तेंव्हा आणि आता ...

Submitted by माशा on 24 October, 2013 - 03:22

तेंव्हा नुसती अश्शी भिरभिरायची नजर
आता बाजूला माझ्यावरच तिरकी नजर !

मनात येताच मित्र जमून करायचो कल्ला
'विचारून' बाहेर जाताना आता ऐकतो सल्ला !

तेंव्हा चापायचो हॉटेलात जाऊन चिकन हंडी
आता आवडून घेतो सात्विक मुगाची खिचडी !

तेंव्हा कशी वेगात बुंगाटत होतो बाईक
आता 'मागून येणा-या' सूचनेचा पाईक !

तेंव्हा कधी बाळगली नाही तमा आयुष्याची
आता जाणवते जबाबदारी तुझ्याही आयुष्याची !

- माशा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं आहे.... विरोधाभास थोडक्यात आणि छान मांडलाय.
अशीच काहीशी अवस्था होते लग्नानंतर ..... बिच्चारे नवरे.... Wink

----------------------------------------------------------------------------------------------
शेवटच्या दोन ओळी आणखी प्रभावी असायला हव्या होत्या असे वाटले. वैम. कृगैन.

UlhasBhide ,

गैरसमज अजिबात नाही. तुमच्या मताशी अगदी सहमत आहे. Happy
उलट तुम्ही प्रतिसाद दिलात , मोकळेपणाने मत मांडलंत याबद्दल धन्यवाद.

आणि हो, काही नवविवाहित नव-यांच्याकडे बघूनच हे लिहिलंय Wink