अर्ध्यात सोडलेल्या ओळी मला म्हणाल्या

Submitted by आनंदयात्री on 11 November, 2013 - 01:37

इच्छा क्षणात सरता, रस्ता भकास झाला
आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला

फुलत्या वयात सारे भलतेच थेट वाटे
कलत्या वयात नुसता अस्वस्थ भास झाला

आली कुठुन जराशी चाहूल वादळाची
गुर्मीत वाहणारा वारा उदास झाला

सार्‍याच जाणिवा त्या आल्या वयात जेव्हा
मग भार यौवनाचा अल्लड मनास झाला

स्वप्नातही मनाने मन मारले स्वतःचे
स्वप्नातही मनाला तितकाच त्रास झाला

अर्ध्यात सोडलेल्या ओळी मला म्हणाल्या -
अव्यक्त भावनांचा निष्फळ प्रयास झाला

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/10/blog-post_28.html)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख, सुबक व प्रासादिक गझल! धन्यवाद, चांगले वाचायला दिल्याबद्दल! Happy

फुलत्या वयात सारे भलतेच थेट वाटे
कलत्या वयात नुसता अस्वस्थ भास झाला<<< व्वा

आली कुठुन जराशी चाहूल वादळाची
गुर्मीत वाहणारा वारा उदास झाला<<< मस्त!

स्वप्नातही मनाने मन मारले स्वतःचे
स्वप्नातही मनाला तितकाच त्रास झाला<<< पहिली ओळ अप्रतिम! (बराचसा अर्थ तेथेच आल्यासारखे जाणवले, चु भु द्या घ्या)

अर्ध्यात सोडलेल्या ओळी मला म्हणाल्या -
अव्यक्त भावनांचा निष्फळ प्रयास झाला<<< सुंदर!

aavadesh Happy

वा वा आवडलीच !
त्यातही ..

फुलत्या वयात सारे भलतेच थेट वाटे
कलत्या वयात नुसता अस्वस्थ भास झाला

स्वप्नातही मनाने मन मारले स्वतःचे
स्वप्नातही मनाला तितकाच त्रास
झाला

हे फार फार आवडले .

वा वा आवडलीच !
त्यातही ..

फुलत्या वयात सारे भलतेच थेट वाटे
कलत्या वयात नुसता अस्वस्थ भास झाला

स्वप्नातही मनाने मन मारले स्वतःचे
स्वप्नातही मनाला तितकाच त्रास
झाला

हे फार फार आवडले .

आली कुठुन जराशी चाहूल वादळाची
गुर्मीत वाहणारा वारा उदास झाला

शेर आवडला.

स्वप्नातही मनाने मन मारले स्वतःचे
स्वप्नातही मनाला तितकाच त्रास झाला

वा वा वा ....अतिशय आवडला हा शेर

'प्रयास' ही उत्तम

धन्यवाद !

-सुप्रिया.

खूप सुंदर. आवडली.

फुलत्या वयात सारे भलतेच थेट वाटे
कलत्या वयात नुसता अस्वस्थ भास झाला

सार्‍याच जाणिवा त्या आल्या वयात जेव्हा
मग भार यौवनाचा अल्लड मनास झाला

स्वप्नातही मनाने मन मारले स्वतःचे
स्वप्नातही मनाला तितकाच त्रास झाला

>> अप्रतिम

सर्वांचे आभार! Happy

अस्वस्थ आनंद
>>> खूप सुंदर शब्द... अनुभवलंय असं वाटणं, त्यामुळे लगेच पोचलं... Happy

स्वप्नातही मनाने मन मारले स्वतःचे
स्वप्नातही मनाला तितकाच त्रास झाला

अर्ध्यात सोडलेल्या ओळी मला म्हणाल्या -
अव्यक्त भावनांचा निष्फळ प्रयास झाला

हे खास!

एक-दोन कल्पना आवडल्या. मात्र शेर तितकेसे पटले नाहीत.

फुलत्या वयात सारे भलतेच थेट वाटे
कलत्या वयात नुसता अस्वस्थ भास झाला<

झाला ऐवजी होतो हवे का ? असे वाटले. अस्वस्थ भास कल्पना खटकली.

आली कुठुन जराशी चाहूल वादळाची
गुर्मीत वाहणारा वारा उदास झाला

छान.
एक मतः ओळी, मन, वा आयुष्य मला अमुक-तमुक म्हटले ह्या संकल्पना मला स्वतःला रुचत नाही.