गाणे..

Submitted by के अंजली on 30 July, 2013 - 13:42

मी पाहते फुलांना
हासून ती जराशी
रंगात रंगताना
फुलते सुरेल गाणे..

वाटेत या कळ्यांच्या
अडतो खट्याळ वारा
बहरात मग फुलांच्या
खुलते सुरेल गाणे..

शुभ्राळ लाट येता
बाहुंत सागराच्या
पाहून मिलनाला
भुलते सुरेल गाणे..

तो बोलतो मधाळ
ऐकून बोल त्याचे
मोहूनिया मनात
झुलते सुरेल गाणे..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोड कविता.....काहीशी गझल आकृतीबंधासारखी.

"मी पाहते फुलांना
हासून ती जराशी" >>> इथल्या 'ती' मुळे अर्थ समजताना काहीसं अडखळायला झालं.