अतुल्य! भारत - भाग ३०: अजिंठा, महाराष्ट्र.

Submitted by मार्को पोलो on 16 December, 2013 - 09:19

माबोवर आणि फेसबुकवर फोटो टाकताना बरेच लोक विचारायचे कि अरे अजंठा-वेरुळ पाहिले कि नाही? अजुन तरी नाही हे उत्तर देताना कसेतरी वाटायचे. एव्हडी सर्व भ्रमंती करुनही आपल्या राज्यातला हा खजिना अजुन पाहिलेला नाही हा विचार करताना "दिव्याखाली अंधार" हि म्हण अगदी सार्थ वाटायची.
तेव्हा ठरविले कि ह्या पावसाळ्यात काहीही करुन ह्या २ स्थळांना भेट द्यायची.
सर्व बेत ठरवुन ऑगस्ट मध्ये औरंगाबादला निघालो. अजिंठा सोमवरी बंद असते तर वेरुळ मंगळवारी. अजिंठ्याजवळ फर्दापुर म्हणुन गाव आहे. तिथे मुक्कामाची सोय होऊ शकते.

अजिंठा लेण्या बौद्ध भिख्खुंनी बांधल्या आहेत. असे म्हणतात कि ह्या लेण्यांचे काम इ.स. पुर्व २०० मध्ये सुरु झाले ते इ.स. ६५० चालले. ईथे एकुण २८ लेण्या आहेत. सर्व लेण्यांमध्ये गौतम बुद्ध ह्यांचा जन्म ते महानिर्वाण हा काल चित्रीत करण्यात आल आहे.
ह्या लेण्या आजही सुस्थितीत आहेत. बर्‍याचशा चित्रांचे रंग उडाले आहेत पण जे काही उरले आहे ते पण काही कमी नाहीये. ईथे लेण्यांमध्ये बर्‍यापैकी अंधार असतो. ट्रायपॉड लावण्यासाठी तुम्हाला खास Archaeological Survey of India ची परवानगी लागते. ती नसल्यामुळे दुर्दैवाने ट्रायपॉड लावता नाही आला.

प्रचि १

-
-
-
प्रचि २

-
-
-
प्रचि ३

-
-
-
प्रचि ४

-
-
-
प्रचि ५

-
-
-
प्रचि ६

-
-
-
प्रचि ७

-
-
-
प्रचि ८

-
-
-
प्रचि ९

-
-
-
प्रचि १०

-
-
-
प्रचि ११

-
-
-
प्रचि १२

-
-
-
प्रचि १३

-
-
-
प्रचि १४

-
-
-
प्रचि १५

-
-
-
प्रचि १६

-
-
-
प्रचि १७

-
-
-
प्रचि १८

-
-
-
प्रचि १९

-
-
-
प्रचि २०

-
-
-
प्रचि २१

-
-
-
प्रचि २२

-
-
-
प्रचि २३

-
-
-
प्रचि २४

-
-
-
प्रचि २५

-
-
-
प्रचि २६

-
-
-
प्रचि २७
सर्व २८ लेण्या

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहेमीप्रमाणेच अतिशय सुरेख! Happy
अजंठाच्या जवळच पितळखोरा लेणीसमूह आहे. तोही अतिशय नयनरम्य परिसर आहे. कधी जमलं तर तिथेही भेट देऊन या!

पहिला आणि काही लेण्यांतले फोटो अफाट सुंदर आले आहेत. तोकडी जागा, मर्यादीत प्रकाश असताना इतके सुंदर फोटो काढणे खरंच कठीण आहे.

तिसरा फोटो शाळेतल्या पुस्तकावर (बहुदा इतिहास) असतो ना?

तोकडी जागा, मर्यादीत प्रकाश असताना इतके सुंदर फोटो काढणे खरंच कठीण आहे. >>>> +१००....

फारच भारी फोटो आहेत रे दोस्ता ......

तोकडी जागा, मर्यादीत प्रकाश आणि लोकांच्या वर्दळ वावरामुळे झटकन् बदलणारे लक्स लेवल्स ह्या सगळ्यावर मात करून व ट्रायपॉड न वापरता काढलेली लेण्यातली प्रकाशचित्रे अप्रतीमच आलेली आहेत.
आणि बाहेरच्या फोटोंबद्दल तर काही बोलायलाच नको, नेहेमीप्रमाणेच सुंदर Happy

अ प्र ति म आलेत फोटो!

तो बुद्धाच्या एका मुर्तीचा (वेगवेगळ्या अँगलने त्याच्यावर प्रकाश टाकला की त्यांच्या चेहर्यावरच्या भावमुद्रांमधे बदल दिसतो) फोटो नाही काढला का?