एक ऋतु हिरवा झाला.... "भंडारदरा"

Submitted by जिप्सी on 27 September, 2013 - 02:04

पुन्हा एकदा भंडारदरा आणि परीसर एका पाऊसगाण्यासहित. Happy

एका गाभुळ सांजेला निळा पाऊस भेटला
कधी वैर्‍यागत झाला, कधी आधाराला आला

कधी वाटुन घेतले सुखदु:ख शब्द चार
कधी भांडला रागाने, कधी मखमली तुषार
थेंब थेंब साठविता एक ऋतु हिरवा झाला
कधी वैर्‍यागत झाला, कधी आधाराला आला
एका गाभुळ सांजेला निळा पाऊस भेटला

कधी वेड्यागत झाला, कधी वेडावून गेला
कधी समजुन वागला, कधी रात्रीचा जागला
कधी तळ्याच्या काठाला, कधी सागरतटाला
कधी डोंगरमाथ्याला, कधी धरून हाताला
लटुकुन पारंबीला, कधी फांदीच्या झुल्याला
पाखरांच्या बोलीतला, प्राजक्त गंधातला
मरव्याच्या नात्यातला, हिरवा पाचू भरलेला
एक ऋतु हिरवा झाला....एक ऋतु हिरवा झाला.....

(गीतकारः विवेक तेंडुलकर)

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झक्कास्स! Happy

प्रचि ९, १०, ११ >>> कशाला हवीत ती लेह-लडाखमधली लेक्स? आपल्या महाराष्ट्रात काय कमी सुंदर तलाव आहेत का? Wink

योगेश, सांदणदरी आणि अंब्रेला व्हॅली, काजव्यांची दरी याचे काही फोटो असतील तर टाक ना.
वरचे सगळेच फोटो अप्रतिम आहेत. सारख सारख काय ते कौतुक करायच?? Wink

पान हिरवे हिरवे
रान हिरवे हिरवे
त्याला निरखिता झाले
मन पारवे पारवे

काय टिपलाहेस सारा निसर्ग - वा वा - अगदी तिथे नेऊन उभे केलेस यार जिप्सी ...

जबरदस्त!!! Happy

मला फोटोग्राफीमधलं काही म्हणजे काहीच कळत नाही. पण हे फोटो काहीतरी वेगळे वाटतायत. जिप्स्या, फोटोंना ट्रीट केलं आहेस का?

अप्रतिमच Happy एअक्दम सही जागा. जुन्या 'हच' जाहिराती सारखं... 'ब्लू स्काय.. ग्रीन ग्रास'. पुन्हा एकदा जबरदस्त मेजवानी प्रचिंची.

अप्रतिम, सुंदर, एकदम खल्लास फोटो आहेत.. एक से बढकर एक.... खरच शब्द अपुरे पडतात ..
प्रत्यक्षाहून सुंदर आहेत. >>> दिनेशदा +++++ १.

किती दाटती मेघ हे अंतराळी
किती रेशमाच्या झडींची नव्हाळी
त्वरेने निघावे सुसाटून तू रे
असा पावसाळा पुन्हा नाहि येणे

जिप्सी - असाच फिरत राहा रे - आता काय जोडीने फिरत असणार ना !! एन्जॉय ....

लेका, किती फिरतोस आणि आम्हाला जळवतोस.. दम खा की जरा Wink

त.टि. - प्रचि बद्दल काहिही बोलणार नाहिये .. कही उरलच नाही बोलायला Happy

एकापेक्षा एक प्रचि पाहून डोळे हिरवे निळे झाले... सॉल्लिड.. अलंग,मदन व कुलंग हे त्रिकुट तर बहुतेक प्रचिंमध्ये भाव खाउन गेलेत.. मस्तच...:)

नि शेवटच्या फोटोत ऐकत नाय अगदी.. सध्या दिवस आहेत असे पाणी उडवण्याचे... Wink Proud

सुपर्ब....प्रचि नंबर १ =कन्याकुमारिला ऊभे राहुन भारताचा नकाशा कसा दिसेल..तसा फोटो वाटतोय.

Pages