कुर ळ्या केसान्साठी वेगळे cuts/styles सुचवा

Submitted by तनुदि on 7 July, 2013 - 13:38

सतत step cut करुन कंटाळा आलाय. केस शोल्डर परन्य्त लांब आहेत.
मोकळे कधिच सोडत नाही. थोड काही नवीन माहीत असेल तर सांगावे.मोकळे सोडले तर खुप वाईट दिसतात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा पण हा प्रोब्लेम आहे. स्टेप कट शिवाय दुसरे काहीच करता येत नाही. एकदा एका ब्युटी सलोनवालीने स्टेप कट चा कंटाळा आला आहे सांगितले म्हणून अ‍ॅपल कट केला. रिझल्ट तिला व तिच्या असिस्टंट व्यतिरिक्त कोणालाच आवडला नाही. त्या दोघी मात्र स्वतःच्या कामावर खुश होत्या.

आवरत नाहीत म्हणून मोकळे सोडत नाही का? सिरम लावून पाहिलंत का? तुमच्या चेहर्‍याला शोभत असेल आणि आवडत असेल तर ब्रेक म्हणून काही काळासाठी स्ट्रेटनिंगचाही विचार करायला हरकत नाही. माझेही केस खुप कुरळे आहेत, बर्‍याचदा मोकळे सोडते. पण मी रोज तेल लावते. अजिबात चंपू दिसत नाहीत. मऊही रहातात आणि गुंता होत नाही. खरंतर कुरळे केस मोकळेच छान दिसतात पण स्टेप कटने जास्त फुलतात आणि पसरतात म्हणून नको वाटत असेल तुम्हाला. मी बर्‍याचदा डीप यु केला आहे. त्याने पोनीटेल पण चांगली दिसते आणि मोकळे सोडले तरी आकार नीट दिसतो, (इतरांनाही कळतो :अओ:). वरून थोड्या फ्लिक्स ठेवल्या तर कंटिन्युअशन चांगले दिसते.

किरण राव सारखे दिसतात का? तिचे केस कधीच विंचरल्यासारखे दिसत नाहीत. स्ट्रेट करून घ्या मस्त पैकी.

कोणता हेअर कट आपल्या चेहर्याला सुट करेल याचे काहीतरी सोफ्टवेअर असते ना? कोणाला माहित असेल तर प्लिज सागा ना.(सा वर टिब कसा देतात)

स्ट्रेट करून घ्या मस्त पैकी.>>> पण काळ्जी खुप घ्यावी लागते न नंतर. मला त्याचा कंटळा येतो.
सई कुठल तेल वापर ता तुम्ही?

मी पॅराशूट रेग्युलर वापरते. पण कोणतंही सौम्य तेल चालायला हरकत नाही. धुतल्यानंतर पुसून विंचरण्यापूर्वी तेल लावायचे. सिरमही तोच इफेक्ट देते असे ऐकले आहे पण मी कधी वापरलेले नाही. मला एका नामवंत केसतज्ज्ञांनी आणि नंतर ब्युटिशियननी तेल केसांना हानीकारक आहे असे सांगितले होते, पण माझा प्रत्यक्ष अनुभव तसा नाही. फक्त केस नियमित धुवावे लागतात कारण तेलामुळे त्यांच्यावर धूळ चिकटते.

बायका सरळ केस हौसेने कुरळे करून घेतात, आपल्याला ते जन्मतः मिळालेत! माझ्या टॉप टू बॉटम नूडल्स बघून मैत्रिणी विचारतात काय करतेस म्हणून Happy मग मस्त वाटतं Happy