spanish शिकायचे आहे ???

Submitted by गुलमोहोर on 6 November, 2013 - 14:53

नमस्कार, मला spanish शिकायचे आहे. कृपया जाणकारांनी मदत करावी. खूप सारे websites वाचून काढले. सुरुवात कशी करावी grammar की pronunciation कळत नाही आहे. मी या आधी foreign language शिकले नाही आहे. ३-४ महिने सध्या आराम आहे म्हणून वेळ घालवण्यासाठी शिकायचे आहे आत्तातरी. जे कोणी लंडन based आहे त्यांनी मार्गदर्शन करावे?? आधी कोणी foreign language शिकताना कसे step -wise approach केले, मार्गदर्शन करावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला स्पॅनिश कशासाठी शिकायचं आहे ते स्पष्ट केलं नाहीये. पण वेळ घालवायचा आहे म्हणजे भाषाप्रभू वगैरे व्हायचं नाही असं समजून हा प्रतिसाद लिहिला आहे Happy

साधारण समोरच्याशी बोलण्यापुरता किंवा पर्यटन म्हणून कुठे जात असाल त्यासाठी असेल तर itune वर फ्री पॉडकास्ट आहेत त्याने सुरुवात करा. मला आता नाव आठवत नाही पण एक सिरीज आहे ज्यात ते सुरुवातीची ग्रिटिंग्ज मग थोडं पुढ्चं असं वाढवत बर्यापैकी कव्हर केलंय. याने संवादापुरता तरी यायला हरकत नाही. जर भाषेचा अभ्यास, व्याकरण असं सगळं व्यवस्थित शिकायचं असेल तर तुमच्या आसपास एखादं कम्युनिटी कॉलेज असल्यास तिकडे कोर्स करा.
पॉडकास्ट वरून पोटापुरतं शिकत असाल तर अमेझॉनवरचं कुठलंही बिगिनर लेव्हलचं पुस्तक हाताशी ठेवा. वापरलेलं पुस्तक दहा-पंधरा डॉलर्समध्ये मिळेल.

मी नुकताच माबोवर येणा-या अ‍ॅड कशा ब्लॉक कराव्यात हे शिकलो. (आता बिल कमी येते आणि स्पीड पण वाढला). स्पॅनिश शिकून घेऊन शिकवायला थोडा वेळ लागेल. पण अटीप्रमाणे मी लंडन बेस्ड नाही Sad

सगळ्यांना धन्यवाद.

सायो रोझेटा स्टोन छान वाटले.

वेका, सवड आहे म्हणून आवड, असे आहे सध्यातरी. iTunes podcast नक्कीच पाहते. पोटापुरते शिकत आहे सध्यातरी पण गोडी लागली तरी नक्कीच पुढे course करेन.

धन्यावद योगेश, मस्त suggest केले.

मला मेमराइझ फार आवडले,

अ‍ॅड ब्लॉकपेक्षापुढे जायचे असेल तर
फायरफॉक्सवर टेक्सटाइज नावाचे अ‍ॅड ऑन आहे ते फक्त मजकूरच दाखवते.
म्हणजे इतर काही पाहण्याचे गरजच नाही! Happy

सध्या मी माहीम ला spanish शिकतेय. लेवेल A2.2

ऑन लाईन साठी www.123teachme.com ही वेबसाईट खूप चांगली आहे. तिथे अगदी सुरुवाती पासून (उच्चार व लिखाण ) ते शिकवतात . तसेच podcast साठी www.ssl4you.blogspot.com बेसिक लेवल करिता हा ब्लॉग पण चांगले आहे.

¡buena suerte! Happy

झरबेरा, खूप thanks.
www.123teachme.com हि website खूप खूप छान आहे. मी आत्ता त्या मधूनच सुरुवात केली आहे.

मी पण मुंबई ची आहे आणि नक्कीच मला spanish classroom मध्ये शिकायला आवडेल. तू मला माहीम च्या क्लास ची माहिती देशील का ?? please.

आनि don't mind माझे अजुन प्रश्न तुला विचारेन.

आनि don't mind माझे अजुन प्रश्न तुला विचारेन.>> मलाही उत्तरे द्यायला आवडतीलच Happy

मुंबई मध्ये माहीमला शोभा हॉटेलच्या रस्त्यालगत Hispanic Horizons नावाची एक Institute ahe.
www.hispanic-horizons.org या वेबसाईट वर सगळी माहिती आहे त्यांची. पहिली लेवल A1 सोडली तर B2.2 पर्यंत लेवल्स ऑन लाईन पण करता येतील. भारतीय, Spaniards, Mexican असे सर्व शिक्षक आहेत तिथे.

मी मार्च पासून त्यांच्या कडे शिकतेय. AC Classrooms, free WiFi ani library देखील आहे त्यांची. खूप आधी पेपर ला आलेला कि Instituto Cervantes Sydenham College मध्ये क्लास्सेस घेणारेत पण मी केलेल्या मेलला अजूनतरी उत्तर नाही आलं.

Instituto Cervantes म्हणजे जर्मन चं Goethe आणि फ्रेंच चं Alliance Française आहे तसंच आहे. IC तर्फे Diplomas of Spanish as a Foreign Language च्या परीक्षा घेतल्या जतत. परंतु IC ची भारतात शाखा फक्त दिल्लीला आहे.

तुम्ही जर लंडन मध्ये असाल तर www.londres.cervantes.es सर्वात बेस्ट !!

मुंबईत अजून आहेत ३-४ क्लास्सेस पण त्यात हा सर्वात चांगला आहे कारण माझ्या इतर वर्गांमध्ये (levels) बरेच जण बाहेरून आता इथे आले अहेत. Very interactive & all teachers are nice. मुंबईत शिकणार असाल तर हा क्लास खरच चांगला आहे.

मावैम - जर खरच पुढचे कोर्सेस करायचे असतील तर क्लासरूम ट्रेनिंग च हवे. बेस पक्का नसेल तर पुढे त्रासच होतो... स्वानुभव. त्यात परत प्रत्येक लेवल ला थीम तीच असते पण डिफिकल्टी लेवल वाढत जाते. जनरली ऐकणं, पहाणं, पाहून रिअ‍ॅक्ट होणं, तेत आ तेत (शब्दशः - टाळक्याला टाळकी) समोरासमोर बोलणं अन ग्रुप असं सगळं एकाच लेवलला घ्यायचा प्रयत्न असतो.
हे लेवल ए१ ला पण असेल अन बी२ ला ही असेल. डिफिकल्टी लेवल वाढतच जाणार...

झरबेरा आणि योगेश कुळकर्णी खूप धन्यवाद.
तुम्हा दोघांमुळे मी स्वतःला थोडे push केले की तुम्ही दोघे शिकत आहात spanish पण मग आपणपण शिकायचे. माझ्या मित्र-मैन्त्रीन मध्ये फ्रेंच, जपानी भाषा शिकणारे एक-दोन आहेत पण spanish बद्दल कोणी-कधीच इंटरेस्ट दाखवला नाही

झरबेरा वेळीच तू मला encourage केले थोड्याश्या मदतीने. मी इतके दिवस spanish शिकायचे एकटीने सुरु ठेवले आणि आता खरच मला आवडते ही भाषा.

SPANISH FOR DUMMIES हे पुस्तक मिळाले library मध्ये अचानक. प्रथम आयुष्यात मी भाग्यवान आहे असे वाटले.

हळूहळू मी अक्षर, संख्या आणि ग्रीटींग्स शिकले आहे. सारे पाठंतरच सुरु आहे सध्या पण अगदी शाळेत पाचवीला इंग्लिश शिकताना मज्जा येत होती तेच वाटत आहे. आपण इंग्लिश कसे शिकलो शाळेत हे आठवून प्रवास सुरु आहे.

पुढे काही प्रश्न असेल तर नक्कीच पोस्ट करेन.

माझ्या मित्र-मैन्त्रीन मध्ये फ्रेंच, जपानी भाषा शिकणारे एक-दोन आहेत पण spanish बद्दल कोणी-कधीच इंटरेस्ट दाखवला नाही सत्यवचन! Sad

हळूहळू मी अक्षर, संख्या आणि ग्रीटींग्स शिकले आहे.
सुरुवात चांगली आहे! सोबत एक लिंक पाठवत आहे, तिथे आपण 'आज आपण काय शिकलो' किवा कितपत जमतंय याचा एका छोटासा आढावा घेऊ शकाल Happy
www.elearnspanishlanguage.com/beginnerschecklist.html

मी स्वतः एक लेवेल ऑन लाईन शिकलेय. तेव्हा आम्हाला बरेच resources दिलेले. हवे असतील तर अजून देईन. आत्ता ५०% भाग audio excersices साठी द्या (apart from reading, writing and speaking) आणि जमतील तशी स्पानिश गाणी ऐकत राहा कानावरून जाण्यासाठी. त्याने खरच खूप फरक पडतो!