आपले सणावार आणि क्रिकेट

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 14 October, 2013 - 03:23

काल द्सरा धुमडाक्यात साजरा होत असताना पुण्यात भारत विरुध्द आस्ट्रेलीया यांच्यात क्रिकेटचा सामना सुरु होता चिक्कार गर्दी होती स्टेडीयमवर घरी सुध्दा कित्येकाच्या घरी दूरर्दशनवर सामने पाहणारे कित्येक होते. येणार्‍या जाणार्‍याचे थोडक्यात स्वागत करुन पुन्हा मॅच मध्ये दंग होत होते. असे बर्‍याचदा आपल्या सणावाराला मॅचेस ठेवलेल्या असतात बरेच महाभाग सणावार विसरुन क्रिकेट पाहतात. एकवेळ क्रीकेटपटुंचे ठीक त्यांना पैसे मिळतात.परंतु नागरिकांनी तरी आपल्या सणावारांना यथोचित वेळ दिला पाहीजे. लक्ष्मीपुजन चालु असतानाही असेच अप्सरा आली किंवा अजय अतुल असे कार्यक्रम असतात. लोक सगळ सोडुन कार्यक्रमाला हजर .

भविष्यात आपले सणावार टिकविण्यास हे नक्कीच डोकेदुखीचे ठरतील असे वाटते. आपलेही मत जाणुन घ्यायला आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे क्रिकेट बद्दल आहे की एकूणात सणांच्या दिवशी खेळ आयोजित करतात त्याबद्दल आहे ?

क्रिकेट बद्दल असेल तर त्या दिवशी हॉकी चा सामना ठेवला तर बघितलेला चालेल का ?

आणि एकूणात खेळ आयोजन बद्दल असेल तर एकीकडे (कामाच्या दिवशी) प्रेक्षक न गेल्याने खेळांकडे (क्रिकेट सोडून), खेळाडूंकडे दुर्लक्ष होतं असं म्हणायचं आणि ते टाळण्यासाठी सुटीच्या दिवशी आयोजित केलेले सामने बघायचे नाहीत ? काही झेपलं नाही.

लक्ष्मी पुजनाच्या दिवशी दिवाळी निमित्ताने रस्त्यावर लावलेल्या ५००००/१ लाख फटाक्यांच्या माळा ऐकाव्या की सायना नेहवाल चा / महेश भूपती चा एखादा सामना बघावा ? तुम्हीच सांगा पाहू.

सणाना सुट्ट्या असतात आणी सुट्ट्यादिवशी सामने असतात . बाकी काही नाही
रविवारी म्हणूनच होम टीमचे सामने होतात.
अख्खी EPL Weekend ला खेळली जाते .

अख्खी EPL Weekend ला खेळली जाते .
>> हो, पण EPL चे सामने Christmas day आणि गेल्या काही वर्षांत easter sunday ला खेळत नाहीत. आपल्याकडेही कमीतकमी दिवाळी आणि दसर्‍याला क्रिकेट चे सामने ठेवू नयेत.

Christmas day आणि गेल्या काही वर्षांत easter sunday ला खेळत नाहीत. >>
बॉक्सिंग डे मॅच काय मग ?
पण मला मुद्दाच कळत नाहिये . मॅच नसली तरी "सासू सून " असेलच ना तेही दिवाळी दसरा स्पेशल Happy
का मॅच नसली की सगळे टीव्ही बंद होणार आहेत ?

लक्ष्मी पुजनाच्या दिवशी दिवाळी निमित्ताने रस्त्यावर लावलेल्या ५००००/१ लाख फटाक्यांच्या माळा ऐकाव्या की सायना नेहवाल चा / महेश भूपती चा एखादा सामना बघावा ? तुम्हीच सांगा पाहू.
>> मी फक्त लक्ष्मीपुजनाचे दिवशीच असे नाही लिहीले. जवळपास दसरा दिवाळी, रंगपंचमी, अशा विविध सणाला मॅचेस असतात.
शिवाय क्रिकेटच नाही , अजय अतुल, किंवा अप्सरा महापर्व असेही कार्यक्रम चालु असतात हेही लिहीले आहे.
बाकी ईद, ख्रिसमसला एवढ्या किंवा मॅचेस झाल्याचेच आठवत नाही.

ह्या विषयाच्या दोन्ही बाजूंनी बोलण्यासारखं / लिहीण्यासारखं खूप आहे.

सण / उत्सव हे सामाजिक आनंदाचे सोहोळे आहेत. परदेशात रहाताना दिवाळी साजरी करण्याचा आनंद असतोच, पण जे एक सणाचे वातावरण असतं ते मात्र ख्रिसमस किंवा थँक्सगिविंग (अमेरिके पुरतं लिहितोय मी) च्या वेळेस जाणवतं त्याचा संस्कृती वगैरे शी संबंध नसून "सामाजिक सोहळा" असण्याशी आहे,

जर काही लोकांना सणाच्या / सुट्टीच्या दिवशी क्रिकेट (खेळ) खेळून / पाहून अथवा टीव्ही शोज पाहून आनंद मिळत असेल, तर ते सरसकट चुकीचं आहे असा निष्कर्ष कसा काढणार?

ख्रिसमस किंवा ईद ला क्रिकेट का नाही खेळत ह्या मुद्द्यावर काय लिहिणार? एक तर आपल्याकडे सण भरपूर आहेत. मला नाही वाटत भारतीय किंवा आशियाई संस्कृतीत जितके सण आहेत तितके आणखी कुठे असतील म्हणून. ह्या सणांमधले कमी/अधिक महत्वाचे सण कसे ठरवणार? मग कमी महत्वाच्या सणांच्या दिवशी क्रिकेट चालेल, अधिक महत्वाच्या दिवशी नको अशी प्रतवारी करावी लागेल.

थँक्स्गिविंग च्या दिवशी दुपारी अमेरिकन फूटबॉल ची मॅच पहाणं हा एक खास अमेरिकन पारंपारिक प्रकार आहे. थोडक्यात असं की शेवटी सण हे एकत्र येऊन आनंद साजरा करण्यासाठी असतात. जोपर्यंत दुसर्याला त्रास न होता स्वतःला रुचेल अशा पद्धतीनं सण साजरे करता येतील, तोपर्यंत तसं करण्याचा हक्क प्रत्येकाला लाभू दे. सणांच्या दिवशी क्रिकेट / टी. व्ही. पहाणं हे त्या दिवशी सार्वजनिक गोंगाट (डॉल्बी / स्पीकर्स आणि इतर) करण्याईतकं वाईट नाही वाटत.

तसही पाहूणे (आधी ठरवून / आगंतूक) आले असताना समोर टी. व्ही. लावून ठेवणं (खेळ किंवा कुठलाही ईतर टी. व्ही. शो) / फोनवर बराच वेळ बोलत बसणं / थोडक्यात पाहूण्यांकडे पूर्ण लक्ष न देणं हा उद्धटपणाच आहे. मग तो सण असो किंवा ईतर कुठला दिवस असो. त्यातून निमंत्रीत पाहूणे असतील तर थोडं अधिकच.

फेरफटका तुमचे पटते पण बहुतेक महत्वाचे सणाला क्रिकेट मॅच ठेवलेल्या दिसतील. खेळाडु पैश्यासाठी खेळतात. सामान्य माणसे कामधाम विसरुन / उरकुन पाहत बसतात. पण तरीही एकुण टीव्ही वरील कार्यक्रमांमुळे शेजारधर्म विसरत चालल्याची भावना निर्माण होत आहे.
कधी मधात लोंडशेडींग होते तेव्हा शेजारीपाजारी रात्री एकत्र येऊन अगदी मस्त गप्पा मारीत होते. लोंडशेडींग गेले तसे भेटणेही दुरापास्त झाले.

१ सण साजरा करायला असा कितीसा वेळ लागतो?
२ सुटीच्या दिवशी सामने नाही ठेवले तर प्रेक्षागारे कशी भरतील?
३ सणाच्या दिवशी सामने/कार्यक्रम हा खरे तर हा क्रिकेटपटू/कलाकारांवर अन्याय आहे. त्यांना आपल्या कुटुंबियांसोबत सण साजरे करता येत नाहीत.
४ त्यांना पैसे मिळतात म्हणून ठीक आहे म्हणताय. दुप्पट दाम मिळत असेल तर सणाच्या दिवशी ओवरटाइमला जाल का?
५ कामाच्या दिवशीही सामने असतातच. सामन्यात इंटरेस्टिंग असं काही होत असेल तर लोक ऑफिसातही कामे सोडून सामन्याकडे कान/डोळे लावून बसतातच. ते जास्त चांगले का?

मुक्तेश्वर ...मुद्दा पटला. पुढे जाऊन (थोडा वेगळा मुद्दा/विषयांतर)मला असंही वाटतं की क्रिकेटच्या वेडामुळे वाढत्या वयातल्या मुलांमधली काही शारीरिक आणि मानसिक कौशल्ये विकसितच होत नसतील(जी रेग्युलर इतर खेळांमुळे होतात). कारण ही मुलं मिळेल तेवढ्या जागेत १०/१० १२/१२ जण फक्त क्रिकेटच खेळतात. म्हणजे एकाने बॉल टाकायचा दुसर्‍याने फटकारायचा. कुणीतरी तो झेलायचा.
आणि फक्त अभिनिवेशच सगळा टीव्हीवरच्या मॅचप्रमाणे!
पण तरीही एकुण टीव्ही वरील कार्यक्रमांमुळे शेजारधर्म विसरत चालल्याची भावना निर्माण होत आहे.
>>>>>>>> बंडोपंत +१००

@मयेकरजी >>
१ सण साजरा करायला असा कितीसा वेळ लागतो?>>> मुद्दा वेळेचा नाही मॅच मुळे मुळात शेजारी वा नातेवाईक परिपुर्ण वेळ देत नाहीत., किंवा कुटूबातील सदस्याही मदतीस उपलब्ध नसतात. साधे दाराला तोरण करायचे तर मॅच झाल्यावर पाहु म्हणतील.

२ सुटीच्या दिवशी सामने नाही ठेवले तर प्रेक्षागारे कशी भरतील?>> प्रेक्षागारे भरायला भारतीय त्यातही महत्वाच्याच सणाची निवड का हा मुद्दा आहे येथे.

३ सणाच्या दिवशी सामने/कार्यक्रम हा खरे तर हा क्रिकेटपटू/कलाकारांवर अन्याय आहे. त्यांना आपल्या कुटुंबियांसोबत सण साजरे करता येत नाहीत.>> सहमत

४ त्यांना पैसे मिळतात म्हणून ठीक आहे म्हणताय. दुप्पट दाम मिळत असेल तर सणाच्या दिवशी ओवरटाइमला जाल का?>> खरे तर ओव्हरटाईम मिळतो म्हणुन जाणारे कमी निघतील. पण कित्येक जण स्वत:च्या जॉब महत्वाचा मानतो त्यामुळे १०० पैकी ९० तरी नाईलाजाने हजर होतात.

५ कामाच्या दिवशीही सामने असतातच. सामन्यात इंटरेस्टिंग असं काही होत असेल तर लोक ऑफिसातही कामे सोडून सामन्याकडे कान/डोळे लावून बसतातच. ते जास्त चांगले का? >> हो असे पुर्वी फार होते, आज तरी त्यात बराच फरक पडलाय.

<बाकी ईद, ख्रिसमसला एवढ्या किंवा मॅचेस झाल्याचेच आठवत नाही.>

आताची ईद १६ ऑक्टोबरला होती ना? त्यादिवशीच भारत - ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामना होता ना?

सणांच्या दिवशी क्रिकेट / टी. व्ही. पहाणं हे त्या दिवशी सार्वजनिक गोंगाट (डॉल्बी / स्पीकर्स आणि इतर) करण्याईतकं वाईट नाही वाटत. +

लक्ष्मी पुजनाच्या दिवशी दिवाळी निमित्ताने रस्त्यावर लावलेल्या ५००००/१ लाख फटाक्यांच्या माळा ऐकाव्या की सायना नेहवाल चा / महेश भूपती चा एखादा सामना बघावा ? तुम्हीच सांगा पाहू.

>> सण नको पण फटाके आवर !!! Sad

मुद्दा वेळेचा नाही मॅच मुळे मुळात शेजारी वा नातेवाईक परिपुर्ण वेळ देत नाहीत., किंवा कुटूबातील सदस्याही मदतीस उपलब्ध नसतात. साधे दाराला तोरण करायचे तर मॅच झाल्यावर पाहु म्हणतील.

>> हे इतर वेळी इतर कामांच्या बाबतीतही होऊ शकते. मुळात तोरण करणे हि तुमची वैयक्तीक प्रायॉरिटी आहे. ती तुम्ही इतरांवर का लादता? (हे वाक्य जनरल आहे, पर्सनल नाही. कृ. गै. नसावा).

बाकी ईद, ख्रिसमसला एवढ्या किंवा मॅचेस झाल्याचेच आठवत नाही >> आजकाल मायबोलीवरील कुठला विषय कुठल्या ट्रॅक वर जाईल काही नेम नाही Happy