मला वाटले...

Submitted by पल्लवी on 7 November, 2008 - 06:19

खालील कविता वाचताना कोणताही वैयक्तिक संदर्भ लावु नये. काहीच्या काही कविता या विभागात असल्याने दिवे घेऊन वाचतील अशी अपेक्षा आहे.

उगाचंच अस्वस्थ वाटलं वाचुन
पण काय उपयोग आहे असं चुकचुकून

आताशी तर हे नेहमीचंच झालंय
सृजनतेच्या ऐवजी खच्चीकरणाचंच पीक आलंय

श्वास कसा घ्यायचा हे आता ते सांगु लागलेत
होऊन गेलेल्या घटनांना खतपाणी घालु लागलेत

तेव्हा समिक्षा करत होते आता धिंडवडे काढताहेत
मुद्याचा वाद आता गुद्यावर नेताहेत

सगळंच नियमात हवे असा अट्टाहास का?
जरा वेगळे दिले तर पचत नाही का?

तुम्हाला पटत नसेल तर सोडून द्या की
अगदीच राहवत नसेत तर संपर्क करा की

कागदावर उतरवताना एकदा मनाला विचारा
लाखमोलाचे शब्द जरा जपुनच वापरा

पल्लवी

१००% बरोबर Happy
एकदम आवडली कविता... Happy

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

तुम्हाला १००% अनुमोदन.. कुठल्याही प्रकारची सांस्कृतीक गळचेपी ही धिक्कारास पात्रच असते..

पल्लवी, काहीच्या काही कविता? अर्थ लागतोय या कवितेचा चक्क!

सृजनतेच्या ऐवजी खच्चीकरणाचंच पीक आलंय >> हो Happy
श्वास कसा घ्यायचा हे आता 'ते' सांगु लागलेत - ही कविता कोणाला उद्देशून आहे ते नाही कळ्ळं Proud

कागदावर उतरवताना एकदा मनाला विचारा
लाखमोलाचे शब्द जरा जपुनच वापरा > अनुमोदन .

वा!वा! ... सुंदर कविता..!

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
भावना अनावर झाल्या की अश्रुंचे सैनिक पापण्यांच्या तटावरुन पटापटा उड्या घेतात..
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

अज्ञात, नयना, सक्षम आणि चिमण्या... खुप खुप आभारी ... तुमच्या प्रतिसादांनी खरंच खुप छान वाटतंय... Happy

अनुमोदन पल्लवी . अच्छा .... मला आत्त कळले मोकळ्या श्वासाचे गुढ Light 1 पेटला उशीरा !
-----------------------------------------
सह्हीच !

ये ब्बात! जबरीये कविता .....आवडेश Happy

Happy

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

सहीच,अगदी माझ्या मनातले विचार. ही कविता इथून हलवा आणी सरळ कवितांच्या विभागात जाउद्या.(आणी मग होऊन जाऊद्या Wink )
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

दिपुर्झा, श्यामली, विशाल आणि आगावु... मनापासुन आभार... Happy

पल्लवी

It is ok that no personal references shall be linked while reading what about while writing?

पल्लवी, आत्ता वाचली ही कविता. बरोबर लिहिलयस. मला बॅक्ग्राऊंड माहित नाही पण असं वाटतंय की तुझा घुसमटलेला श्वास मोकळा करतेयस या कवितेतून. चू.भू.दे घे Happy
************
"स्पाँटेनियस ब्रोकन सिमेट्री" रचनेच्या शोधाबद्दल - योशिरो नाम्बू (फिजिक्स नोबेल २००८)
यांना अल्बर्ट आईन्स्टाईन, एन्रिको फर्मी, रॉबर्ट ऑपनहायमर यांच्यासारख्यांचे मार्गदर्शन आयुष्यात लाभले.

घुसमटलेला श्वास मोकळा करतेयस या कवितेतून. >> नाही गं बाई ... माझा श्वास नव्हता घुसमटला.. पण घडणार्‍या गोष्टी खटकत होत्या म्हणुन वरच्या ओळी सुचत गेल्या... तुझ्या अभिप्रायासाठी धन्यवाद.

सुधीर ... तुझ्या वि.पु. प्रतिसाद दिलाय.. वाच रे.

पल्लवी, झक्कास जमलीये कविता. आवडली... काहीच्या काही नक्कीच नाहीये. Happy

पण... Happy
शेवटचं कडवं "कागदावर उतरवताना..." फारसं अपिलींग नाही वाटलं. शिवाय, बाकीच्या कडव्यांमधे यमक कसं मस्त जुळलंय. तसं या कडव्यात 'विचारा, वापरा' हे काही फारसं जमलं नाही.

-योगेश

मला आत्त कळले मोकळ्या श्वासाचे गुढ पेटला उशीरा >>. दिपुर्झा तुझी ट्युब उशीरा पेटली पण तरीही चुकीचीच (च्च च्च च्च) ... त्या मोकळ्या श्वासाचा आणि माझा काहीही संबंध नाहीये...:-)

योगी.. खुप खुप धन्यवाद... शेवटच्या कडव्यात सांगितलस तशी काळजी पुढे नक्की घेईल.. Happy