पावसाची मिठी

Submitted by पुरंदरे शशांक on 4 June, 2013 - 02:57

पावसाची मिठी

भरदिसा पडे
पावसाची मिठी
नाही रीती भाती
कशी म्हणू प्रिती

तुडवीतो राने
करी चोळामोळा
धावे सैरावैरा
कसा याचा चाळा

थेंब किती भारी
सरीवर सरी
करी शिरजोरी
लगटतो उरी

पावसाची मिठी
ओलावली दिठी
किती दिसा झाली
सजणाची भेटी

उणावे आवेग
पुरेपूर संग
उन्हात हसुनी
निहाळी नि:संग

लाजली धरणी
मुख घे झाकोनी
हासू झळकले
पदरा आडोनी ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता आवडली

जनाई कृपेने काव्य हे वाचिले
अभंग भासले मजलागे
अवघी चित्तवृत्ती जनाई जाहली
भरुन पावली कविता ही

ओंकाराची रेख जना वाचायला घेतल्या पासुन बेरेच ठिकाणी अभंग दिसायला लागलेत

सुरेख! झ्याक जमलीय्.:स्मित:

बायदवे, पावसाची मिठी वाचल्यावर मला आधी असे वाटले की दहीसरच्या त्या मिठी नदीवर आहे की काय ही कविता, पावसाळा आल्यामुळे.:फिदी: