माझ्या सर्व कवि मित्रांना आणि मैत्रिणींना माझी एक विनंती आहे. जे मनाला वाटले ते लिहितो आहे कृपया राग मानु नका.
कवितांचा गुलमोहर फारच छान फुलला आहे, फार सुंदर कविता रचल्या जात आहेत. आणि त्या मोठ्या मनाने रसिकांना वाचण्या साठी सादर केल्या जात आहेत. आपली कलाकृती रसीकजनांन समोर सादर व्हावी आणि कौतुकाची थाप पाठीवर पडावी हाच कलाकाराचा श्वास, ह्या श्वासावर कलाकार जगतो आणि ह्या श्वासा साठीच कलाकार जगतो.
गुलमोहराच्या झाडाने फुलताना विचार करु नये की त्याने फुलवल्या फुलांच पुढे काय होत. ती कोणी आनंदाने वेचत आहे की पायदळी तुडवत आहे? याचा विचार बहरल्या वृक्षाने का करावा? हे जरी खरं असल तरी मी ज्यांच्या साठी बहरलो आहे त्यांच्या साठी हा बहर म्हणजे खरच सुंदर सडा आहे की नुसताच फुलांचा खच, ह्याचा विचार नक्की करायला हवा. सडा वेचायला येणारा रसिक ह्या खचा मध्ये गुदमरता कामा नये ही जबाबदारी सर्वस्वी आपली आहे कारण मायबोली एक गुलमोहर आहे आणि आपण त्याच्या शाखा.
मी काय म्हणतो आहे हे तुमच्या लक्षात आलच असेल. बरिच नविन मंडळी आलि आहेत, बर्याच नविन कविता, वेगळे विषय मांडले जात आहेत, कलाकृती देखिल सुंदर आहेत. पण ह्या क्षणाला गेल्या २४ तासातील लेखन शोधलत तर २४ कविता सापडतील पण त्यावरील प्रतिक्रिया देखिल फार थोड्या आहेत, अस नाही की कलाकृती चांगल्या नाहित पण त्या गर्दीत कुठेतरी हरवल्या जात आहेत.
आपण कुठेतरी भरकटले जात आहोत आणि आपल्या जबाबदार्या बेजबाबदारपणे नाकारत आहोत असे मला वाटले म्हणुन ही विनंती. एखादा प्रयोग सादर करताना प्रत्येक कलाकाराची एक जबाबदारी असते आणि ती प्रत्येकाने निभावल्या शिवाय तो यशस्वी होउ शकत नाही. गुलमोहर कव्यधारा ह्या कलादालनातला मी देखिल एक कलाकार आहे आणि आपणा सर्वांचा हा प्रयोग रसिकांना निखळ आंनद देणाराच असावा ह्याच पोटतिडकीने विनंती करतो की येथे गुलमोहराचा सडा पडु दे, खच नको.
रसिकांनी जे वाचल ते पचल तरी जाउं दे मग अजुन वाढु, आपल्याला घाई कसली आहे? आपणही अक्षय पात्र घेउन बसलो आहोत, तेही सर्वोकृष्ठ पक्वानांच. पण जर आपल्या आग्रहाने रसिकांना अजिर्ण होत असेल तर ... अजिर्ण हे पंच पक्वांनांच असो की दुध भाताच त्रास सगळ्यांनाच होतो.
हळुवार उतरलेल्या कवितांसाखा हा गुलमोहर देखिल हळुवार बहरू दे आणि पारिजातकाच्या सड्या प्रमाणे ह्याचा गंध सर्वदुर पसरु दे, येवढीच तुम्हा सर्वानां विनंती..
काही चुकल असेल तर आपल म्हणुन माफ करा. काही दुखल असेल तर चुकल म्हणुन जोडे हाणा.

पण हे कविता विभागात का आहे ??
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जे काही आहे ते विषयाला धरून आहे.
--------------
नंदिनी
--------------
सत्यजितला माझ्याकडून शंभर मोदक.
कविता बीबी व्यतिरिक्त इतरही बीबीवर मंडळींनी चक्कर टाकली असती, तर हे सत्यजितला लिहिण्याची गरज आली नसती बहूतेक.
असो. इथे कोणाच्याही किंवा कोणत्याही कवितेला कमी लेखण्याचा अजिबात हेतू नाही, हे कृपया लक्षात घ्यावे.
गुलमोहर हा मायबोलीकरांचा हितगुज इतकाच जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे सत्यजितच्या म्हणण्याप्रमाणे 'सडा पडू देत. खच नको.'
--
भेटण्याआधीच ठरलेली असते वेळ जेव्हा जायची-
शहाण्या मुलासारखी खेळणी आवरून घ्यायची..!!
अगदी अगदी!


काय हे ना की सडा पडला की कस परडीभर एकेक वेचता येतात
च्यामारी.... खच पडला की खराट्याने झाडून काढावे लागते, त्याच काय?
...;
आपला, लिम्बुटिम्बु
सत्या, विचार उत्तम आहेत.
लिहीणारे लिहीताहेत, ज्यांना वाचावसं वाटतय तेच वाचताहेत. ज्यांना नाही ते ढुंकूनही पहात नाहीत. चार माणसात सारा खेळ चाललाय हेही जाणवतयं. एक अलिखित बहिष्कार असल्यासारखा.
माझ्यापुरतं म्हणायचं झाल्यास मी जेव्हा दिवसाला दोन-तीन कवितांचा रतिब घालतो तेव्हा तो वाचनीय असतोच असा माझा हट्ट नाही. गेल्या अनेक वर्षात लिहीलेल्या काही कविता कपाटात, वहीच्या पानात, डायरीत सापडतात त्या पुन्हा हरवू नयेय म्हणून येथे लिहीतो (टाकतो म्हणत असतील कुणी !)
मी माझं लेखन कधी कुठे प्रकाशित करण्याच्या भानगडीत पडलो नाही की चार मित्रांना गोळा करून बळजबरीने ऐकवलं नाही. इथे लिहीताना मनात एकच की एका ठिकाणी संकलन होईल. वाचण्याची कुणावर सक्ती नसल्याने कुणी दुखावणार नाही असा स्वतःचा समज. पण तुला हे लिहावं लागलयं याचाच अर्थ काहीतरी चुकतय. म्हणून मी यापुढे स्वतःला आवरतं घेईन. धन्यवाद.
>>>>>>
माझ्यापुरतं म्हणायचं झाल्यास मी जेव्हा दिवसाला दोन-तीन कवितांचा रतिब घालतो तेव्हा तो वाचनीय असतोच असा माझा हट्ट नाही.
>>>>>
असं समजा की मायबोलीवरील गुलमोहर हा विभाग एखादे मासिक आहे. मासिकाला जर तुम्ही रोज १ ह्याप्रमाणे कविता पाठवल्या तर संपादक छापतील का? नाही छापणार. पण गुलमोहरावर लिहिणाराच लेखक/कवी आणि संपादकही तोच. मग ते संपादकीय निर्णय लेखक/कवीनेच घ्यायला नकोत का?
>>>>
गेल्या अनेक वर्षात लिहीलेल्या काही कविता कपाटात, वहीच्या पानात, डायरीत सापडतात त्या पुन्हा हरवू नयेय म्हणून येथे लिहीतो >>>>
जर तुम्हाला कविता डिजिटल रुपात साठवून ठेवायच्या असतील तर तुम्ही स्वतःच्या संगणकावर, एखाद्या ब्लॉगवर देखील ठेउ शकता. जेव्हा तुम्हाला वाटेल की 'बस्, ही कविता मस्त आहे, वाचनीय आहे तेव्हा तिला गुलमोहर वा तश्याच अनेक सार्वजनिक फलकांवर प्रकाशित करु शकता.
>>>>
लिहीताना मनात एकच की एका ठिकाणी संकलन होईल. वाचण्याची कुणावर सक्ती नसल्याने कुणी दुखावणार नाही असा स्वतःचा समज. पण तुला हे लिहावं लागलयं याचाच अर्थ काहीतरी चुकतय. म्हणून मी यापुढे स्वतःला आवरतं घेईन. धन्यवाद
>>>>
जर वरील वाक्यातील तर्कानुसार तुम्ही स्वतःला आवरतं घेतलं तर सत्यजीतने केलेला खटाटोप व्यर्थ गेला असे म्हणावे लागेल कारण तुम्ही चुकीच्या कारणाने आवरते घेतले असेल.
सत्यजीत एमला पुर्ण मोदक. टन्यालाही. कौतुका, आवरते घेण्यापेक्षा पॉजिटिवली घे.
कदाचित आत्मपरिक्षणाची, थोड्या वाचनाची, अभ्यासाची गरज आहे. नाहीतर थोड्या दिवसांनी कुणी गुलमोहोराकडे फिरकणार नाही.
मा.बो.वर गुलमोहोरसाठी एखादी संपादकीय्/निवड समिती योजली तर? गजल का.शा. किंवा दिवाळि अंकाप्रमाणे?
सत्त्या,
भाऊ, भा.पो. पण हे सर्व आधी इथे चर्चून झालेले आहे अन खुद्द "admin" यान्नी मा.बो. ची पॉलिसी बद्दल स्पष्ट केले आहे..
तेव्हा सडा का खच का बहर का आणाखीन काही हे ठरवणारे आपण (तुम्ही आम्ही) कोण...? इथे इतरही bb वर काही वेगळी परिस्थिती नाही.. तेव्हा जे जे होत आहे ते पहात रहावे... निदान हे तरी पहा:
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/discus.cgi?pg=prev&topic=122198&p...
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/discus.cgi?pg=next&topic=122198&p...
अन त्यातलाच काही भागः
Admin
Friday, March 21, 2008 - 12:18 am:
यात दोन भाग आहेत.
१. नवीन सदस्याना कुठे काय लिहावे, आपली धोरणे काय आहेत हे माहिती नसणे.
- या बाबत मदत पुस्तिका तयार करण्याचे काम चालू आहे.
२. हितगुज / गुलमोहरवरच्या साहित्याचा दर्जा
- मायबोली सुरू झाल्यावर काहीच दिवसात हा प्रश्न निर्माण झाला होता आणि नंतरही वेळोवेळी तो निघाला आहे.
एक चांगले दर्जेदार प्रकाशन काढायचे का दर्जाकडे लक्ष न देता जास्त लोकाना मराठीत लिहिते करायचे.
तेंव्हापासून जाणीवपूर्वक आपण असे धोरण स्वीकारले आहे की लोकांनी मराठीत लिहायला लागणे हे आपल्यासाठी जास्त महत्वाचे आहे. आणि त्या साठी दर्जाकडे दुर्लक्ष केले गेले तरी चालेल. त्यामुळेच दिवाळी अंक सोडून आपण मुद्दाम कुठल्याही संपादकीय संस्करणाशिवाय लेखन प्रसिद्ध करतो.
सत्यजीतला शंभर वेळा अनुमोदन!!! खरंच आज काल कवितांची संख्या इतकी वाढत चालली आहे गुलमोहरवर की एका दिवसात मायबोलीला २-३ वेळा भेट देऊन सुद्दा सगळ्या कविता वाचुन त्यांना प्रतीसाद देणं शक्य होत नाही. किंबहुना बर्याचश्या कविता नजरेतही पडत नाही संख्या जास्त असल्यामुळे..

मला वाटतं टण्याच्या म्हणण्याप्रमाणे कवितांच्या संपादनाविषयीचे निर्णय जर लेखकांनी विचारपुर्वक घेतले, तर ह्यावर तोडगा निघेल...काही दिवस तरी प्रयत्न करुन बघुया ना काय होतं....
*****************
सुमेधा पुनकर
*****************
सत्याला अनुमोदन. खरेच कधी कधी कवितांचे अजिर्ण झाल्यासारखे वाटते. एक कविता वाचून समजून घेणार (कधी कधी यासाठी झगडावे लागते) तोच दुसरी साधारण त्याच पठडीतली येते, मग तिसरी, मग चौथी... असे करता करता सगळे तेच ते आणि शिर्षक वेगळे असे दिसून आल्याने कविता वाचाव्याशाच वाटत नाहीत, नुसते डोळे ओळींवरुन फिरतात पण ओळी मनात झिरपतच नाहित
. थोडी थोडी गॅप घेऊन व वेगवेगळ्या विषयांवरची कविता आली तर वाचायला बरे वाटते.
योग, अगदी बरोबर, मी माझे "सडा की खच" हे शब्द मागे घेतो!
बर झाल, तू त्या चर्चेची लिन्क दिलीस!
त्यातुन नविन लेखक सभासदान्नाही मार्गदर्शन होईल
...;
आपला, लिम्बुटिम्बु
मी हा खटाटोप एकाच कारणाने केला की प्रत्येक जण ईथे लिहायच म्हणुन लिहीत नाही तर लोकांनी ते वाचव आणि प्रतिक्रीया द्याव्या म्हणुन लिहीतो. कुणी वाचो न वाचो मी लिहीत जाईन अस कुणाच्याच लिखाणातुन जाणावत नाही, कुणाला काय आवडत तर कुणाला काय हे ठरवण्याचा अधिकार कुणालाच नाही. कुठल्या गोष्टीचा दर्जा काय आहे हे ठरवण्या साठी नियम असे नाहीत आणि ते असु पण शकत नाहीत. कुणाला साध सोप लिखाण आवडत तर कुणाला गांभिर्यपुर्ण, आवड आहे ज्याची त्याची. आणि म्हणुनच मायबोली सगळ्यांची आहे, आपली आहे.
योग ने दिलेल्या दुव्यावरुन ऍडमिनने मायबोलीच उद्दीष्ठ स्पष्ट केल आहे आणि त्यांचे प्रयत्न खरच वाखाणण्या जोगे आहेत. मायबोलीच्या निर्मात्यांच उद्दीष्ठ १०१% साध्य झाल आहे. पण इथे येणार्या प्रत्येकाच देखिल एक उद्दीष्ठ आहे ते साध्य होत आहे का? ते होत असेल तर उत्तमच आहे पण आपण आपल्या उद्दीष्ठा पासुन भरकटतर नाही आहोत ना? हे प्रत्येकानी एकदा पडताळुन पहावे अस मला वाटल म्हणुन लिहील. हे अजिबात वयक्तीक नाही.
कौतुक आवरत अजिबात घेउ नको मित्रा आणि कुणीच घेउ नये. अगदी खर सांगायच तर तुझी मोनालिसा मला गर्दीत सापडली मग जाणवल की अशा सुंदर रचना गर्दीत हरवता कामा नयेत म्हणुन मी हा खटाटोप केला. आणि मोनालिसा ती... अस कस सोडणार तिला एकटिला गर्दीत, तुझी असली म्हणुन काय झाल ..
पण तू तुझा एक बॉग काढावास अशी माझी विनंती आहे जेणे करुन फक्त तुझ्या कविता, तुझे लेखन एके ठिकाणी संग्रहीत होईल. माझ्या पुरत सांगायच झाल तर मी मझ्या कविता मायबोलीवर आधी प्रकाशित करतो आणि मग माझ्या ब्लॉगवर. काही जण इथे प्रतिक्रिया देतात तर काहीजण ब्लॉगवर तर काही प्रत्यक्ष प्रतिक्रिया... हाच आपला श्वास आहे.
सत्यजीत, किती छान शब्दात भावना व्यक्त केल्या आहेस
पण अगदिच 'अजिर्ण' वगैरे नका रे म्हणु. शेवटी ती त्या कवी ची निर्मीती असते / प्रतीभा असते / त्याच्या भावना असतात.
बरेचदा नविन नविन लिहायला सुरुवात केलेले थोडे अपरिपक्व असु शकतात. त्यामुळे योग्य शब्दात सुचना केली तर कोणी दुखावणार नाही.
त्यामुळे योग्य शब्दात सुचना केली तर कोणी दुखावणार नाही. >>>> I agree.. बरेचदा लोकं नुसतं "शब्दबंबाळ" "शब्दापुढे शब्द" किंवा अश्या प्रतिक्रिया देतात ज्याचा लेखकाला/कविला काहिच उपयोग नसतो उलट खच्चीकरण्च होते जास्त..
माझ्या मते constructive crtitisim हवं.. मधे नेट वर giving and receiving feedback विषयावरच article वाचलं होतं.. खूपच चांगलं होतं.. लिंक सापडली तर देईन इथे..
एवढ्या सगळ्या वार्तालापानंतर मला पण काहितरी लिहावेसे वाटतेय. माझी सहानुभूति दोघांनाही- कविंना आणि वाचकांना- कारण मी कविताही लिहिल्या आहेत आणि प्रतिसादही दिले आहेत; (मिळाले किती ह्याचा हिशेब ठेवण्यापेक्षा त्या इथे बन्द झडपीतून बाहेर आल्या, ह्यातील आनंद जास्त होता).
एकच अशी भेटते,
आयुष्य स्पर्शून जाते
जाता जाता आयुष्याला
एक नव्या वळणाला नेते
असे जेव्हा होते, तेव्हा आपसूकच प्रतिसाद द्यावासा वाटतो. एखाद्या कवितेला काव्याने प्रतिसाद देणे, हे तर त्या कवितेचा गॉरवच केल्यासारखे वाटते. समविचारांना पण पालवी फुटणे स्वाभाविक आहे; पानगळति सुद्धा होतच आहे, म्हणून निर्मितीला नाकारणे योग्य नव्हे. कटट्यावर गप्पा मारण्यातही एक मजाच असते नाही का? अर्थात adm चे सहकार्य आहे, म्हणून.
>पण इथे येणार्या प्रत्येकाच देखिल एक उद्दीष्ठ आहे ते साध्य होत आहे का? ते होत असेल तर उत्तमच आहे पण आपण आपल्या उद्दीष्ठा पासुन भरकटतर नाही आहोत ना? हे प्रत्येकानी एकदा पडताळुन पहावे अस मला वाटल म्हणुन लिहील.
त्यातलाच हा प्रकार!

>हे अजिबात वयक्तीक नाही.
मित्रा, परस्पर्-विरोधी वाटतय्.."सत्ते पे सत्ता" टाईप..! नक्की काय म्हणायचय..?
असो. मा.बो. ने लिहायला जागा उपलब्ध करून दिली..लिहिणार्यांवर काही निर्बंध नाहियेत... त्यामूळे हा सर्वस्वी "वाचकाचा" प्रश्ण आहे.. काय वाचावे काय नाही..अगदी प्रतिक्रीया द्यावी की नाही... तुझी "मूळ विनंती" वैयक्तीक असली तरी त्यात बरेच वेळा इथल्या वाचकांचा "सार्वजनिक", "प्रातिनिधीक" टाईप उल्लेख आहे.. शिवाय कमी जास्ती प्रतिक्रीया हे काही लिखाणाच्या दर्जाच मोजमाप होवू शकत नाही, त्यामूळे तोही निकष लावून लिहीणार्यास "जरा दमानं" अस म्हणता येत नाही. एखादी "मोनालिसा" सापडायला इतर शम्भर मोना सोना पाहून घ्याव्याच लागतात
शंभर मोनालिसातून एखादी मोनालिसा निवडता आली तर तो झाला दर्जा.. इथे सोना मोनांनी एकत्र यावे हे उद्दिष्ट आहे
शिवाय पूर्वीसारख editors choice म्हणजे थोडेफार "मोनालिसा चे गुण" अशी system आता इथे नाहीये (का कुणास ठावुक?)
तेव्हा वाचकांना कळायला हवे मोनालिसा कुठे शोधायची ते !!! आणि ती शोधायलाही जरा(?) कष्ट घ्या़की राव्..दर वेळी ती मुखपृष्टावर पहिली थोडीच असणारे, मायापुरी च्या मासिका सारखी ?
विनंती करून मोनालिसा हाती लागणार आहे का boss? तिचा शोध घ्यावा लागतो, मागे धावावं लागत.. मला यावरही नको त्या वेळी कविता सुचते आहे (वाण नाही पण गुण लागला):
मोनालिसा: रियालिटी
आपण सारेच धावत असतो
तीच्या मागे
गुदमरण्या आधी दोन उसने श्वास त्या विधात्याकडून मागत..
ती तरिही पुढेच पळच रहाते
पाठी सर्व गंध अन ठसे सोडून
सर्व बन्धने अन नैतीक जाणिवा झुगारत..
अन आपण सारी लक्तर सम्भाळत, जिवाच्या आकांताने ओरडत रहातो,
पहात रहातो तिच्या पाठमोर्या काळ्या पिवळ्या खिन्न अस्तीत्वाकडे..
तिही दूर कुठे स्वताचा भार अन भावनावेग भसा भसा रिकामा करत रहाते
पुन्हा एकदा उद्या आपल्या अपेक्षांचा भार वाहण्याचे वायदे करीत..
शेवटी जीवघेणा इन्तजार दोघांच्याही वाट्याला आहेच..
मला हलके होण्याचा,
तिला भार पेलण्याचा..
मि: कचरा
ती: पालिकेची कचरा गाडी: "मोनालिसा"
योग्या एकंदरित काय तर तुला कम धंदे नाही आहेत आणि तुला व्हीसीची भुक नाही तर खाइखाई लगली आहे...
ह्यावर उपाय एकच १०-१५ दिवस कविता विभागावर भटकु नकोस नाहीतर खाइखाईचे रुपांतर खाजेत होइल.. (आता तुला खाज नाही आहे असे मला अजिबात म्हणायचे नाही..) तुला सध्या ललित विभागावर न्यायची वेळ आली आहे. 
>>तुला सध्या ललित विभागावर न्यायची वेळ आली आहे.
)
खाज गेली आहे...
ही सर्व चर्चा मी वाचतोय. समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. परंतु ह्यावर माझं मत मांडण्या ऐवजी, नामांकित लेखक " एडबर्ड डी बोनो " यांच्या जगप्रसिद्ध " how to have a beautiful mind" ह्या पुस्तकाच्या; "सुभाष जोशी" यांनी अनुवादित केलेल्या " सुंदर मन " ह्या मराठी आवृत्तीतील कंही "निवडक संबंधित उतारे" देत आहे ते सर्वांनी विचारात घ्यावेत असे वाटते.
आज "डॉक्टरेट अथवा तज्ञ पदवी" संपादन केलेले मान्यवर त्यांच्या सुरुवातीला "ग म भ न" च गिरवत होते हे लक्षात घेणे आपल्या सर्वांनाच गरजेचे आहे.
आपल्या लेखनाची प्रत ज्याची त्याला आपोआपच कळते आणि नंतर ती "सुधारते अथवा लोप पावते" मात्र त्यासाठी "सन्मैत्री आणि सौहार्दाची" गरज आहे, "विरोधाची" नाही.
नवीन असो अथवा बुजुर्ग, सर्वांनी लिहायलाच पाहिजे. वाचकांनी त्यांच्या प्रांजळ, सूचक, अश्वासक, प्रोत्साहक अथवा कटु अशा प्रतिक्रिया प्रमाणिकपणे पण सोज्वळ; न दुखावणार्या आणि दिशादर्शक उद्देशाने दिल्या पाहिजेत. एखद्याचे विचार उत्तम असतात पण मांडणी जमत नाही, कधी मांडणी उत्तम असते पण विचार सशक्त नसतो. योग्य अयोग्य नीर क्षीर विवेकाने निदर्शनास आणून द्यायला हवे.
एक चांगले दर्जेदार प्रकाशन काढायचे का दर्जाकडे लक्ष न देता जास्त लोकाना मराठीत लिहिते करायचे.
तेंव्हापासून जाणीवपूर्वक आपण असे धोरण स्वीकारले आहे की लोकांनी मराठीत लिहायला लागणे हे आपल्यासाठी जास्त महत्वाचे आहे. आणि त्या साठी दर्जाकडे दुर्लक्ष केले गेले तरी चालेल. त्यामुळेच दिवाळी अंक सोडून आपण मुद्दाम कुठल्याही संपादकीय संस्करणाशिवाय लेखन प्रसिद्ध करतो.
हे ऍड्मिनचेही म्हणणे "योग"ने याआधी लिहिलेलेच आहे.
सुरुवातीपेक्षा सरावानंतर दर्जात सुधारणा होणारच.
पुढील उतारे वाचून आपण आपल्याला तपसून पहता येईल.
SUNDER_MAN-01.jpg (30.8 KB)
SUNDER_MAN-02.jpg (63.91 KB)
SUNDER_MAN-04.jpg (72.1 KB)
SUNDER_MAN-06.jpg (49.4 KB)
SUNDER_MAN-05.jpg (44.01 KB)
SUNDER_MAN-05a.jpg (49.51 KB)
SUNDER_MAN-07.jpg (49.51 KB)
सत्या गुलमोहोरावर तुझ्या ह्या विनंतीचा कोणीच मान ठेवत नाहीयेत रे