Submitted by भाग्यश्री ७ on 14 September, 2013 - 08:20
थोपट आई हलके हलके
गा अंगाई हलके हलके
किती बढाया तुझ्या गुलाबा!
दरवळ जाई हलके हलके
जे भारी ते मना-तळाशी
उडून जाई हलके हलके
जुन्या रूढी त्या निवळत गेल्या
की वरमाई ?....... हलके हलके
गझल शिकावी नीट लिहाया
आणि रुबाई हलके हलके
-भाग्यश्री कुलकर्णी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेवटचा शेर मस्त आहे
शेवटचा शेर मस्त आहे
छान.. गझल लिहायची कशाला
छान..
गझल लिहायची कशाला ?
--- ऐकवायची
जे भारी ते मना-तळाशी उडून जाई
जे भारी ते मना-तळाशी
उडून जाई हलके हलके
व्वा.
जे भारी ते मना-तळाशी उडून जाई
जे भारी ते मना-तळाशी
उडून जाई हलके हलके <<<< हा आणि मतला आवडला
बाकीचे शेर भिडले नाहीत
सर्वांचे आभार!
सर्वांचे आभार!