आळश्यांसाठी भाजी - लुफ्त-ए-पालक

Submitted by विजय देशमुख on 27 November, 2013 - 03:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कांदे
लसुण
आले
टोमॅटो
पालक
जिरे
मोहरी
गरम मसाला
हळद
तिखट
तेल २ टीस्पुन

क्रमवार पाककृती: 

ही पाककृती खास माझ्यासारख्या आळशी माणसांसाठी आहे. ज्यांना अगदी भाजी चिरण्याचाही कंटाळा येतो, त्यांच्यासाठी खास पेशकश.

आवश्यक कौशल्य :- मिक्सर वापरणे.

सुरुवातीला कांदे आणि लसुण, आले मिक्सरमधुन बारिक करुन एका वाटीत काढुन घ्यावे.
नंतर टोमॅटो मिक्सरमधुन बारिक करुन घ्यावे. ते दुसर्‍या वाटित काढुन ठेवावे.
असाच पालकही मिक्सरमधुन बारिक करुन घ्यावा.
चवीनुसार तिखट, मीठ, मसाला, हळद एका वाटित काढुन घ्यावे.

एका उथळ पॅनमध्ये २ चमचे तेल टाका, तेल गरम झाले की मोहरी आणि जिरे (थोड्यावेळाने) टाका. त्यानंतर कांदे, लसुण यांची पेस्ट टाकुन छान भाजुन घ्या. {आले नंतरही टाकू शकता}.
त्यानंतर हळद, तिखट, मीठ, आणि मसाला टाकुन काही सेकंद भाजुन घ्या आणि लगेच टोमॅटो प्युरी टाका. ती खमंग भाजुन घ्या.
नंतर पालक टाकुन छान भाजा आणि मंद गॅसवर झाकण लावुन शिजू द्या.
अंदाजे ५-१० मिनिटात लुफ्त-ए-पालकाचा लुफ्त घेण्यास तयार व्हा.

वाढणी/प्रमाण: 
२ माणसांसाठी १ पाव पालक
अधिक टिपा: 

भाजी (खासकरुन कांदे आणि पालक) चिरणे नाही, त्यामुळे अगदी सोपी भाजी आहे.
तयार भाजीत इतर काही पदार्थ टाकुन व्हरायटी म्हणुन खपवता येतील. उदा. उकडलेले बटाटे किंवा अंडी, किंवा.... तुमच्या कल्पनाशक्तीप्रमाणे.

माहितीचा स्रोत: 
माझी बायको :)
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही पाककृती खास माझ्यासारख्या आळशी माणसांसाठी आहे. ज्यांना अगदी भाजी चिरण्याचाही कंटाळा येतो, >>>>>>>> म्हणजे अगदी पालकाची जुडी बाजारतुन आणुन तश्शीच मिस्करला टाकायची की काय?? आणि कांदे न चिरता आख्खेच?? आमची ब्वा आळश्यांची व्याख्या लई भारी आहे.

विजय, त्यापेक्षा कांदे वगैरे ओबडधोबड कापून, सगळे जिन्नस परतून मग मिक्सरमधे वाटले तर चांगली चव येईल.
कच्चा कांदा मिक्सरमधे वाटला तर मिक्सरच्या भांड्यालाही तो वास येत राहतो.

छान Happy

दिनेशदा +१

मंद गॅसवर झाकण लावुन शिजू द्या<<< पालकाचा रंग बदलतो झाकण घालुन शिजवल्यास - शेवाळी दिसतो...

लाजो -> एक्झॅक्टली हाच रंग यायला हवा. त्याची चव वेगळीच लागते.
दिनेश -> बरोबर आहे, पण रोजच करी बनवायचि असेल तर आधी भाजा, मग थोडं थंड होऊ द्या (माझ्याकडे मिक्सरचं प्लास्टिकचं पॉट आहे Sad ) याचा कंटाळा येतो, म्हणुन शॉर्ट कट. Wink
सस्मित -> पुर्ण कांदा घुसत असेल पॉटमध्ये तर चालेल की. Wink आणि पालक १ पाव खुप सारा दिसत असला तरी त्याला मिक्सर पॉट मध्ये बारिक केल्यावर एका मोठ्या पॉटपेक्षा जास्त होणार नाही.
पौर्णिमा -> तिथेही आळस Happy
भरत +१ Wink
सर्वांना धन्यवाद.

विजय, पालक पनीर आवडत असल्यास ही करून बघता येईल. माझ्या रेसिपीत चिराचिरी अजिबात नाही तसंच अती मसालेही नाहीत. जो काही स्वाद आहे तो लसणीचा.
पालकाची पानं अख्खीच ठेवून धुवून घ्या. मोठ्या पातेलीत पाणी उकळायला ठेवा. उकळल्यावर ही पानं अशीच पाण्यात टाकून शिजवून घ्या (ब्लांच) . साधारण ४, ५ मिनिटं. नंतर मिक्सरला घालून प्युरे करून घ्या. तेलात जिरं घालून फोडणी करून घ्या. त्यावर लसूण चांगली परतून घ्या. त्यावर हळद घाला. मग ही प्युरे. बारीक गॅसवर झाकण घालून एक उकळी काढा. त्यात मीठ, लाल तिखट घालून पनीरचे तुकडे घालून मिक्स करा. त्यावर थोडं फ्रेश क्रिम- अती नको, भाजीची चव बदलता कामा नये.

दुसरी रेसिपी 'बस्के' ह्या आयडीची आहे. ती मी अशी करते- (तिची एक्झॅक्ट रेसिपी अशीच असेल असं नाही)
पालकाची पानं बारीक चिरून घ्या. पिवळी मूगडाळ मायक्रोवेवमध्ये/कुकरमध्ये शिजवून घ्या. तूपाची जिरं, हिंग, हळद, लसूण, लाल मिरच्या घालून फोडणी करून घ्या. त्यावर चिरलेला पालक, शिजवलेली मूगडाळ घालून मिक्स करून झाकण घालून शिजवून घ्या. मीठ घाला. झाली भाजी तयार