व्यवहार...

Submitted by किश्या on 28 December, 2013 - 12:40

सुर्य माथ्यावर आला होता. अजय आणि त्यांच्या शेतावर काम करणारा गडी गणपत लिंबाच्या झाडाखाली भाकरी ची परडी उघडी करुन बसले होते. गणपतने परडीवरच गाळान काढताच मस्त लसनाच्या ढेस्याचा मस्त वास वातावरनात घुमला. अजय आणि त्याने भाकरीवर मस्त ताव मारुन आडवे पडण्याच्या बेतात होते.

"तुम्ही साळत जाता न्हव ? कितवीला हाईसा मालक? " गणपत,

"मी पाचवीला आहे का रे?" अजय.

"काई न्हाई असच विचारलं, मला बी साळत जायच होतं पण ४ थीत नापास झाल्यामुळे मला बा नं परत धाडलच न्हाई साळतं." गणपत.....

हे सगळे होईपर्यंत अजय च्या डोळ्यावर झोप आली होती.. तस वातावरणही तसच होत म्हणा, गर्द लिंबाच्या सावली मधे पेंगणाचा मोह कुणाला ही होतो. अजय उगाच विहीरीच्या जवळ असलेल्या आवळ्याच्या झाडावर असलेल्या सांळुकीच्या खोप्याकडे नजर चालली होती. आणि मनामधे मित्रांबद्दलचे विचार... कालच अभय चे आणि अजय ची चर्चा झाली होती. अभय ला सायकल येत होती वाटतं तस तो काल फुगवुन फुगवुन सांगत होता. मग अजय ने ही सांगितले होतं की मला पण येते सायकल आणी बाबा मला सायकल घेणार आहेत म्हणुन.....

हा विचार करता करता त्याला झोप कधी लागली कळलच नाही.. त्याला जाग आली ती गणपतच्या आवाजाने तो परत विहिरीची मोटर चालु करत होता पण बहुतेक फ्युज मधे काही तरी प्रॉब्लेम होता म्हणुन तो लाईटच्या नावाने खडे फोडत होता....

"मालक झोप झाली का वो?"

"का रे काय झालं?"

"अवो मोटारीच फ्युज उडालया आन उसाला आजच पाणी देण गरजेच हाय न्हायतर मोठे मालक लै ओरडतीला मला, माझ एक काम करता का वो गावाकडे जाऊन जरा फ्युज वायर घेऊन येता का? लै तरास हाय हो ह्या लाईटीचा दरयेळेस फ्युज उडतुया बघा.."

हे ऐकुन अजय च्या पोटात गोळा उठला. गावकडे जाऊन येऊन म्हणजे ४ किमी ची चक्कर. आणी झोप पण अर्धवट झालेली. पण त्याच्या हेही लक्षात आल की फ्युज नाही आणले तर गणपत ला बाबा फार ओरडणार होते अजय ला म्हणुन तो तसाच कुरकुरत उठला. आणि निघाला..

पांदीतुन जाताना आळशेवाडीचा काशीणाथ त्याला सायकल वरुन जाताना काशीनाथ म्हणजे अजयच्या मोठ्याभावाचा वर्ग मित्र होता..

"ये काशीनाथ दादा मला गावपर्यंत घेऊन चल ना लै पाय दुखायला लागलेत." अजय

"बस चल" काशीनाथ

सायकल वर बसुन अजयला जरा हायस वाटले कारण कमीत कमी २ किमी तरी चालण वाचले .
हळु हळु अजय च्या मनात एक गोष्ट पक्की होत होती की सायकल असली की कामे फार फास्ट होतात. आणि काहीही करुन सायकाय बाबांना घ्यायला लावायची. बस स्टॅडवरुन पळत घरी आल्यावर त्याने आधी फ्युज तार शोधली व लगेच शेताकडे परत निघाला.

"ही घे तार च्यायला येवढुशी तार पण चार कीमी चक्कर मारावी लागली. ये गणपत पुढच्या वेळेस त्या स्टार्टच्या पिशवीतच घेउन येत जा बरं माझ्या न जाऊन परत येण होतं नाही."

"मालक जाऊद्या हो उद्यापासनं घेऊन येत जाईलं, मी बी गेलो असतो हो पण इथ मोटारीत पाणी घालायच होतं म्हणुन तुम्हास्नी पाठवल."

"बर बर जाऊदे आता कर काम तुझ चालु, मी जातो गावाकडे परतं मला आता थांबायचा कंटाळा आला आहे आणि आता असही ४ वाजयला लागलेत वाट्टं. बैल घेऊन जायचेत का तु आणतोस.."

"मी आनतो मागन तुम्ही जावा.."

अजय ने पक्क ठरवल होता आज घरी गेल्यावर कमीत कमी आई समोर तरी आपण हा विषय काढु..

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"आई बाबांना सांग ना मला सायकल घेऊन द्यायला." अजयने भाकरी चुरता चुरता आई समोर शेवटी हा विषय काढलाच...

"अरे अजय बाबा ना कस म्हणुन सांग आधी ऊस जाऊदे मग मी बोलते बाबांशी बोलते खुप पैसे लागतात रे सायकल आणायला.. "

"दर वेळेस असच करतात माझ्या मनाच कोणीच काही करत नाही, जाऊदे मीच बाबाशी बोलतो थोड्यावेळाने"

जेवण कसतरी उरकुन तो बाबाची पारावरुन येण्याची वाट बघत बसला होता, त्याला अस झाल होत की कधी एकदाचे बाबा येतात आणी कधी एकदाच बोलन होत ते...
बाबा आले आणी हातपायला धुवायला न्हाननी घरात गेल्या गेल्या अजय त्यांच्या मागे गेला..

"बाबा मला सायकल घ्याना लवकर मला रानात जाऊन यायला लै त्रास होतो कधी फ्युज जातं तर कधी सोल घरीच विसरते, मग जा- यायला लै च्या लै कंटाळा येतो.."

"आधी पंच्या घेऊन ये दोरीवरुन मग बोलु" बाबा
कुरकुरत का होईना अजयने पंचा आणला..
"आधी सांगा ना कधी घेता सायकल?? नाही तर मी शाळेत पण जाणार नाही आणी शेतावर पण जाणार नाही.." रडवेला चेहरा करुन अजय म्हणाला

"ह्म्म्म्म्म बघु उद्या बोलु आपण ह्या विषयावर"
बाबा हे बोलुन स्वयंपाक घरात गेले आणी जेवायला बसले....

सगळी आवरा आवर झाल्यावर आई बाबा आणी अजय आता झोपायला माळवदावर गेले... अजय च्या डोक्यात एकच विचार चक्र चालु होतं सायकल आल्यावर कुठे कुठे घेऊन जायची आणी आपली काय काय कामे होणार, असही त्याल्या ह्या सगळ्या विचाराणे झोप काही येत नव्हती... शेवटी विचार करुन करुन कंटाळा आल्यावर काय करायच म्हणुन तो आकाशाकडे पाहत बसला.....

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"उठा ऊठा मालक शेतात यायच नाही का? मी गाडी जुंपतोय आज बैल गाडी घेऊन जाऊया लै दिस झाले गाडी जाग्यावरच आहे."
गणपत सकाळी सकाळी अजय ला उठवत होता. बिचारा अजय डोळे चोळत ऊठला. रात्रीच सगळा विचार केलेला परत त्याला आठवला. आणी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याला आधी सायकल आठवली.

"बर बर मी आवरतो एक अर्ध्या तासात जरा वेळा थांब मग जाऊ सोबत"

"जी मालक लवकर आवरा आज आहे लाईट मी वाट पाहत आहे." गणपत.

अजय पटकन आवरुन तयार होईपर्यंत एक तास तर सहज गेला होता, गणपत आवाज देऊन देऊन थकला होता आणि आता बाबा पण वैतागले होते अजय च आवरत नव्हतं म्हणुन.

"चल मी तयार आहे, जुंप बैल गाडी आता आणी आज मी चालवणार गाडी."

गाडी जुंपुन तयार झाली होती.अजय ने कासरा हातात घेऊन चाबकाचा एक फटका बैलाच्या पाठीवर ओढला. बैलानेही घुंगरांचा आवाज करुन गाडी ओढायला सुरुवात केली. अजय च्या डोक्यातुन सायकलचा विषय काही जात नव्हता, आखर मागे पडल्यावर अजय ने विषय गणपत जव़ळ काढलाच.

"ये सायकल केवढ्याला येते रे, मला घ्यायची आहे पण बाबा ऐकतच नाहीये कधी घेणार आहेत काय माहीत.."

"ह्म्म्म हे बेस केल मालक तुम्ही, लवकर घ्या सायकल तुम्ही म्हणजे तुम्हास्नी रानात यायला जायला पण आराम होईल पाई पाई चालयाची गरज न्हाई....आणी किमतीच म्हणताल तर हजार दोन हजाराला येईल सायकल.. घ्या तुम्ही म्हह्याकड बी हाय सायकल पण जुणी झाली आता..ती विकुन नवीन घ्यावी असा विचार करत आहे.."

साकयक विषयी जेवढी माहीती गणपत कडुन काढता येईल तेवढी अजय ने काढुन घेतली. कुठल्या कंपनीची चांगली सायकल असते, किती इंच उंचीची सायकल घ्यायला पाहीजे...
हे सगळ होई पर्यंत शेत कधी आले ते कळालच नाही...

गणपत उतरुन बैलांना मोकळ करुन चरायला सोडुन तो मोटर चालु करण्यास निघुन गेला..

अजय च्या डोक्यात एक वाक्य पक्क बसल होत जे बोलता बोलता गणपत ने वापरल होतं त्याला ती सायकल विकायची होती.. अजयला एक युक्ती सुचली होती तो आता दुपारी जेवताना गणपत समोर मांडणार होता....

बैल चरुन परत बसल्यामुळे अजल ला कळल होत की बैलांना पाणी पाजायची वेळ झाली होती. तसा तो ऊठुन बैलांना पाणी पाजायला घेऊन गंगावर गेला. परत आल्यावर गणपत मोटार बंद करत होता.
पाणी देऊन संपल असनार किंवा जेवणाची वेळ झाली असणार त्याच्या म्हनुन तो मोटर बंद करत असेल असा एक विचार अजय च्या डोक्यात येऊन गेला चला म्हणजे आता गणपत जवळ विषय काढालया हरकत नाहीये असा विचार करुन अजय लिंबाच्या झाडाखाली येऊन बसला होता....

"गणपत तु सायकल कितीला विकणार आहेस ?"
"का हो मालक तुम्हाला माझी सायकल घ्यायची हाये का?"
"हो मी सध्यातरी असा विचार करत आहे"
"मोठे मालक हो म्हणतील का?"
"ते मी बघतो रे तुला केवढ्याला विकायची आहे ते सांग.."
"हे बघा नवीन सायकल १५०० रुपायाला येते अशीही माझी सायकल जुनी आहे तर मी ८०० रुपायला विकायचा इचार करत आहे."
"घंटी, मागच कॅरीयर आहे का तुझ्या सायकल ला?"
"घंटी आहे पण कॅरीयर नाहीये...आणी मी तुम्हास्नी ट्युब आणि टायर सुध्धा नवीन टाकुन देतो त्याची चिंता तुमी नगा करुसा.. पाहीजे का तुम्हाला सायकल ते बोला... "

"हो घेतो मी १५०० पेक्षा ८०० रुपये म्हणजे स्वस्तच आहे मी बोलतो बाबांशी तु सायकल कधी देतो सांग मला फक्त."
"परवा देतो आणुन जरा ठिक ठाक करुन घेतो उद्या.."
"ठिक आहे सकाळी वाड्यावर आल्यावर घेऊन जा पैसे बाबाकडुन, मी सांगतो त्यांना.."

आता अजय ला फक्त घाई लगली होती की गाकडे परत कधी जाणार याची आणि कधी बांबाशी बोलतो याची.. ह्या सगळ्या उत्सुकतेच तो आज लवकरच निघाला होता गावाकडे...
आखरावरच त्याला बाबा दिसले. पळत पळत जाऊन तो बाबांच्या मागे लागला आधी घरी चला मला बोलायचय तुमच्याशी म्हणुन...
अजयला व बाबांना सोबत आलेल पाहुन आईने आधी चहा टाकला.... काही बोलायच्या आतच अजयने बाबांना सांगीतले कि त्याने गणपत कडुन सायकल विकत घेतली फक्त ८०० रुपायांमधे..

हे ऐकल्यावर बांबाचा चेहरा थोडासा विचारमग्न झाला क्षणभर अजयला वाटला की बाबा आता नाही म्हणनार पण तेवढ्यात....
बाबांनी त्याला जवळ घेतल आणी म्हणाले
"ठीक आहे घेतलीस ना चांगल केलसं किती पैसे द्यायचे आहेत त्याला "
"८०० रुपये द्यायचे आहेत त्याला आणि म्हणत होता की टुब टायर नवीन टाकव लागेल तो बोलेल तुमच्याशी सकाळी आल्यावर.."

"बर ठीक आहे मी बोलतो त्याच्याशी"
अजय खुप खुप खुश होता कारण आज त्याने स्वत: काही तरी विकत घेतल होत..... त्याखुशीतच त्याला रात्री कधी झोप लागली कळाल नाही...

सकाळी गणपत आला वेळेप्रमानेच. आज सकाळी अजय लवकर उठला होता. गणपत आल्यावर अजयने बाबांना शोधले ते देव पुजा करत होते देवपुजा करता करता ते अजय ला म्हणाले
"१०० रुपये दे काढुन गणपत ला ट्यूब टायरला"
अजय अजुनच खुष झाला. १०० रुपये देता देता गणपत ला म्हणाला,
"लवकर नीट करुन आणा सायकल मला पाहीजे लवकर"
"जी मालक"

आता अजय फक्त आणि फक्त सायकलचीच वाट पाहत होता..

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दोन दिवसांनी गणपत ने सायकल आणुन अंगणात ठेवली, ती पाहुन अजय चा आनंद गगनात मावत नव्हता. त्याने आधी त्याच्या मिंत्राना बोलवुन सगळ्यांना सायकल दाखवली आणी तिला घेऊन तो माळावर खेळायला घेऊन गेला... खेळता खेळता बरेचदा तो पडत होता आणी सायकल ची चैन पण पडत होती.. हे सगळ बघुन अभय अजय ला म्हणाला

"काय खटारा सायकल घेतलीस रे?? घेतलीस तर चांगलीच घ्यायची असतीस ना नवी कोरी"

हे ऐकुन अजयचा चेहरा खरच उतरला होता, खरं म्हणजे त्यालाही सायकल आवडली नव्हती पण तो आता बाबांना कुठल्या तोंडाने बोलणार ह्या गोष्टी.....त्याला आता सायकल खेळुन खेळुन कंटाळा आला होता त्याने कसतरी करुन सायलक घरी आणुन लावली...

दिवे लागन झाली होती. बाबा अजुन घरी आले नव्हते. अजय काही तरी करुन वेळ काढत होता. जेवायला बसल्यावर त्याच जेवनात ही लक्ष नव्हतं, हे आईच्या लक्षात यायला वेळ लागला नाही तिने अजयला विचारले पण
"का रे काय झाल चेहर्‍यावर अश्या सुरकुट्या का पाडल्यास. सायकल आवडली नाही का?"
"अस काही नाही आई असच थकलोय मी म्हणुन वाटत असेलं"

जेवण वगैरे झाल्यावर बाबा आई आणि अजय झोपायला माळवदावर गेले. हळुच अजय बाबांना म्हणाला..
"बाबा मला सायकल आवडली नाही तुम्ही म्हणता का गणपत ला की सायकल परत घेऊन जा म्हणुन.."

"का रे काय झालं"
"नाही बाबा काही नाही मला सायकल नाही आवडली...."

"हे बघ अजय सायकल मला पण आवडली नव्हती पण मी फक्त तुझ्या शब्दामुळे मी गणपत ला काही म्हणालो नाही, हे बघ आयुष्यात लक्षात ठेव व्यवहार कधी पण पारदर्शक असायला हवा. कुठलही वस्तु ती छोटी असु या मोठी ती बघुनच तिचा व्यवहार पुर्ण करायचा असतो..... ह्या तुझ्या व्यवहारतात काय झाल तुच सांग आपल नुकसान झाल ना १०० रुपयाच... हो की नाही तुच सांग.. म्हणुन हा धडा आयुष्यात कधीच विसरु नकोस... आज गणपत आहे म्हणुन तो सायकल परत घेईल पण दुसर कोणी असत तर त्याने ८०० रुपये घेऊनच दारातुन ऊठला असता... आल का लक्षात.... झोप आता देऊ त्याला सायकल परत सकाळी आणी तुला मस्त तुझ्या आवडीची नवी कोरी सायकल घेऊ विकत......"

हे ऐकुन अजयला आयुष्यात एक मोठ धडा मिळाला होता..... आणि तो स्वतः ला वचन देऊन झोपी गेला की असा व्यवहार कधीच करणार नाही.......................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली. खरे तर लहानपणापासुनच आई वडिलानी मुलाना छोट्या छोट्या गोष्टीतुन व्यवहार शिकवला, तर ती आपल्या पायावर उभे रहायला सन्कोच करणार नाहीत. कष्टाचे आणी रुपयाचे मोल पण कळेल. मस्त आहे कथा.