कडधान्याचे कटलेट

Submitted by Geetanjalee on 6 June, 2013 - 02:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोड आलेले मटकी , मूग, मसूर ( मटकीचे प्रमाण जास्त असावे अथवा आवडीप्रमाणे )एकत्र करून २ वाट्या , आलं , मिरची , लसूण , जिरे ,मीठ , कोथिंबीर , १ चमचा बेसन, तांदळाचे पीठ

क्रमवार पाककृती: 

मोड आलेले कडधान्ये एका पातेल्यात थोडेसे मीठ टाकून बोटचेपे उकडून घ्यावे . नंतर यातील पाणी काढून टाकून मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे , थोडेसे ओबडधोबडच ठेवायचे .

हे सगळी तयारी होई पर्यंत एका पातेल्यात पाणी गरम करून त्यावर चाळणी ठेवावी.

नंतर ह्यात वाटलेले लसूण , आलं , जिरे, मीठ, मिरची, कोथिंबीर, टाकून निट एकत्र करून घ्यावे. आता ह्यात १ चमचा बेसन, तांदळाचे पीठ मावेल तसे टाकावे. ह्या पीठाची लांबट वळकटी झाली पहिजे.

आता ही वळकटी एका पातळ सुती कापडात गुंडाळून किंवा केळी/ पळसाच्या च्या पानात गुंडाळून १५ -२० मिनिटे उकडावी. थंड झाल्यावर कापून shallow fry किंवा deep fry करावी .

टोमाटो केचअप बरोबर मस्त लागते . Happy

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंतर यातील पाणी काढून टाकून >>> अहो, पण त्या पाण्यात केव्हढीतरी पोषणमुल्ये असतील. ती अशीच वाया जाऊ द्यायची?

छान आहे. त्या पाण्याचे कळण(कढण) करायचे. ताक,जिरे,ओवा,लसूण,आले,थोडे लाल तिखट,मीठ,हिंग
कोथींबीर घालायचे. हवी असल्यास तूप-जिरे, हिंग फोडणी करायची. आल्याऐवजी सुंठपावडर पण चालते.

नंतर यातील पाणी काढून टाकून >>> अहो, पण त्या पाण्यात केव्हढीतरी पोषणमुल्ये असतील. ती अशीच वाया जाऊ द्यायची?>>> यासाठी मी पातेल्यात वाफण्याऐवजी उकळत्या पाण्याच्या पातेल्यावर चाळणी ठेवुन बोटचेपे वाफवते म्हणजे मोड आलेल्या धान्यांचा कच्चेपणा जातो.