सखे ग...

Submitted by अवल on 11 July, 2013 - 07:58

अगदी विश्वासाने जिच्या खांद्यावर विसावावे अशी ही सखी
_____________________________________________

अग, आहेस का ग ? खूप गरज आहे तुझ्याशी बोलायची, बोल ग...
(आता तिची सगळी वाक्य ... अशी; कारण ती प्रत्येकीची वेगवेगळी अन वैयक्तिक )

काय झालं? बरी आहेस ना
...................

काय झालं
.................
झालं काय पण?
....................
बोल, बोलुन मोकळी हो
.....................
काय झालं नीट सांग
.........................
म्हणजे?
.......................
...............................
......................
अग हे सगऴीकडे असेच असते...जो करतो त्याच्यकडुनच जास्त अपेक्षा असतात
.........................
अग असं नाही ग
...............................
हो, अग त्यांना लक्षातच येत नाहि
.......................
अग माझी बायो...
.......................
........................
.................
हो ग अगदी खरं
..........................
.......................
..........................
बरोबर आहे
.................
.......................
सगळ्या पुरुषांना ना काहीगोष्टी कळतच नाहीत अगदी
..........................
अन त्यांते विश्व, काही वेगळेच असते
.....................
अगदी अगदी
सेम हिअर ग
......................
...............................
माझी पण अशीच चिडचिड होते ग....
.............................
पण एक लक्षात ठेव आयुष्यभरासाठी
पुरुष हा वयाने मोठा होतो पण मनाने तो कधीच मोठा होत नाही.
...........................
माझा अनुभव आहे हा
........................
आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा तो प्रथम गोंधळतो
........................
मग घाबरतो
मग काही करू शकत नाही म्हणुन चिडचिड करतो
.................................
खरं सांगायच तर वयाने वाढलेले ते एक पोर असते.
वय वाढलेले म्हणुन इगो
.............................
........................
अन पोर म्हणुन केअरिंग कसे ते माहिती नाही. फार अभावानेच केअरिंग असणारे पुरुष पाहिले मी
.......................
त्यातून जी बाई कर्तुत्ववान तिचा नवरा हमखास असा नाही, नाहीच
................................
............................
अन मी सगळ्यांसाठी हे करताना सगळे म्हणजे कोण हे ठरव बसुन
अन फक्त त्यांच्यासाठीच सारे कर
....................................
अन ते करताना माझ्यासाठी फक्त आणि फक्त मीच हे कोरुन ठेव मनात
...............................
अन हे सारख सांगत रहायच मनाला
..................
.................
अवघड आहेच पण जमत.
...........................
सर्वात महत्वाचे, स्वत:ला माफ करायला शीक
........................
एखादी गोष्ट नाही जमली करायला तर काही गुन्हा नाही केला
एक दिवस एखादे काम केले नाहीस तर जग बुडी नाही होत
......................................
अन तू कुचकामी पण होत नाहीस
....................................
मला जमणार नाही हे म्हणायचे धाडस कर
...................................
तसे केलेस तर त्याचा अपमान होत नाही
उलट हे म्हणु शकण्याचा हक्क त्याचाच आहे, त्यालाच हे तू म्हणु शकतेस हे सांग
...................................
................................
ती राहणारच ना...ते तुझ पहिलं पोर आहे हे विसरु नको Happy
..........................
शेरे ना, मारु दे. हसत म्हण.... बघ बाबा मला जमत नाहीये, तू शिकव ना जरा; की तूच करतोस?
.......................
...........................
आपण बायका ना सारेच्या सारे फार सिरियसली घेतो. थोडं हलकं घ्यायला शिकायला पाहिजे.
..............................
मग काय करायच?
आपल्या मानेला आपलाच खांदा द्यायचा
......................
..............................
अवघड आहे, हो आहेच अवघड पण उपाय नाही
साध्य करायचेच...जमते
...........................
या सा-यातून गेलेय ना मी पण
सो कळतेय मला काय होते ते
.........................
बघ आताही करुन बघ
............................
हलकेच मान सैल सोड
हळूहळू स्वतःच्याच खांद्यावर टेकवायचा प्रयत्न कर
.....................
जमेल अन रिलिफही वाटेल
शब्दशा सांगते, इट वर्क्स
........................

बरं असू दे आता सारं तसच. तू थोडी झोप आता.
....................................
सगळे विचार, शंका, कटकटी सगळे माझ्याकडे सोपव आणि पड निवांत,मी आहे Happy
.......................
ओके ओके, झोप बघू आता शांत, गुणाची बाय माझी, शांत हो....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.... एकदम रीलेट झाले.
शेरे ना, मारु दे. हसत म्हण.... बघ बाबा मला जमत नाहीये, तू शिकव ना जरा; की तूच करतोस? >>> हे सगळ्यात आवडले Happy

अवल खूप मस्त ग.... अगदी अलवार.... स्वतःचा खांदा थोड्यावेळासाठी प्रत्येक मैत्रीण देतेच ग.. पण आपलाच खांदा वापरायला शिकवणारी तुझ्यासारखी मैत्रीण विरळीच. Happy (शब्द बरोबर आहे ना? Uhoh रेअर म्हणायच होत मला )

एकदम भिडलंच!! मस्त लिहिलंयस!!................<<<<<<<<आपल्या मानेला आपलाच खांदा द्यायचा>>>>>>>>> हे एकदम म्हणजे एकदम पटेश!! Happy

अवल, तुझी परवानगी न घेताच तुझा सल्ला चारोळीत गुंफायचा आगाऊपणा करतेय गं Happy

टेकवावी अलगद स्वतःच्याच खांद्यावर
आपली मान
अन भागवून टाकावी,
एकटेपणाची अनमीट तहान.....

सुरेख Happy

धन्यवाद सर्वांना Happy
विनार्च, "अनमीट" मस्त शब्द !

अन माझी चारोळी आठवतेय ना Happy
"ठेवावी स्वतःचीच मान
आपल्याच खांद्यावर
विश्वासाचा किती
सहजसाध्य आधार !"

वा अवल - अतिशय सुंदर व मार्मिक लिहिलंस की - बर्‍याचजणींचे रिलेट होणे ही प्रतिसादातून कळतेच आहे.

अन पोर म्हणुन केअरिंग कसे ते माहिती नाही. फार अभावानेच केअरिंग असणारे पुरुष पाहिले मी >>>> याकरता स्पेशल थँक्स - काहीजणांना तरी कन्सिडर केलेस तर .... Happy Wink

म्हणजे काय, मी काही पुरुष द्वेष्टी नाही रे Happy अन हे सारे समजावण्याच्या भरातले, सो थोडे झुकते माप तिला द्यायला हवेच ना? आता कधी तरी त्याला समजावेन ना तेव्हा त्याला झुकते माप देईनच Happy
धन्यवाद रे Happy

अन हे सारे समजावण्याच्या भरातले, सो थोडे झुकते माप तिला द्यायला हवेच ना? आता कधी तरी त्याला समजावेन ना तेव्हा त्याला झुकते माप देईनच >>> Happy

कित्ती टिंबं!

डोळे भिरभिरले वाचताना.
Wink

ती राहणारच ना?
म्हणजे काय?

बाकी कविता फार बायस्ड आहे बरं.
म्हणजे मला काही ओळी नाहीच पटल्या.

उदा. पुरूष वयाने मोठा होतो पण मनाने नाही
आणि दुसरी कर्तुत्ववान बाईचा नवरा केअरिंग नसतो
इ.

बाकी लहान मुलासारखं तर टर्न बाय टर्न दोघंही वागतात नं नात्यात?

जास्त लहान पोर म्हणून कौतुक करू नये पुरूषाचं. आपली मान दुखायला लागली की हक्काने खांदा मागावा. असे माझे मत आहे. Happy

छान लिहिलंय.एकदम रिलेट होणारं.
जास्त लहान पोर म्हणून कौतुक करू नये पुरूषाचं. आपली मान दुखायला लागली की हक्काने खांदा मागावा. असे माझे मत आहे. >> +१ साती.
ब-याचदा बायकाच पुरुषाला वयाने मोठं झालेलं पोर बनवायला खतपाणी घालतात असं मला वाटतं.

मस्त. <<<आपण बायका ना सारेच्या सारे फार सिरियसली घेतो. थोडं हलकं घ्यायला शिकायला पाहिजे.>>> अगदी खरं :-).

जमेल अन रिलिफही वाटेल
शब्दशा सांगते, इट वर्क्स>>> मी ट्राय केलं. इट रिअली वर्क्स!!! Happy

फार छान लिहिलयंस अवल. कुणालातरी समजवताना, नैराश्यातून बाहेर काढायचं असेल तर असं थोडसं बायस्ड व्हावंच लागतं. एकदम दुसरी बाजू समजून सांगायला लागलं की समोरचं माणूस आपल्या मनाची कवाडं नकळत बंद करून टाकतं आणि व्यक्त होणं थांबवतं. आणि मैत्रिणिला नैराश्यातून बाहेर काढायचं असेल तर तिला बोलतं तर ठेवायला हवं ना?
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतातच की... पण हे त्या टिंब टिंब वाल्या मैत्रिणीला शांत झाल्यावर स्वतःहून समजेल. आपण निराश असतो तेंव्हा... कुणाशीतरी मोकळं व्हावंसं वाटतं तेंव्हा... असं माणूस हवं असतं बोलायला जे फक्त आपलं सगळं ऐकून घेईल आणि आपल्या वेदना स्वतःच्या असल्याप्रमाणे कळवळेल. बाकी सल्ले देणारे हजारो भेटतातच की!

साती+१
टिंब पाहून वाचायचा विचार सोडून दिला होता. प्रतिसाद वाचून झाल्यावर नेट लावून मूळ लेखन वाचले.

<...ते तुझ पहिलं पोर आहे हे विसरु नको >
आणि
<खरं सांगायच तर वयाने वाढलेले ते एक पोर असते.- वय वाढलेले म्हणुन इगो- अन पोर म्हणुन केअरिंग कसे ते माहिती नाही>
या दोन ओळी मुद्दाम एकत्र देतोय.

कंडिशनिंग करणारे/र्‍याही आपणच. त्याला बोल लावणारेही आपणच. तो पहिलं पोर, फक्त वयाने वाढणारं, असं म्हणताना स्वतःचाही इगो सुखावतो का हेही तपासायची गरज आहे.

कंडिशनिंग करणारे/र्‍याही आपणच. त्याला बोल लावणारेही आपणच. तो पहिलं पोर, फक्त वयाने वाढणारं, असं म्हणताना स्वतःचाही इगो सुखावतो का हेही तपासायची गरज आहे.>>> मयेकर, हे सगळं एका दुखावलेल्या माणसाची समजूत काढण्यासाठी लिहिलंय हे विसरता येणार नाही हो. जखमेवर जहाल औषध लावण्याआधीही आणि नंतरही आपण हलकी फुंकर घालतो. का? त्या फुंकरिने जखम बरी होत नाही... पण ज्या व्यक्तीला जखम झाली तिला बरं वाटतं त्या फुंकरीने. तसंच एखाद्याचं/ एखादीचं मन दुखावलं गेलं असेल तर आपण आपल्या एखाद्या वाक्याने सुखावला त्याचा ईगो... तर तीही त्या व्यतीची त्या क्षणाची मानसिक गरज असते ना? त्या दुखावलेल्या व्यक्तिला त्यामुळे किंचित उभारी येत असेल तर काय हरकत आहे असा मुद्दाम ईगो सुखावायला? तुम्हाला नाही वाटत असं?

अवल, एक वस्तुस्थिती, अनेकींनी चांगल्या शब्दांनी सजवलेली, चांगल्या भावनेने पोसलेली पण चुकीच्या रस्त्यावर केलेली वाटचाल. पारंपारिक भूमिकांशी संघर्ष करायला कमी पडणे.त्याची किंमत मोजायला घाबरणे.
पण प्रत्येक ढगाला चंदेरी किनार असतेच, या अशा एकतर्फी समजूतदारपणातून हळुहळू चांगले बदल होतातही,आयुष्य बरेचसे खर्ची पडले तरी. तलवार उपसणे हाच एकमात्र इलाज कुठे आहे ?

अन हो ,'सन्माननीय अपवादांनी स्वतःला वगळून घ्यावे :)'

अवल... अगदी आवडलं. एका समजुतदार सखीनं समज हरवून बसलेल्या आपल्या सखीची काढलेली ही समजूत. अगदी अशीच असेल.
भारती म्हणतेय तशी ही वस्तुस्थिती असेल ह्या हरवल्या सखीच्या घरात. स्वत्वं सांडून हतबल झालेल्याच्या हातात तलवार देऊन चालत नाही. आधी स्वत्वं सापडून द्यावं लागतं... हे असच... थोडकं चुचकारून, समजावत.

थोड्या सावरलेल्या त्या सखीशी मग काही दिसांनी झालेलं गुज वेगळ्या धर्तीचं असेल असं मला वाटलं. वेळ पडली तर अन योग्यं वेळ बघूनच तलवार हाती देणारी सखीही असतेच.