सल्ला हवा आहे

Submitted by राज1 on 20 November, 2013 - 04:40

आम्ही घरी वापरण्या Computer घेतेला (Dell Inspiron 660s, 3rd Generation Intel Core i5-3340)
शोरूम मध्ये काबुल करून सुद्धा घरी Computer Install करायला कोणीही आले नाही. मीच घरी Computer Install केला. (Windows 8). Computer वर Installation साठी आजून कोणती गोष्टी बघाव्यात.

घरी वापरण्या इंटरनेट हि घ्यायचे आहे(साधारण २ तास वापरण्या साठी) कोणत्या company चे घ्यावे. आम्ही TATA PHOTON चे इंटरनेट घेतले होते पण ते 5 दिवसात बंद झाले

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजेंद्रजी,
विक्रेत्याने कबूल करूनही संगणकावर इंन्स्टालेशन वगैरे करून दिलेले नसल्यास अशा विक्रेत्याकडून आपली फसवणूक झाल्याचे उघड दिसते आहे. तुम्ही स्वतः विडोंज ८ चे इंन्स्टालेशन केले आहे. विंडोज ८ वापरायला अजूनतरी सुटसुटीत नाही. विक्रेत्याला परत कॉल करा आणि विंडोज ७ इंन्स्टाल करून घ्या. सोबत काही बेसिक सॉफ्टवेअर्स पण टाकून घ्या. (पायरसी टाळणे उत्तम, मोफत/ओपन सोर्स सॉफ्टवेअर्सचा आग्रह धरा)

घरगुती वापरासाठी सध्यातरी मुंबईत असाल तर एमटीएनएल, मुंबई व्यतिरिक्त इतर जागी बीएसएनएल ब्रॉडबँड एवढे स्वस्त काहीच नाही. ब्रॉडबँड नको असल्यास ह्या कंपन्यांचे ३जी वापरा. अतिशय स्वस्त आहे. खाजगी नेटवर्क ऑपरेटर्सचे इंटरनेट खूप महाग पडते. बीएसएनल/एमटीएनएल चे सिमकार्ड घ्या व अनलॉकड युएसबी डाटाकार्ड घेवून नेटचा वापर करा.

बहुदा डेल मध्ये ऑपरेटींग सिस्टम included नसते. किमान कोरियातील हा अनुभव आहे. इंटरनेटसाठी, लाख झंझटी, हळू सर्व्हिस, तरीही MTNL/BSNL च बेस्ट. खर्च कमी, आणि नो हिडन कॉस्ट.

विंडो ७ किंवा जमत असेल तर उबुंटू (मोफत) वापरा. ओपन सोर्स सॉफ्टवेअर असं गुगल सर्च केलं तर टनाने सॉफ्टवेअर्स मिळतील. Happy

श्री अकोलेकर प्रतिसादा बद्दल धन्यवाद

मी पुण्यात राहतो
DELL कंपनीच्या showroom मधून फक्त windows 8 Install करून दिले होते. McAfee हे Antivirus मीच Install केले.
मी computer जोडून चालू केला. पण आजून काही नवीन माहिती कंपनीचे लोक देऊ शकतील महणून त्यांना बोलावले होते. त्यांनी orally कबुल पण केले होते.

मी office मध्ये windows 7 च वापरतो पण नवीन काही माहिती मिळेल महणून windows 8 Install केले.

internet साठी मी वरती लिहिल्या प्रमाणे अंदाजे किती खर्च यतो (दिवसाचे २ तास). मला internet ची फारशी माहिती नाही.

आम्ही पीसी असेंबल्ड करुन देतो. असेंबल मध्ये अधिक पैसे वाचतील फक्त सगळे पार्टस घेतांना नीट निरखून / पारखून बसवतो. सोबत २ वर्षांची वॉरंटी पण आहे रिपेअरींगकरता अतिशय पैसे मोजावे लागत नाहि, घरी येऊन रिपेअरींग करतो. आपल्याला पीसी घेऊन त्यांच्या सर्विस सेंटरला जावं लागतं नाहि वगैरे वगैरे.
santosh karande.
मोबाइल नंब्रर- ७२०८६४३४६४
mumbai.