वीस रुपयात प्रेम...

Submitted by तनवीर सिद्दीकी on 7 August, 2013 - 05:17

'वीस' रुपये उधार घेतले होते मित्राकडून..
'एकोणीस' मिनिटात तयार झालो होतो..
'अठरा' प्रेम पत्राची शपथ आहे आज
'सतरा' शे साठ विघ्ने येवो..आज सांगणारच..
'सोळा' सप्टेंबरचा दिवस होता तो..
'पंधरा' दिवसांचे हळवे प्रेम व्यक्त करायला..
'चौदा' वर्षाचा वनवास संपल्याची स्वप्ने बघत..
'तेरा' नंबरची बस धरली..'लास्ट स्टाप'
'बारा' दिवसाची ओळख..'हो' म्हणेल का ती?
'अकरा' सोमवार उपवास..उगाचच देवाला दिलेली लाच
'दहा' मिनिटे आधीच 'ती' हजर होती..
'नऊ' वाजता सुरु झाली आमची 'डेट'
'आठ' दिवस काय बोललो..याला काय प्रेम म्हणतात?
'सात' जन्माचा साथी.. असाच नाही भेटत..'नाही'...
'सहा' रुपयाची कॉफी..एक बायको मिळायला?..ओह्ह..
'पाच' पैसे तरी आहेत का तुझ्याकडे?..मला खुश ठेवायला?
'चार' वेळा काय हसले, बोलले..प्रेम झाले म्हणे..वेडा!!!!
'तीन' वर्षाचा कोर्स आहे..आपण नेहमी मित्र राहू..- ती
'दोन' सेकंदात कळले..तिचे मत..आणि माझी लायकी..
'एक' प्रेम फक्त पाहिजे होते...तेव्हाही..आताही..

(काही गोष्टी अजूनही उराशी जपून ठेवल्या आहेत - 'उधार'
ती वीस रुपयाची नोट..ते बिनसलेले प्रेम.....काळजे..
आज देवाच्या कृपेने बर काही आहे..मिळवलंय..
पण मला 'त्या' वीस रुपयातच 'हो' म्हणणारी पाहिजे..)

बघूया.........

तनवीर सिद्दिकी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<<<<<<<<'दोन' सेकंदात कळले..तिचे मत..आणि माझी लायकी..
'एक' प्रेम फक्त पाहिजे होते...तेव्हाही..आताही..>>>>>>>

अरे एकदम छान, खूप वेगळी पण मोजक्या विसोळीत मांडलेली.:स्मित:

Happy

मला 'ते' ५० रु आठवले....असो...काहींची २० रु मधे बोळवण होते....तर काहींची ५० मधे....पण कहाणी मात्रं तीच....

तनवीर - झक्कास रे!!!

(पण एक शन्का आहे, २० रुपये जवळ होते,
१३ नंबरची बस तिकिट अन्दाजे ५ रुपये आणि 'सहा' रुपयाची कॉफी.....म्हणजे ११ रुपये सम्पले.
तरी शेवटी पुन्हा २० रुपये कसे उरले ?)

Happy
गुलाम चोर (राजा) साहेब नमस्कार

प्रश्न अपेक्षित होता मला. कोणी आजवर विचारलेच नाही. तुम्ही विषय काढलात म्हणून हलकी पाश्वभूमी सांगतो.

हे (माझे) एक खरेखुरे एकतर्फी प्रेम प्रकरण होते. वीस रुपये खरच उधार घेवून मी निघालो होतो 'डेट' साठी. बसचा मासिक पास असायचा तेव्हा माझ्याकडे. त्यावेळीही होता. तिकडे गेल्यावर, ती आल्यावर जो प्रश्नाचा भडीमार झाला त्यानंतर मला काही खाणे पिणे जमले नाही आणि तिनेही रागात काही मागवले नाही.

कॉफी फक्त उदाहरण दाखल वापरले होते तिने, ते जसेच्या तसे इथेपण लिहिले मी.

बाकी कविता एन्जॉय करा.

तुमच्यामुळे ''आकडेमोड'' ताजी झाली आज !!

(पण तो एक सुखद अनुभव होता, योग्य वेळी ठेच लागली की जखमाही लवकर बऱ्या होतात आणि पायानाही समज येते कसे चालायचे ते !!)

बरोबर ना ?

Happy

पण तो एक सुखद अनुभव होता, योग्य वेळी ठेच लागली की जखमाही लवकर बऱ्या होतात आणि पायानाही समज येते कसे चालायचे ते ! >>>>

कवितेइतकेच आवडले.