बरेच काही मनात आहे

Submitted by वैवकु on 28 July, 2013 - 16:43

बरेच काही मनात आहे
तुझा अबोला भरात आहे

खुशाल करुदेत लोक चर्चा
तसे कुठे आपल्यात आहे

सुरूप ,साधा स्वभाव ,संगत...
तुझी खुमारी कशात आहे

मला नको सावली जगाची
मजा तुझ्या ह्या उन्हात आहे

निघेल तो अर्थ लाव माझा
मला कुठे काय ज्ञात आहे

अजून थोडाउशीर थांबू.....
किती सुखद वेळ जात आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह वाह ! मस्त गझल !

खुशाल करुदेत लोक चर्चा
'तसे' कुठे आपल्यात आहे
कित्ती सहज शेर !
Happy
उन्हाचा शेरही आवडला.

अजून थोडाउशीर थांबू.....
किती सुखद वेळ जात आहे<<< व्वा

सगळीच गझल मस्त, आवडली.

तसे कुठे आपल्यात आहे - हाही मस्तच

खुशाल करुदेत लोक चर्चा
तसे कुठे आपल्यात आहे

निघेल तो अर्थ लाव माझा
मला कुठे काय ज्ञात आहे

अजून थोडाउशीर थांबू.....
किती सुखद वेळ जात आहे

मस्त शेर, आवडले.

सर्वांचे आभार

गझल फारच साधीसुधी विथाउट मेकप प्रकारातली झाली ही ! पण एकंदर बर्‍यापैकी मुसल्सल झाली हे माझे मला आवडले .. Happy

तशी जराशी जुनी गझल आहे ही !विठ्ठलाचा इथे दिलेला एक्स्ट्रा शेर त्यात समाविष्ट न करता आल्याने मीही खट्टू होतो या रचनेवर त्या एका शेरासाठी किमान ५० वेळा अनेक मिसरे(किमान १० एक मिसरे तरी अजून होते माझयाकडे ) बदलून पाहिले पण मूड लागेना मग चंद्रभागेत सोडून आलो

मग विठ्ठलाला गायब केले व मुसल्सल होईल अश्या गझलेचा प्रयत्न केला

ह्या गझलेने ह्या (विठ्ठलाच्या शेरामुळे) जितका त्रास दिला तितका कोणत्याही गझलेने आजवर दिलेला आठवत नाही Sad

असो

पुनश्च आभार सर्वांचे

मला नको सावली जगाची
मजा तुझ्या ह्या उन्हात आहे

अजून थोडाउशीर थांबू.....
किती सुखद वेळ जात आहे

हे दोन्ही शेर एकदम खास आहेत. Happy

मला नको सावली जगाची
मजा तुझ्या ह्या उन्हात आहे

निघेल तो अर्थ लाव माझा
मला कुठे काय ज्ञात आहे >>> हे दोन सर्वात विशेष वाटले.

मस्तचै....आवडेश..!

बरेच काही मनात आहे
तुझा अबोला भरात आहे

खुशाल करुदेत लोक चर्चा
तसे कुठे आपल्यात आहे

हे म्हणजे जबरदस्तच..!

बेफ़ि सायब, तुमास्नी नाय भावलेला दिसत. Wink
आपल्याले बुवा बंबाड आवडला.

एवढ्या सहज, सोप्या भाषेत सहजपणे आलेला शेर आहे की, तो आरपार आवडून गेला. Happy

खुशाल करुदेत लोक चर्चा - हा मिसरा तितका नाही आवडला मुटेसाहेब. Happy

तसे कुठे आपल्यात आहे - हे आवडले. खरे तर, ही एकच ओळ, संपन्न आहे. तिच्या आधी कोणतीही ओळ असली किंवा नसली तरीही ही ओळ अर्थपूर्ण व संपन्न आहे,

जसे कुणाच्या मनात असते

जसे तुला वाटते अजुनही

जसे मला वाटते अजुनही

अनेकदा मी मनात म्हणतो

जसे कधी आपल्यात होते

इत्यादी इत्यादी!

असे अनेक पर्याय (देवपूरकरांची माफी मागून) बर्‍यापैकी / अधिक सुटेबल वाटतात.

(सुचवण्या करण्याच्या ल तो मो घा वृत्तीबद्दल क्षमस्व)

जसे कुणाच्या मनात असते
तसे कुठे आपल्यात आहे

हा शेर सुद्धा अप्रतिम होईल. पण

खुशाल करुदेत लोक चर्चा
तसे कुठे आपल्यात आहे

पण या शेरात जो निग्रह आणि निडरपणाचा रांगडीपणा आलाय ना, कदाचित तो जास्त दिलखेचक आहे.

दुनिया चाहे कुछ भी बोले .....
किंवा
प्यार किया तो डरना क्या ...

या धर्तीचा. Happy

Lol मुटे सर खरोखरच कैतरी गम्माडीजम्मत दिसतीय बरका Lol

तुमचा विठ्ठलाचा शेरही "बरा"च आहे पण विठ्ठलाचा शेर ज्याने त्याने आपापल्या शैलीत करावा असे मला वाटते तुम्ही पुढे मागे विठ्ठलाचा शेर करताना मुटेशैली नका सोडू सर
__________________________________

ही ओळ अर्थपूर्ण व संपन्न आहे,<<<< सपशेल पटले !!!!!!
तुम्ही दिलेले सगळेच मिसरे परफेक्ट बसताय्तच बसताय्त तिथे बेफीजी ...धन्यू(श्लेष) !!
मला हा अधिक आवडला ..........

जसे कधी आपल्यात होते
तसे कुठे आपल्यात आहे
... पण त्यातही बरका बेफीजी एकच मिसरा म्हणून हे जास्त तुमच्या स्टायलीत वाटेल

जसे कधी आपल्यात होते तसे कुठे आपल्यात आहे <<< पर्फेक्ट इन बेफी स्टाईल !!

मीही दोन मिसरे असे चालवून पाहिले होते
~तुझ्याच काही मनात आहे
~उगाच करतोय गाव चर्चा
__________________________________

नानुभौ लै दिसांनी येनं केलंत लै बरं वाट्लं !!!!
__________________________________

रच्याकने :हे "ल तो मो घा" काय अस्तं ब्वॉ ??

अरे वा !

दुनिया चाहे कुछ भी बोले
प्यार किया तो डरना क्या

हा तर एक अख्खा शेर झाला की हो मुटे सर

असेही चालते आहे

दुनिया चाहे कुछ भी बोले
तसे कुठे आपल्यात आहे

खुशाल करुदेत लोक चर्चा
प्यार किया तो डरना क्या

वाह मजा आली राव !!!

खुशाल करुदेत लोक चर्चा
तसे कुठे आपल्यात आहे>>~हा आवडला (प्रचंड) Proud

बेफीजींचे पर्यायही उत्तम..

अवांतर चर्चेमुळे मजा आली...

बर्याच दिवसांनंतर देवपूरकरजी/ अनामिक गझलवेडा / गझलप्रेमी/ कर्दनकाळ ...(हुश्श!!!) या सगळ्यांची एकदम आठवण आली..

बरेच काही बोलून गेल्यामूळे दिलगीर आहे Wink

अतिशय सुंदर गझल…
साधी सहज पण सुरेख…. साधेपणा जास्त भावला…

खुशाल करुदेत लोक चर्चा
तसे कुठे आपल्यात आहे

मला नको सावली जगाची
मजा तुझ्या ह्या उन्हात आहे

निघेल तो अर्थ लाव माझा
मला कुठे काय ज्ञात आहे

अजून थोडाउशीर थांबू.....
किती सुखद वेळ जात आहे

लय भारी….

शुभेच्छा…

Pages