मसाला वांगी टोमाटो

Submitted by हर्शा १५ on 5 August, 2013 - 22:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य : ४ लहान वांगी, २ टोमाटो , किसलेले ओले खोबरे एक वाटी , बारीक चिरले ला कांदा एक वाटी, आले लसुन हिरवी मिरची पेस्ट २ मोठे चमचे , प्रत्येकी १ लहान चमचा हळद , आमचूर पावडर , धने पावडर , जिरे पावडर , मेथी पावडर , चिमुट भर हिंग , एक मोठा चमचा गरम मसाला , २ मोठे चमचे लाल मिरची पावडर , मीठ स्वादानुसार , बारीक चिरलेली कोथिम्बिर , २ मोठे चमचे तेल , मोहरी

क्रमवार पाककृती: 

कृती :
प्रथम टोमाटो धून त्याचा गर काढून पोक्डी निर्माण करावी.
आता मसाला तयार करणे साठी पण मध्ये खोबरे घालून ते परतून त्यात कांदा घालून अजून ५ मीन परतावे .
यात सर्व सुके मसाले , टोमाटो चे गर ,मीठ घालून परत एकदा व्यवस्थित परतावे .
नंतर गस बंद करून यात कोथिम्बिर घालून हा मसाला वांगी आणिक टोमाटो मधे नेहमी प्रमाणे चिर देऊन भरणे.
पन गरम करून तेल टाकावे त्यात हिंग मोहरी ची फोडणी करावी मग उरले ले मसाले किंचित पाणी घालून मिक्सर मधून काढावे ते यात घालून २ मीन परतून वांगी टोमाटो त्यात घालावे वर झाकण ठेऊन भाजी शिजून घ्यावी .
आणिक भाजी शिजला वर झाकण काढून मोकडी करावी .
वरून थोडे सुके खोबरे आणि कोथिम्बिर पेरावी .

वाढणी/प्रमाण: 
२-३
अधिक टिपा: 

खोबरे चांग्ले परतले कि त्याचे खमंग वास येतो आणिक त्याच तेल मधे कांदा हि व्यवस्थित परतता येतो

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users