दाढा का काढाव्या लागतात - जबडा लहान असल्याने दात वेडेवाकडे असल्याने तेच दात जर सरळ रेषेत बसवायचे असतीत तर उपदाढा काढणे मस्ट आहे. अगदी हेल्दी असलेली उपदाढ काढावी लागते तेव्हा वाईट वाटते पण काही दुसरा पर्याय नसतो.

अशोक ह्यांचा प्रश्न - दुधाच्या दातावर ही ट्रीटमेण्ट होऊ शकतच नाही. ही ट्रीटमेण्ट परमनंट दाताम्साठीच असते. केवळ दातात फटी आहेत म्हणून ही ट्रीटमेण्ट करू नये. ही ट्रीटमेण्ट करायची गरज आहे का नाही ह्याचा परामर्ष वयाच्या आठव्या वर्षीच घ्यावा, त्यापूर्वी नाही. (जबड्याची डिफॉर्मिटि असेल तरच त्यापूर्वी दोन तीन डॉ कडून सल्ला घ्यावा). कोल्हापूरमध्ये राजारामपुरी ह्या भागात ह्या ट्रीटमेण्टचा नॉर्मल खर्च २००००-२२००० आहे. जर जबड्यात खूप डिफॉर्मिटि असेल तर खर्च वाढू शकतो. परंतु ट्रीटमेण्ट करायचीच नाही हे ठरवण्यापूर्वी ती का करायची आणि केली नाही तर काय त्रास होईल हे दुसर्‍या डेंटिस्ट कडून समजावून घ्यावे.

साधना ह्यांचा मुद्दा - ट्रीटमेंट चालू असताना दात थोडे नाजूक असतात. कारण दात हलत असतात. दातांखालचे हाड झिजत असते, पुन्हा तयार होत असते.

नितीनचंद्र - ट्रीटमेण्ट झाल्यावर पेरू किंवा चिक्की हे पदार्थ खाण्यास सर्वसाधारणपणे हरकत नसते. तुम्हाल डॉ ने सांगितले आहे का खाऊ नका म्हणून.? तुमच्या पुढच्या दातांवर कॅप बसवली आहे का?

काही मुलांची ट्रीटमेंट लवकर सुरू करावी लागते कारण त्यांचा जबडा लहान असतो, पुढे मागे असतो. तो जबडा मायक्रोइम्प्लांटस घालून थोडा मोठा करावा लागतो, जागेत आणावा लागतो, हे काम सगळे परमनंट दात येण्यापूर्वी करावे लागते. त्यामुळे ही ट्रीटमेण्ट ८-१३ वयात होते. अक्कल दाढा सोडून बाकीचे सगळे परमनंट दात १३व्या वर्षापर्यंत येतात. ज्या मुलांना केवळ दात सरळ करून हवे असतात जबडयाची हालवा हालव करायची नसते त्यांची ट्रीटमेण्ट तेराव्या वर्षानंतर केलेली चालते. (वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षीसुद्धा ही ट्रीटमेण्ट करता येते.)

ब्रेसेस काढल्यानंतरही दातांच्या हालचाली चालू असतात. तेव्हा दाताची पुन्हा हालचाल होऊन ते नवीन जागेवरून हलू नयेत म्हणून रिटेन्शन प्लेटची गरज असते. प्रत्येक डॉ स्वत:च्या अनुभवानुसार आणि पेशंटच्या गरजेनुसार रिटेंशन प्लेट बनवून देतो. काही प्लेटस पूर्ण टाळू झाकत नाहेत. काही प्लेटस पातळ पण मजबूत मटेरिअलच्या असतात. काही प्लेटस पूर्णपने टाळू झाकतात, काही जाड मटेरिअलच्या बनवल्या जातात आणि त्या कधी कधी रफ असतात (ह्याचे कारण मात्र डॉ चा चॉईस हेच आहे. पूर्‍न टाळू झाकणे, जाड मटेरिअल, रफनेस ह्याची गरज नसते.) कधी कधी रिटेन्शन प्लेट न देता, पेशण्टच्या गरजेनुसार - सवयींनुसार फिक्स्ड रिटेशन दिले जाते, दाताच्या आतल्या बाजूने ते लावले जाते. परंतु जर जबडा वाढवण्याची , हलवण्याची ट्रीटमेण्ट झाली असेल तर रिटेशन प्लेटच दिली जाते. आणि ती वापरली नाही तर ट्रीटमेंट रिलॅप्स होते. कधी कधी रिलॅप्स इतके जास्त असते की दाताची ओरिजिनल स्थिती परवडली असे वाटते. अशा स्थितीत दात आल्यास करेक्शन ट्रीटमेण्टचा खर्च वाढतो. कधी कधी थोडीशीच हालचाल झाल्याने थोड्याश्याच खर्चात दात चांगल्या स्थितीला आणता येतात. ह्याचकरता रोज रिटेन्शन प्लेट वापरण्यासोबत फॅमिली डेंटिस्टकडे रेग्युलरली जाऊन चेकप करून घेणे महत्वाचे असते. रिटेन्शन प्लेट लावल्यावर काही मुलांना उलटीची भावना होऊ शकते, तेव्हा रिटेन्शन प्लेट न लावणे हा त्यावर उपाय नाही. त्याऐवजी डॉ कडे जाऊन रिटेन्शन प्लेटला पर्याय शोधावा.

ही ट्रीटमेट सुरू होण्यापूर्वी तोंडाचा पूर्ण एक्स रे काढला जातो - ओपीजी - ऑर्थोपेंटोग्राम. तसेच दातांचे वेगवेगळ्या कोनातून फोटो काढले जातात. बरेचदा केस सुरू होण्यापूर्वी दाढा एक्मेकावर कशा बंद होतात, डिफॉर्मिटि नक्की कुठे आहे, हे अभ्यासण्यासाठी तोंडाचे माप घेऊन मॉडेल बनवले जाते ज्यावर तुमच्या दातांची प्लेसमेण्ट कशी आहे, कोणत्या ट्रीटमेण्टचा सल्ला दिला जात आहे व का हे सगळे समजावले जाते. ट्रीटमेंट संपताना पुन्हा एकदा दातांचे वेगवेगळ्या कोनातून फोटो काढले जातात. ओपीजी, हे सारी अधी आणि नंतरचे फोटोज डो स्वतःकडे जपून ठेवणार आहेत की नाही ह्याची खात्री करून घ्यावी. शिवाय हे तुम्ही तुमच्याकडे जपून ठेवावे. अभ्यासण्याचे मॉडेल सुध्दा डॉ बर्‍याचदा तुम्हाला देतात तेही जपून ठेवावे.

आता प्रश्न येतो ही ट्रीटमेण्ट इतकी महाग का असते. मुळात ऑर्थो ट्रीटमेंट करता येणारे सगळे मटेरियल महाग असते. त्यातले मोस्ट सगळे मटेरियल इम्पोर्ट होते. शिवाय ऑर्थो मध्ये दोन पद्धतीच्या ट्रीटमेंट असतात एक जुनी ट्रीटमेण्ट ज्यात कमी कष्ट, कमी मटेरियल, कमी खर्च येतो पण ती ट्रीटमेण्ट रिलॅप्स होण्याचे चान्सेस दुसर्‍या ट्रीटमेण्ट पेक्षा जास्त असतात.

आजकाल बाजारात सिरॅमिकचे ब्रेसेस जे दाताच्या रंगाचे आहेत ते आले आहेत. ते वापरायचा निर्णय घेतल्यास त्याची ट्रीटमेण्ट कॉस्ट जास्त असते. शिवाय, काही जण ब्रेसेस बाहेर दिसू नयेत म्हणून दाताच्या आतून लावून घेतात त्याचीही किंमत जास्त असते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठाण्यामधे या Treatment साठी चांगले clinic कोणी सुचवू शकाल का ? माझी मुलगी ११ वर्षाची आहे,मी तिला
dentist कडे नेले होते. त्यांनी जबडा मायक्रोइम्प्लांटस घालून थोडा मोठा करावा लागेल हे सांगितले आहे पण जे Ortho Doc तेथे येतात त्यांची Frequency and Reviews मला योग्य नाहि वाटले.

Please help.

माझा मुलगा वय वर्षे १० याला ३ महिन्यांपूर्वीच ब्रेसेस लावल्या आहेत. त्याला सजेस्ट केलेला ट्रीटमेंट प्लॅन असा:-

पूर्ण ट्रीटमेंट २ फेजेसमध्ये पार पडेल
१ - फेज १ - कालावधी ६-८ महिने
त्यानंतर दोन ते अडीच वर्षे ब्रेसेस फ्री पिरिएड
२- फेज २ - कालावधी - दीड ते दोन वर्षे
डॉ.च्या मते पहिल्या फेजमध्ये जेव्हा काही दात दुधाचे व काही कायमचे आलेले असे असतात तेव्हा वापरलेल्या विशिष्ट उपकरणांमुळे नंतरच्या ट्रीटमेंटमध्ये अपेक्षित असणारा जबड्याच्या आकार वगैरे कंट्रोल करता येतो व कधी-कधी उपदाढा काढाव्या लागत नाहीत.

याबद्दल कृपया काही सांगू शकाल का?

मी प्रणवला ऑर्थो कडे १२ वर्षांचा असताना नेले, त्यानी लगेच ट्रीटमेंट सुरू नाही केली. पण दोन वर्षे फक्त वाढ कशी होतेय दातांची ते बघण्यासाठी ३-३ महिन्यानी बोलावले. जेव्हा चौदाव्या वर्षी सगळे दात व दाढा दिसू लागल्या तेव्हा ब्रेसेस १ वर्षासाठी बसवले. मग एक वर्ष (दहावीचे) ब्रेसेस काढून व्यवस्थित चावता येते की नाही, दात किती कडक गोष्टी सहन करू शकतात इ. पाहिले. व अकरावीत असताना फक्त रात्री वापरायला क्लिप दिली आणि बारावी संपली की पुढचे पाहू असे सांगितले. त्याचे दात वाकडे नव्हते पण पुढे होते नि फटी खूप होत्या. आता हसला की डॅशिंग दिसतो Wink