पशूंपुढे काढतो फणे मी

Submitted by बेफ़िकीर on 14 November, 2013 - 11:15

पशूंपुढे काढतो फणे मी
कसे शिकू माणसाळणे मी

विचारणे कोण मी तुझा हे
स्वतः स्वतःला विचारणे मी

नव्यात शोधू नकोस चिन्हे
जुन्या नभातील चांदणे मी

कधी कुणाच्या घरी न गेलो
विटाळली फक्त अंगणे मी

दिसू दिली ना कधी जगाला
तुझ्यातली खिन्न लक्षणे मी

तुझ्यावरी तर विसंबलेलो
परावलंबी कसा म्हणे मी?

बघून टीका निलाजर्‍यांची
फुशारलो 'बेफिकिर'पणे मी

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विचारणे कोण मी तुझा हे
स्वतः स्वतःला विचारणे मी

नव्यात शोधू नकोस चिन्हे
जुन्या नभातील चांदणे मी

सुंदर शेर...

कसे शिकू माणसाळणे मी <<वाह !

विचारणे कोण मी तुझा हे
स्वतः स्वतःला विचारणे मी

नव्यात शोधू नकोस चिन्हे
जुन्या नभातील चांदणे मी

सुंदर !

कधी कुणाच्या घरी न गेलो
विटाळली फक्त अंगणे मी

व्वा व्वा

विचारणे कोण मी तुझा हे
स्वतः स्वतःला विचारणे मी

तुझ्यावरी तर विसंबलेलो
परावलंबी कसा म्हणे मी?

हे शेरही आवडले.

पशूंपुढे काढतो फणे मी
कसे शिकू माणसाळणे मी>>>>>>>>सुंदर मिसरा

विचारणे कोण मी तुझा हे
स्वतः स्वतःला विचारणे मी...वा !

नव्यात शोधू नकोस चिन्हे
जुन्या नभातील चांदणे मी......क्या बात !

तुझ्यावरी तर विसंबलेलो
परावलंबी कसा म्हणे मी?....ये बात !

कधी कुणाच्या घरी न गेलो
विटाळली फक्त अंगणे मी

दिसू दिली ना कधी जगाला
तुझ्यातली खिन्न लक्षणे मी

व्वा व्वा.