पाऊस : एक स्वयंभू व्यसन !!!!

Submitted by Girish Kulkarni on 9 June, 2013 - 04:35

*************************************
*************************************
(१)
स्वतःबरोबर वाहत आणतो
आठवणी कितीतरी....
कालच्या-परवाच्या अन खुप जुन्याही
त्याचे थेंब घरभर..मनभर अन शरीरभर...
पुन्हा तीच शिरशिरी
मनावर...शरीरावर..
पुन्हा तेच स्पर्शओलावे...
पुन्हां तेच उपसर्ग......
पाऊस :एक स्वयंभू व्यसन !!!!
________________________________

(२)

शेवटी पाऊस म्हणजे काय
तुझी-माझी हौस अन काय
कधी तुझं ढगांच गाणं
कधी वळवाच निघुन जाणं
कधी माझी अतर्क्याची छेड
कधी तुझं थेंबाथेंबाच वेड
पाऊस एक पिसाट भुंगा..
पाऊस एक विराट ठेंगा...
पाऊस तूझा...पाऊस माझा..
पाऊस... एक स्वयंभू व्यसन !!!
________________________________

(३)

पावसात मी अन तू
की तुझ्या-माझ्यात पाऊस....
पावसातली ऊबदार स्वप्नं
की स्वप्नांतला पाऊस....
तू केस विंचरतांना पडलेला पाऊस
की मी तुझे ओठ टिपतांना पडलेला पाऊस....
अव्यक्त पाऊस की दिशाव्याप्त पाऊस...
अबब...पाऊसच पाऊस
पाऊस...एक स्वयंभू व्यसनच !!!

_________________________________

तो सगळ जो गुंडाळुन बसलाय ना
रस्त्याच्या कडेला...
माझ्या बंद छत्रीकडे आशाळभुतपणे पाहात....
त्याच्यातलं पावसाच व्यसन कधी जागं होईल ?

***************************************
***************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानवी भावनांशी पाऊस विविध प्रकारे निगडित असतो हे छान मांडलंय.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

गिरीशजी,
तुमची ही कविता याआधी वाचली होती असं पुसटसं आठवतंय.
(कदाचित मला तसं उगाच वाटत असेल..... विशेषकरून शेवटच्या खंडातला आशय आणि मांडणी यामुळे.
चुकत असल्यास क्षमस्व.)