निशेच्या उरी.....

Submitted by भाग्यश्री ७ on 7 July, 2013 - 10:39

निशेच्या उरी चांदण्यांचा उसासा,
क्षितीजावारी सूर्यरूपी खुलासा....

तुला विश्व हे आर्ततेने पुकारी,
मला एकटीला नसे तू हवासा....

कसे रोज आभाळ गाशी पिला तू,
मला छंद दे ना तुझा हा जरासा.....

असे काय करडेच दिसशी नभा तू,
जणू रंग माझा तुला लागलासा....

पऱ्यांच्या, फुलांच्या कथा वाचते मी,
जगाया हवा ना मलाही दिलासा....

~भाग्यश्री कुलकर्णी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच की....
इतकं गोड्गोड मला कधी लिहिता येईल कोण जाणे

अवांतर : आपण आ़ज दि: ७-७-२०१३ रोजी सकाळी मला पुणे विद्यापीठात भेटलात् त्याच भाग्यश्री जी का ?सहज शंका म्हणून विचारले

इथे हार्दिक स्वागत !!!