पुरुषसुक्त

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 28 December, 2013 - 13:22

पुरुषसुक्त ही ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील एक प्रार्थना आहे.(ऋग्वेद १०.९० ) या मध्ये पुरुष म्हणजे कुठलाही विशिष्ट देव नसून परमात्मा आहे. याचे कर्ते नारायण ऋषी होते. पुरुषसुक्ताच्या दोन संहिता आहेत .एका संहितेत १६ ऋचा आहेत ,त्यातील १५ अनुष्टुभ छंदात आणि १६ वी त्रिष्टुभ छंदात .
दुसऱ्या संहितेत २४ ऋचा आहेत, यापैकी १८ पुर्वनारायण ज्यात पुरुषाची स्तुती आहे आणि ८ उत्तर नारायण ऋचा आहेत.
पुरुषसुक्त हे साधारण कुठल्याही यज्ञाच्या सुरवातीला गात असत. त्यामुळे त्याची सुरवात आणि शेवट शान्तिपाठाने होतो
.सगळीकडे शांती असो, सर्व प्राणी [आणि यात चतुष्पादांचा उल्लेख आहे] सुखात राहो. त्यानंतर “ ओम शांती शांती शांती ” हे स्तवन आहे .आपल्या समाजात हे माहित नसते की शांतीपाठात शांती हा शब्द तीनदा का वापरला जातो . तीनदा शांती शब्द वापरण्यामागे ‘शरीर ,मन आणि आत्मा’ या तीन गोष्टींसाठी शांती अभिप्रेत आहे.

पुरुषसुक्त हा जगाबद्दल आणि परमात्म्याच्याबद्दल प्रार्थनेव्दारा केलेला विचार आहे. हा पुरुष अथवा जग/चराचर व्यापणारा परमात्मा जगात सगळीकडे आहे आणि त्यापासून तरीही वेगळा आहे. या अस्तित्वाला विश्व आकाराला आणण्याची इच्छा झाली आणि म्हणू हे विश्व अस्तित्वात आले अशी काहीशी कल्पना आहे.
ऋचा २ ते ५ या पुरुषाचे वर्णना करतात की सर्वव्यापी ,सर्व करणारा आहे. त्याला कवीदृष्टीने हजार शिरे [डोकी ] आहेत ,असंख्य हात आहेत आणि तो या जगाला सर्वबाजूने वेधून आहे आणि तरीही दशांगुळे उरतो. त्याचा फक्त १/४ भाग हा या व्यक्त जगात आहे आणि ३/४ भाग हा ब्रम्हांड व्यापून आहे.आणि हे ३/४ माणसाला कळण्याच्या पलीकडे आहे. या जगातील प्रत्येक व्यक्त आणि अव्यक्त गोष्ट या पुरुषामुळे आहे.
या ठिकाणी एक गोष्ट ध्यानात घेणे आवश्यक आहे की येथे पुरुष या शब्दाने चराचराला व्यापणारे एक तत्व अभिप्रेत आहे .ते अमूर्त,अविनाशी,अनंत,अशरीरी आहे.ही त्या काळाच्या मानाने एक फार क्रांतिकारी कल्पना आहे.

ऋचा ५ ते १५ हे जग या पुरुषाने कसे निर्मिले आहे याचे वर्णन आहे. जरा थोडा वेळ श्रद्धाळू दृष्टी बाजूला ठेवून याचा अभ्यास करा. त्या काळाच्या लोकांना जगाबद्दल ज्या कल्पना करणे शक्य होते [आणि त्या कल्पना या त्या काळाला अनुसरून होत्या हे ही महत्वाचे आहे.] त्या कल्पना अतिशय सुरेख रीतीने या सूक्तात मांडल्या आहेत.
या पुरुषापासून[तत्वापासून ] एक विराट पुरुष उत्पन्न झाला . त्या विराट पुरुषापासून मग ब्रह्मन किंवा ब्रम्ह निर्माण झाले. त्या ब्रह्माने मग सर्व जग व्यापले आणि मग ही पृथ्वी,ग्रह, तारे इ. त्याने उत्पन्न केले आणि सर्वांसाठी शरीरे निर्माण केली.

इथे मग हे पुरुषसुक्त अतिशय वेगळी आणि लोभस अशी तत्त्वज्ञांनाची कल्पना मांडते. हे जरा काळजीपूर्वक वाचावे ही विनंती, कारण ही थोडी कठीण कल्पना आहे.

कुठलाही यज्ञ करताना त्यात देवाना हवन करून काहीतरी अर्पण करणे जरुरी असते. यज्ञात बळी म्हणून प्राणी देत आणि त्या प्राण्याचे शरीर बळी दिल्यावर कापून त्याचे वेगवेगळे भाग अधिकाराप्रमाणे पुरोहित आणि यजमान यांना भक्षणासाठी दिले जात.
पुरुषसुक्तात वर्णिले आहे की मग हे जग निर्माण व्हावे यासाठी स्वतः देवानी यज्ञ मांडला . सर्वसाधारणपणे देवाना उद्देशून यज्ञ करतात [त्या त्या देवाच्या कृपेसाठी]. इथे स्वतः देव जगनिर्मितीच्या फलप्राप्तीसाठी यज्ञ करत आहेत. यज्ञात जे अर्पण करतात ते फार महाग असे,जसे गाय, घोडा आणि इतर प्राणी . या ठिकाणी देवांनी बळी म्हणून त्या पुरुषालाच अर्पण केले.
या महाप्रचंड यज्ञात वसंत ऋतू हा तूप म्हणून वापरला, ग्रीष्म ऋतू हा समिधा [लाकूड] म्हणून अग्नीसाठी वापरला. पावसाळा हा ऋतू नेवेद्य म्हणून वापरला.
यज्ञकुंडाच्या सप्तसीमा म्हणून पंचमहाभूते,दिवस आणि रात्र हे वापरले.
पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये ,शरीरातील पंचनाड्या, मन ,बुद्धी,जाणीव, अहंकार,धर्म आणि अधर्म ह्या २१ आहुती यज्ञात वाहील्या.
आणि मग देवानी मांडलेल्या या महायज्ञात या पुरुषाची बळी दिला.

अशा या यज्ञातून मग प्रसाद म्हणून दही आणि तूप आले. त्या पुरुषापासून मग वने ,राने, सर्व पाळीव प्राणी सर्व जंगली प्राणी ,सर्व पशुपक्षी निर्माण झाले.
जग व्यापणाऱ्या अग्नीपासून ऋग्वेद,सामवेद आणि यजुर्वेद निर्माण झाले. [यावरून हे सुक्त बरेच पुरातन असणार आणि अथर्ववेदाच्या आधीचे असणार.कारण या वेदाचा यात उल्लेख नाही.]

या यज्ञवेदीतून मग गायत्री, वृहती, उष्णिक, जगती, पंक्ति अनुष्टुभ तथा त्रिष्टुभ हे सप्तछंद निर्माण झाले. सप्तछंद हे वेदकालीन पदरचनेचे [कवितेचे] प्रकार आहे. आपली बहुतेक जुनी स्तोत्रे यापैकी एका छंदात रचलेली असतात.
या यज्ञातून मग घोडे,गायी, बकरे आणि मेंढे निर्माण झाले.[ हे त्या काळाचे महत्वाचे प्राणी होते.]

पूर्वीच्या काळी यज्ञात प्राणी बळी दिला जात असे आणि त्या प्राण्याचे वेगवेगळे भाग हे शिजवून त्या यज्ञातील वेगवेगळ्या ब्राह्मणांना अधिकाराप्रमाणे आणि यजमानाला भक्षणार्थ दिले जाते. इथे जगनिर्मितीच्या यज्ञात तो पुरुष बळी दिला अशी कल्पना आहे. मग त्या पुरुषाच्या वेगवेगळ्या अवयवाचे देवानी काय केले हे वर्णन पुढे येते.
त्याचा चेहरा ब्राह्मण झाला, त्याचे बाहू राजे[क्षत्रिय] झाले, त्याच्या मांड्या वैश्य झाल्या आणि त्याचे पाय शुद्र झाले.
त्याचे मन हा चंद्र झाला ,त्याचे डोळे सूर्य झाले, त्याच्या चेहऱ्यापासून इंद्र आणि अग्नी झाले ( ऋग्वेद काळात या देवता प्रमुख होत्या.) त्याच्या श्वासापासून वायू झाला. त्याच्या बेंबीमधून अंतरीक्ष आले.त्याच्या डोक्यापासून सप्तस्वर्ग , त्याच्या पायापासून जमीन आणि दशदिशा झाल्या.
अश्या रीतीने या यज्ञात या पुरुषापासून सर्व जग उत्पन्न झाले.आणि हा तो पुरुष महानतम आहे हे वेद सांगतात. तो सूर्यासारखा तेजोमय आहे. [आदित्यवर्ण]
असा तो पुरुष आहे की ज्याने सर्व आकार आणि सर्व नावे घेतली आहेत. जो ब्रह्माने बघितला आणि जो सर्व दिशा व्यापून आहे असा इंद्राला दिसला.
तो ज्याला कळला तो अमर होतो आणि मला त्याच्या शिवाय दुसरा कुठलाही मार्ग माहित नाही.

देवानी या पुरुषाची यज्ञाने पूजा केली [यज्ञेन यज्ञमयजंत: देवा ....ही ओळ आपण मंत्रपुष्पांजलीत वापरतो] आणि [त्याला ओळखणे] हे धर्माचे आद्य कर्तव्य आहे.

जे लोक हा धर्म पाळतील ते देवलोकाला प्राप्त होतील.

जल आणि जमीन यापासून हे विश्व तयार झाले. मग ब्रम्हाला निर्माण केले गेले. त्या ब्रह्माने मग सर्व प्राणी निर्माण केले. त्या पुरुषाने मग ब्रम्हाने निर्माण केलेले सारे काही व्यापले.जग काय आणि कसे असावे हे जगाच्या निर्मितीच्या वेळेस ठरविले गेले.
सूर्यासारखा असा तो प्रखर तेजस्वी आहे ज्यामुळे अज्ञानाचा अंधार नाश पावतो.त्याला जो जाणतो तो विद्वान अमरत्व पावतो. तो स्वतः जरी अजन्मा असला तरी तो अनेकविध जन्म [रूपे] घेतो.
फक्त ज्ञानी लोक त्याचे खरे रूप जाणतात.
मी त्या ब्रह्माला नमन करतो जो देवांचा पुरोहित आहे आणि जो देवांच्या आधीपासून आहे. इ.इ

हे असे आहे पुरुषसुक्त ...........

पुरुषसुक्तावर चातुर्वर्ण्याचा समर्थनाचा आरोप केला जातो तो मुख्यत्वे ब्राह्मण ,क्षत्रिय,वैश्य आणि शुद्र कसे निर्माण झाले त्यावरून.
आदिपुरुषांपासून जग निर्माण झाले ही कल्पना या सूक्तात नसून त्याला स्वयं तत्वाला बळी देऊन त्याचे वेगवेगळे अवयव कापले. त्याकाळच्या यज्ञाच्या रीतीप्रमाणे बळीच्या प्राण्याचे वेगवेगळे अवयव हे पुरोडाश बनवून अधिकाराप्रमाणे खाण्यास दिले जात.

यामध्ये टीकाकार काही गोष्टी लक्षात घेत नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे त्या आदिपुरुषाला बळी बनवून देवानी यज्ञ केला ही एक कविकल्पना आहे. या ठिकाणी पुरुष हे निराकार,अनंत,अजन्मा असे चराचराला व्यापून राहणारे तत्व आहे. तो कुठलाही प्राणी अथवा मनुष्य नाही. देवानी त्याला बळी बनवून यज्ञ केला ही एक कविकल्पना आहे आणि ती तशीच तपासली पाहिजे.त्याच्या वेगवेगळ्या अवयवापासून अनेक गोष्टी झाल्या आहेत. अग्नी, इंद्र ,वायू, वेगवेगळ्या जाती अथवा वर्ण इ.इ.सुध्दा त्यापासून निर्माण झाले. त्याच सोबत या यज्ञात वेगवेगळे ऋतू अर्पण केले. पंच महाभूते इ.इ. वापरले गेले अशी ही व्यापक कल्पना आहे.
सुक्तकर्ता ज्या समाजाचा सदस्य होता त्या समाजात चातुर्वर्ण्य होते आणि त्यात उतरंड सामाजिक दृष्टीने होती त्यामुळे सुक्तकर्ता ती उतरंड काव्यात मांडणार हे ही साहजिक आहे. ही कल्पना करणारा कवी सुध्दा त्या काळात होता आणि त्या काळाचा प्रतिनिधी होता. जसे त्या काळी विष्णू, शिव इ.इ. देवता अस्तित्वात नव्हत्या म्हणून त्यांचा उल्लेख नाही म्हणून आपण त्या सुक्तकर्त्याला शिव्या देऊ शकत नाही तसेच त्याने चातुर्वर्ण इ.चा उल्लेख केला म्हणून त्याला दोष देण्यात काही अर्थ नाही.

चातुर्वर्ण समर्थन आणि भेदाभेदाच्या कल्पना या अतिशय स्पष्ट शब्दात स्मृतीग्रंथात मांडल्या आहेत .उदा. मनुस्मृती कारण ते कायदे हा त्या ग्रंथाचा विषय होता.रामायण, महाभारत ,पुराणे यातून आणखीन स्पष्ट उल्लेख ,कायदे मिळतात पण असे काहीही पुरुषसुक्तात नाही कारण तो पुरुषसूक्ताचा विषयच नाही,

तेंव्हा हे सुक्त हे त्याकाळच्या समाजाचे चित्र आहे त्यामुळे ते चातुर्वर्ण्याचे समर्थन करीत नसून फक्त सुक्तकर्ता ज्या समाजात वावरत होता त्या समाजाचा तत्कालीन विश्वास वर्णन करते.तेंव्हा पुरुषसुक्ताला चातुर्वर्ण्याच्या पापाचे धनी बनविणे बरोबर नाही.
चूक आपली हल्लीच्या काळात होते की कर्मठ लोक ही कवीकल्पना शास्त्राधार म्हणून आजच्या काळात वापरतात आणि त्याचे समर्थन करतात.

जिज्ञासूंसाठी मी खाली मुळ सुक्त देत आहे.

॥ पुरुष सूक्तं ॥ ओं तच्छंयो रावृणीमहे। गातुं यज्ञाय। गातुं यज्ञपतये। दैवीस्स्वस्तिरस्तुनः। स्वस्तिर्मानुषेभ्यः। ऊर्ध्वं जिगातु भेषजं। शं न्नो अस्तु द्विपदे। शं चतुष्पदे। ओं शांतिः शांतिः शांतिः॥ सहस्रशीर्षा पुरुषः। सहस्राक्ष सहस्रपात्। स भूमिं विश्वतो वृत्वा। अत्यसिष्ठद्दशांगुलम्। पुरुष एवेदगुं सर्वम्। यद्भूतं यच्च भव्यम्। उतामृतत्वस्येशानः। यदन्नेनातिरोहति। एतावानस्य महिमा। अतो ज्यायागुंश्च पूरुषः॥ पादोस्य विश्वा भूतानि। त्रिपादस्यामृतं दिवि। त्रिपादूर्ध्व उदैत्पुरुषः। पादोस्येहाभवात्पुनः। ततो विष्वङ् व्यक्रामत्। साशनानशने अभि। तस्माद्विराडजायत। विराजो अधि पूरुषः। स जातो अत्यरिच्यत। पश्चाद्भूमिमथो पुरः॥ यत्पुरुषेण हविषा। देवा यज्ञमतन्वत। वसंतो अस्यासीदाज्यम्। ग्रीष्म इध्मश्शरद्धविः। सप्तास्यासन् परिधयः। त्रिस्सप्त समिधः कृताः। देवा यद्यज्ञं तन्वानाः। अबध्ननं पुरुषं पशुम्। तं यज्ञं बर्हिषि प्रौक्षन्। पुरुषं जातमग्रतः॥ तेन देवा अयजंत। साध्या ऋषयश्चये। तस्माद्यज्ञाथ्सर्वहुतः। संभृतं पृषदाज्यम्। पशूगुंस्तागुंश्चक्रे वायव्यान्। आरण्यान् ग्राम्याश्च ये। तस्माद्यज्ञाथ्सर्वहुतः। ऋचस्सामानि जज्ञिरे तस्मात्। यजुस्तस्मादजायत॥ तस्मादश्वा अजायंत। ये के चोभयादतः। गावो ह जज्ञिरे तस्मात्। तस्माज्जाता अजावयः। यत्पुरुषं व्यदधुः। कतिधा व्यकल्पयन्। मुखं किमस्य कौ बाहू। कावूरू पादावुच्येते। ब्राह्मणोस्य मुखमासीत्। बाहू राजन्यः कृतः॥ ऊरु तदस्य यद्वैश्यः। पद्भ्यागुं शूद्रो अजायत। चंद्रमा मनसो जातः। चक्षोस्सूर्यो अजायत। मुखादिंद्रश्चाग्निश्च। प्राणाद्वायुरजायत। नाभ्या आसीदंतरिक्षम्। शीर्ष्णो द्यौस्समवर्तत। पद्भ्यां भूमिर्दिशश्य्रोत्रात्। तथा लोकागुं अकल्पयन्॥ वेदाहमेतं पुरुषं महांतम्। आदित्यवर्णं तमसस्तु पारे। सर्वाणि रूपाणि विचित्य धीरः। नामानि कृत्वाभिवदन् यदास्ते। धाता पुरस्ताद्यमुदाजहार। शक्रः प्रविद्वान् प्रदिशश्चतस्रः। तमेवं विद्वानमृत इह भवति। नान्यः पंथा अयनाय विद्यते। यज्जेन यज्ञमयजंत देवाः। तानि धर्माणि प्रथमान्यासन्। ते ह नाकं महिमानस्सचंते। यत्र पूर्वे साध्यास्संति देवाः॥ अद्भ्यस्संभूतः पृथिव्यै रसाच्च। विश्वकर्मणस्समवर्तताधि। तस्य त्वष्टा विदधद्रूपमेति। तत्पुरुषस्य विश्वमाजानमग्रे। वेदाहमेतं पुरुषं महांतम्। आदित्यवर्णं तमसः परस्तात्। तमेवं विद्वानमृत इह भवति। नान्यः पंथा विद्यतेयनाय। प्रजापतिश्चरति गर्भे अंतः। अजायमानो बहुधा विजायते। तस्य धीराः परिजानंति योनिम्। मरीचीनां पदमिच्छंति वेधसः। यो देवेभ्य आतपति। यो देवानां पुरोहितः। पूर्वो यो देवेभ्यो जातः। नमो रुचाय ब्राह्मये। रुचं ब्राह्मं जनयंतः। देवा अग्रे तदब्रुवन्। यस्त्वैवं ब्राह्मणो विद्यात्। तस्य देवा असन्वशे॥ ह्रीश्चते लक्षीश्चपत्न्यौ। अहोरात्रे पार्श्वे। नक्षत्राणि रूपम्। अश्विनौ व्यात्तम्। इष्टं मनिषाण। अमुं मनिषाण। सर्वं मनिषाण॥ ओं तच्छंयो रावृणीमहे। गातुं यज्ञाय। गातुं यज्ञपतये। दैवीस्स्वस्तिरस्तुनः। स्वस्तिर्मानुषेभ्यः। ऊर्ध्वं जिगातु भेषजं। शं न्नो अस्तु द्विपदे। शं चतुष्पदे। ओं शांतिः शांतिः शांतिः॥

(आधारित)*

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख नंतर सवडीने वाचेन. प्रथम हे नमूद करते की, तो शब्द "सुक्त" नसून "सूक्त" असा आहे. तो शब्द सुधरावा.

पुरुषसुक्तावर चातुर्वर्ण्याचा समर्थनाचा आरोप केला जातो तो मुख्यत्वे ब्राह्मण ,क्षत्रिय,वैश्य आणि शुद्र कसे निर्माण झाले त्यावरून.
मोठा लोच्या हा आहे कि चातुर्वर्ण म्हणजे काय हेच लोकांना समजत नाही. भग्वदगीतेत सुधा चातुर्वारणाचा उल्लेख आहे . भगवंत म्हणताहेत अर्जुन मनुष्याच्या कर्माप्रमाणे त्याचा कोणता वर्ण ओळखावा हे ऐक . आणि मग कोणती कर्म करणार्याला ब्राह्मण, कोणती कर्मं करणार्याला क्षत्रिय , कोणाला वैश्य आणि कोणाला शुद्र म्हणावं हे त्यांनी सांगितलय. उदा : ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण .
पण आपण मात्र एका विशिष्ट जातीत जन्माला आला म्हणून तो ब्राह्मण अशी उलटी व्याख्या केली .
मनुष्याच्या कर्माप्रमाणे त्याचा वर्ण ठरतो. वर्णाप्रमाणे कर्म नाही .. हे एक सत्य न समजल्यामुळे एवढं गोंधळ माजलाय .

छान लेख !
मोहिनी आपला प्रतिसादही अव्वल,
पण काही काळात इकडे वेगळेच मोहिनीअट्टम चालू होईल की काय अशी शंका आहे. Uhoh

मनुष्याच्या कर्माप्रमाणे त्याचा वर्ण ठरतो. वर्णाप्रमाणे कर्म नाही .>> पटेश. असच असलं पाहिजे

पण मग आजच्या जगात कोणत्या कर्माचे वर्ण काय असेल. हा प्रश्न मी खूप जेन्युइनली विचारला आहे. थट्टा करण्यासाठी नाही.

वेल, जर जन्माने ब्राह्मण असलेली व्यक्ती जर आज दुकान थाटुन बसली असेल / व्यापार करत असेल तर ती वैश्य नाही का होणार?? तसंच काहीसं.

यज्ञात जे अर्पण करतात ते फार महाग असे,जसे गाय, घोडा आणि इतर प्राणी>>> गाय म्हणजे पवित्र असे वाचले होते. मग तिचापण बळी देत होत? Uhoh खरेच आहे का ते? बाकि बळी प्रकरण एकदम मोठे आणि प्राचीन दिसतेय.

चितळे,भावे,फडके सगळे पोट सुटून गल्ल्यावर बसलेत. सगळे त्यांना शेठ शेठ असं म्हणतायत.
बॉर्डर्वर लढणारे आपले सैनिक सगळे क्षत्रिय झाले आहेत. देशमुख,जाधव मला ब्रम्ह कळलं बरं,आणि त्यावर वितंडवाद घालत आहेत.असं चित्र समोर आलं. Biggrin

कर्मानुसार वर्ण असेल तर कुठले कर्म.कर्म म्हणजे जे काम करतो ते की वागतो ते?
तसे असेल तर शिपायाचं,वार्ड बॉय्,ऑफीस बॉय काम करणारा शुद्र का? मग देशाचा पंतप्रधान ब्राम्हण म्हटला पाहीजे?
पगडिवाला असो किंवा दाढीवाला!

.सगळीकडे शांती असो, सर्व प्राणी [आणि यात चतुष्पादांचा उल्लेख आहे] सुखात राहो.

................

हे आधी लिहायचं . मग खाली लिहायचं..

....................
पूर्वीच्या काळी यज्ञात प्राणी बळी दिला जात असे आणि त्या प्राण्याचे वेगवेगळे भाग हे शिजवून त्या यज्ञातील वेगवेगळ्या ब्राह्मणांना अधिकाराप्रमाणे आणि यजमानाला भक्षणार्थ दिले जाते.

...................

याला धर्म म्हणायचा की लबाडी ?

महाभारत - एकलव्य कर्ण यांना विद्या का नाकारली जाते ?
रामायण - शंबूकाची हत्या कुठल्या कारणाने होते ?

जर शूद्राने शिकायचं नाही हे धर्मात सांगितलेलं आहे असं या कथांतून स्पष्ट होत असेल, मनुस्मृतीतून त्याच अर्थाच्या शिक्षा सांगितलेल्या आहेत आणि समुद्र मंथन किंवा पुरूषसूक्तातून कुठल्या वर्णाची उत्पत्ती कशी झाली हे सांगताना त्यांचा दर्जा सारखाच कसा ठरतो यावर अधिक प्रकाश टाकाल तर अनेक शंकांचं निरसन होईल.

स्वामीजी, अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण विश्र्लेषण...काही लोक आपली कामे सोडून कशातही फक्त जातीयवादी शब्द शोधत राहतात की, काय असे या पुरूषसूक्ताच्या वादावरून वाटते.

तसे असेल तर शिपायाचं,वार्ड बॉय्,ऑफीस बॉय काम करणारा शुद्र का? मग देशाचा पंतप्रधान ब्राम्हण म्हटला पाहीजे?
पगडिवाला असो किंवा दाढीवाला!

तुम्ही पुन्हा तीच चूक करताय . इथे कर्म म्हणजे काय ते समजून घ्या आधी . शिपायाचं,वार्ड बॉय्,ऑफीस बॉय हि कामं शुद्रपणात येतात का ?
शुद्र कर्म कोणती हे अत्यंत detail मध्ये भगवद्गीतेत सांगितलं आहे . अत्यंत थोडक्यात सांगायचं म्हणजे केवळ शरीरालाच सर्वस्व समजून जो मनुष्य त्याचे लाड करण्यासाठी धर्माचा त्याग करतो (इथे धर्म म्हणजे हिंदू - मुसलमान असा नव्हे ), जो ईश्वराला प्रिय असणार्या कर्मांचा त्याग करतो , असुरी प्रवृत्तीने वागतो .,इतरांना पिडा देतो . असा मनुष्य पापी असतो आणि त्यालाच शुद्र म्हणावे असं भगवंत सांगताहेत .

शिपाई , वार्ड बॉय्,ऑफीस बॉय जर प्रामाणिक पणे आपली कामं करत असतील तर ते शुद्र होत नाहीत . याउलट भ्रष्टाचार , लोकांना लुबाडणारा , गुन्हेगारी प्रवृत्तीचा पंतप्रधान निश्चितच शुद्र या गटात मोडतो
कर्माला जर एव्हढं महत्व होतं तर शिक्षांचं प्रयोजन लक्षात येत नाही.

स्त्रियांचं स्थान काय यात ?
नक्की काय म्हणायचं ? कर्माला एवढं महत्व आहे तर शिक्षेलाही ते असणारच ना . कर्माच्या बाबतीत स्त्री - पुरुष , लहान - मोठा , श्रीमत - गरीब असा भेद नाही. सगळ्यांना सारखे नियम आहेत

साष्टांग नमस्कार स्वामिजी !

पुरुषाला बळी देणे ........ ज्याच्या सत्य स्वरुपाला जाणणे आणि समजणे अति कथीण अश्या स्वरुपाचे मनन वा चिंतन सोडुन आता त्याच्या अन्य स्वरुपांना जे मानवी भौतिक शरिराला जरा सोप्या रितीने उमजतील अश्या त्याच्या स्वरुपांना समजुन घेऊन त्यांची आराधना आरंभ केली.

भगवद गीतेत त्याच्या निर्गुण स्वरुपाला सोडुन बाकिची सर्वच्या सर्व रुपे द्वितीय मानली आहेत.

बळी म्हणजे असा तो बळी.......

प्रणाम !

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे "क्षुद्र पुर्वि कोन होते "या पुस्तकात "पुरुषसूस्त" बद्द्ल खुप अभ्यास पुर्ण माहिति आहे.